Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नेट परीक्षेला अर्ज करण्याची आज शेवटची तारीख, जाणून घ्या प्रक्रिया !! UGC Net Exam Registration 2023

UGC Net Exam Registration - ugcnet.ntaonline.in

UGC Net Exam Registration

UGC Net Exam Registration: The online registration process for National Eligibility Test (UGC NET) conducted by the University Grants Commission has started. The last date to apply for this exam which will be held in December 2023 is 3rd November 2023. Aspirants who are in final year of post graduation or have passed can apply by visiting the official website ugcnet.nta.ac.in. Know More about UGC Net Exam Registration at below

The NTA has been entrusted by the University Grants Commission (UGC) with the task of conducting UGCNET, which is a test to determine the eligibility of Indian nationals for ‘Assistant Professor’ and ‘Junior Research Fellowship and Assistant Professor’ in Indian universities and colleges. The National Testing Agency (NTA) will conduct UGC – NET December 2023 for ‘Junior Research Fellowship’ and eligibility for ‘Assistant Professor’ in 83 subjects in Computer Based Test (CBT) mode. Extension of Last Date for Submission of Online Application Form for UGC-NET December 2023.

विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (यूजीसी नेट) ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये पार पडणाऱ्या या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३ नोव्हेंबर २०२३ असणार आहे. पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षाला किंवा उत्तीर्ण झालेले इच्छुक उमेदवार ugcnet.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज भरू शकतात.

या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी नेट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला बसण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आज आहे. ही शेवटची तारीख वाढवण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजंन्सी (राष्ट्रीय परीक्षा एजंन्सी) च्या वतीने ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते. ही नेट परीक्षा यंदा ६ ते २२ डिसेंबर या कालावधीमध्ये घेण्याचे नियोजित आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आज आहे. उद्यापासून अर्ज भरण्याची संधी उमेदवारांना मिळणार नाही. त्यामुळे, ज्या उमेदवारांना आजपर्यंत काही कारणांमुळे अर्ज करता आले नाहीत, त्यांनी आज त्वरीत अर्ज भरावा. आज हा अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून उद्यापासून अर्ज भरण्याची लिंक बद करण्यात येईल.

या वेबसाईटवरून करा ऑनलाईन अर्ज

नेट परीक्षेला बसण्यासाठी तुम्ही पात्र असालं तर तुम्हाला UGC NET च्या अधिकृत वेबसाईटवर (ugcnet.nta.nic.in)जाऊन हा अर्ज भरावा लागेल. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ ऑक्टोबर होती, जी नंतर ३१ ऑक्टोबरपर्यंत म्हणजे आजपर्यंत वाढवण्यात आली. विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी नेट परीक्षा घेतली जाणार आहे. राष्ट्रीय परीक्षा एजंसीच्या (एनटीए) वतीने ही परीक्षा ६ ते २२ डिसेंबर याकालावधीत घेण्याचे नियोजित आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.

एनटीएकडून त्याबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. अर्जामध्ये दुरुस्तीसाठी ३० व ३१ ऑक्टोबर हे दोन दिवस देण्यात आले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा केंद्राचे शहराची माहिती जाहीर केली जाईल.

या महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा

या परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख बदलल्यानंतर आता एडिट विंडो १ नोव्हेंबर २०२३ ला ओपन होणार आहे. त्यामुळे, ज्या उमेदवारांना त्यांनी भरलेल्या अर्जामध्ये काही दुरूस्त्या करायच्या असतील ते १ ते ३ नोव्हेंबर या दरम्यान करू शकतील.

एकदा ही विंडो बंद झाली तर, उमेदवारांना अर्जामध्ये पुन्हा दुरूस्ती करण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे, १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान तुम्ही एडिट विंडोमध्ये जाऊन तुमच्या अर्जामध्ये दुरूस्त्या करून घ्या. त्यासाठी या महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा.

या तारखांना होणार नेट परीक्षा

सुरूवातीला सांगितल्याप्रमाणे UGC NET ची परीक्षा ही ६ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२३ या दरम्यान घेतली जाणार आहे. त्यापूर्वी, उमेदवारांना हॉलतिकीट आणि परीक्षेची स्लिप देण्यात येईल. या संदर्भातले अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

UGC-NET December 2023 Date Extend

The National Testing Agency (NTA) is in receipt of various representations from the candidates to extend the last date for submission of online application form for UGC NET December 2023. Therefore, in continuation to the Public Notice dated the 30 September 2023 regarding submission of online application form for UGC-NET December 2023 for Junior Research Fellowship (JRF) and eligibility for Assistant Professor (AP), NTA has decided to extend the last date for submission of online application form for UGC-NET December 2023, enabling the aspiring candidate(s) to apply for the said exam. The schedule is as follows:

Events Earlier Date Extended Date
Online Submission of Application Form 28* October 2023 (Upto 05:00 P.M.) 31st October 2023 (Upto 1159 P.M.)
Last date for submission of Examination fee (through Credit Card/ Debit Card/Net Banking 1 1’Ii 29* October 2023 (Upto 1150 P.M.) 31* October 2023

(Upto 1159 P.M.)

Correction in the Particulars in Online Application    30″- to 31- October 2023

Fonn                                                                                              (Upto 1150 P.M.)

 

01* to 03 November 2023 (Upto 1159 P.M.)

UGC-NET December 2023 Schedule

The schedule of UGC-NET December 2023, are as follows:

Submission of Online Application Form 30 September 2023 to 28 October 2023 (upto 05:00 P.M.)
Last date for submission of Examination fee (through CreditCard/ Debit Card/Net Banking /UPI 03 November 2023
Correction in the Particulars in Online Application Form 30 – 31 October 2023 (upto 11:50 P.M)
Announcement of City of Exam Centre Last week of the November 2023
Downloading of  Admit   Card   from   NTA Website First week of the December 2023
Dates of Examination 06 December 2023 to 22 December 2023
Centre, Date and Shift As indicated on Admit Card
Display of Recorded Responses and Answer Key(s) To be announced later on the website
Website https://uqcnot.nla.ac.Jn / www.nta.ac.in
Application Fee General/ Unreserved Rs. 1150/-
General-EWS/OBC-NCL Rs. 600 –
SC/ST/PwD Rs. 325/-
Third Gender

Important Instructions For UGC NET Exam Registration 2023

  1. Candidates can apply tor UGC – NET December 2023 through the Online mode only on the website https://uycnet.nta.ac.in . The Application Form in any other mode will not be accepted.
  2. Only one application is to be submitted by a candidate. Candidates will not be allowed to fill more than one Application Form. Strict action will be taken, even at a later stage, against such candidates who have filled more than one Application Form.
  3. Candidates must strictly follow the instructions given in the Information Bulletin available on the NTA website.
  4. Candidates must ensure that the e-mail address and Mobile Number provided in the Online Application Form are their own or Parents/Guardians only as all information/ communication will be sent by NTA through e-mail on the registered e-mail address or SMS on the registered Mobile Number only.
  5. In case any candidate faces difficulty in applying for UGC NET December 2023, he/she may contact on Oil -40759000 /Oil – 69227700 or e-mail at ugcnet®nta.ac.in For further clarification related to the UGC NET December 2023, the Candidates are advised to visit the official website(s) of NTA (www.nta.ac.in) and (https://ugcnet.nta.ac.in/, for the latest updates.
Apply Here For NTA UGC NET Exam 2023

CSIR UGC NET 2022 – Timetable 

UGC Net Exam Details: National Testing Agency (NTA) has declared the CSIR UGC NET Exam 2022 Timetable. For more details visit csirnet.nta.nic.in. The exam will be held between the 16th of September to the 18th of September 2022. Admit cards will be available soon. Further details are as follows:-

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने CSIR UGC NET परीक्षा, 2022 चे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. जून सत्रासाठी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेला बसणारे सर्व उमेदवार csirnet.nta.nic.in या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचे वेळापत्रक तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

CSIR UGC NET 2022 Exam Details

परीक्षा कधी होणार ?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जारी केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार, CSIR UGC NET, 2022 जून सत्र परीक्षा 16 सप्टेंबर 2022 ते 18 सप्टेंबर 2022 या कालावधीत घेतली जाईल. देशभरातील विविध केंद्रांवर परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते 6 या दोन सत्रांमध्ये घेतली जाईल.

प्रवेशपत्रे कधी प्रसिद्ध केली जातील ?

  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जारी केलेल्या माहितीनुसार, या परीक्षेचे प्रवेशपत्र 13 सप्टेंबर 2022 रोजी जारी केले जाईल.
  • त्याच वेळी, परीक्षा केंद्रांच्या शहरांची यादी 10 सप्टेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करून आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल आणि सबमिट करावे लागेल.
  • ही माहिती अर्जदारांच्या अर्जावर उपलब्ध आहे.

How to Download CSIR UGC NET 2022 Admit Card

प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे ?

  • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट csirnet.nta.nic.in ला भेट द्यावी.
  • आता मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या CSIR UGC NET 2022 प्रवेशपत्राशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
  • आता तुम्ही एका नवीन पेजवर याल.
  • विनंती केलेली माहिती येथे प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
  • आता तुमचे प्रवेशपत्र समोरच्या स्क्रीनवर दिसेल.
  • ते डाउनलोड करा आणि पुढील गरजांसाठी त्याची प्रिंट काढा.

वेळापत्रक डाउनलोड करा – https://bit.ly/3RiYOq1


UGC NET JRF 2022 Postponed

UGC Net Exam Details: Second Phase UGC Net Examination Postponed by University Grants Commission. Now the exam will be held on the 20th to 30th of September 2022. Further details are as follows:-

विद्यापीठ अनुदान आयोगाने UGC NET चा दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, आता ही परीक्षा 20 ते 30 सप्टेंबर दरम्यान आयोजित केली जाणार आहे. यूजीसीचे अध्यक्ष प्रो. एम जगदेश कुमार यांनी स्वतः याबाबत ट्विट करून याची घोषणा केली आहे. यापूर्वी UGC NET फेज 2 ची परीक्षा 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार होती.

  • प्रोफेसर कुमार यांनी माहिती दिली की, UGC NET डिसेंबर 2021 आणि जून 2022 विलीन सत्राची अंतिम फेज-2 परीक्षा आता 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत होणार आहे.
  • दुसऱ्या टप्प्यात 64 विषयांसाठी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट घेतली जाईल.
  • यापूर्वी दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 12, 13 आणि 14 ऑगस्ट 2022 रोजी होणार होती.
  • जी आता पुढे ढकलण्यात आली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षांनी ट्विटद्वारे सांगितले की, एनटीएने 09, 11 आणि 12 जुलै 2022 रोजी देशभरातील 225 शहरांमधील 310 परीक्षा केंद्रांवर 33 विषयांसाठी डिसेंबर 2021 आणि जून 2022 रोजी पहल्या टप्प्यातील परीक्षा आयोजित केली होती. तर दुसरा टप्प्यातील परीक्षा यापूर्वी 12, 13 आणि 14 ऑगस्ट 2022 रोजी होणार होती. तथापि, आता UGC-NET चा शेवटचा टप्पा 20 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत होणार असून, 11 सप्टेंबर 2022 रोजी NTA च्या वेबसाईटवर प्रवेशपत्र जारी केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना हे प्रवेशपत्रं 16 सप्टेंबर 2022 रोजी NTA च्या वेबसाइटवरून डाउनलोड करता येणार आहेत.


UGC NET Exam 2022

UGC Net Exam Details : National Testing Agency has not postponed UGC NET Exam 2022. NTA postponed two subject papers to be held on the 9th of July 2022. Further details are as follows:-

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दोन विषयांची यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली आहे. या संदर्भात एनटीएने आपल्या वेबसाईटवर अधिकृत नोटिफिकेशन देखील जाहीर केले आहे. ९ जुलै रोजी इतर विषयांसाठी होणाऱ्या यूजीसी नेट परीक्षेत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे. बातमीखाली नोटिफिकेशनची थेट लिंक देण्यात आली आहे.

  • नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज ९ जुलै २०२२ रोजी होणाऱ्या यूजीसी नेट परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे.
  • दोन विषयांची यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली आहे. या संदर्भात एनटीएने आपल्या वेबसाईटवर अधिकृत नोटिफिकेशन देखील जाहीर केले आहे.
  • ९ जुलै रोजी इतर विषयांसाठी होणाऱ्या यूजीसी नेट परीक्षेत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे.
  • नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाची (University Grant Commission, UGC) राष्ट्रीय पात्रता परीक्षा (National Eligibility Test, NET) दोन विषयांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
  • नोटिफिकेशननुसार ९ जुलै रोजी होणार्‍या तेलुगू आणि मराठी विषयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

NTA ने माहिती दिली की आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सरकारच्या स्वतःच्या राज्यस्तरीय परीक्षा देखील या दिवशी नियोजित आहेत. अशा परिस्थितीत परीक्षा आयोजित करताना प्रशासकीय आणि पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत एनटीएने परीक्षा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित विषयांच्या परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर यासंबंधी सविस्तर तपशील देण्यात आला आहे. तसेच बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.

Important Note:-

  • विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाताना परीक्षेचे प्रवेशपत्र आणि वैध ओळखपत्र घेऊन जावे लागेल, प्रवेशपत्र नसलेल्या उमेदवाराला परीक्षेला बसू दिले जाणार नाही. प्रवेशपत्रासोबत वैध ओळखपत्र सोबत ठेवावे.
  • परीक्षार्थींना परीक्षेच्या ३० मिनिटांपूर्वी परीक्षा केंद्रावर नोंद द्यावी लागेल. स्क्रिनिंग चाचणीसाठी उमेदवारांनीही रिपोर्टिंग वेळेपूर्वी परीक्षा हॉलमध्ये पोहोचले पाहिजे. हॉल तिकिटावर रिपोर्टिंगची वेळ नमूद केलेली आहे.
  • परीक्षेदरम्यान उमेदवारांना करोना प्रादुर्भावाशी संबंधित सूचनांचे पालन करावे लागेल. उमेदवारांनी सोबत हँड सॅनिटायझर आणावे. यासोबतच उमेदवारांना फेस मास्क घालणे बंधनकारक असेल.तसेच परीक्षेदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

यूजीसी नेट परीक्षा ९ ते १२ जुलै आणि पुन्हा १२ ते १३ ऑगस्ट २०२२ या कालावधीत होणार आहेत. परीक्षा सीबीटी पद्धतीने घेतली जाईल. परीक्षा ३०० गुणांची असेल. यासाठी उमेदवारांना १८० मिनिटे देण्यात येणार आहेत. परीक्षा एमसीक्यू स्वरूपात असेल. नॅशनल टेस्टिंग एजन्सी दरवर्षी दोन सत्रांमध्ये यूजीसी नेट परीक्षा आयोजित करते. गेल्यावर्षी करोनामुळे डिसेंबरच्या सत्राची परीक्षा होऊ शकली नव्हती. त्यामुळे यंदा ती जूनच्या सत्रात विलीन करून घेण्यात येत आहे.

PDF जाहिरात – https://bit.ly/3AyOe8D

अधिकृत वेबसाईट – nta.ac.in


UGC NET December 2021 and June 2022 Exam Date

UGC Net Exam Details: National Testing Agency (NTA) has announced the UGC NET December 2021 and June 2022 Exam Dates. A total of 35 subjects have been selected for the exams to be held on July 9, 11 and 12, five on July 9, five on July 11 and four on July 12. For more details about exam visit https://ugcnet.nta.nic.in & www.nta.ac.in website. Further dteails are as follows:-

UGC NET December 2021 and June 2022 Exam Dates: ९, ११ व १२ जुलैला होणाऱ्या नेट परीक्षेसाठी एकूण ३५ विषयांची निवड करण्यात आली असून, नऊ जुलैला २६, ११ जुलैला पाच, तर १२ जुलैला चार विषयांची परीक्षा होणार आहे.

  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) सहायक प्राध्यापकपदाच्या पात्रतेसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) ९, ११ व १२ जुलै व १२, १३, १४ ऑगस्ट या तारखांना होणार आहे.
  • डिसेंबर २०२१मध्ये नेट परीक्षा होऊ शकली नव्हती.
  • त्यामुळे डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ या दोन्ही सत्रांची एकच सामायिक परीक्षा घेण्याचा निर्णय ‘एनटीए’कडून घेण्यात आला आहे.
  • या परीक्षेचे विषयानुसार सविस्तर वेळापत्रक ‘एनटीए’च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
  • कम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) या पद्धतीने ही परीक्षा पार पडणार आहे.

९, ११ व १२ जुलैला होणाऱ्या परीक्षेसाठी एकूण ३५ विषयांची निवड करण्यात आली असून, नऊ जुलैला २६, ११ जुलैला पाच, तर १२ जुलैला चार विषयांची परीक्षा होणार आहे. यात सर्व प्रकारच्या भाषा, राज्यशास्त्र, संरक्षण शास्त्र, होम सायन्स, मानवी अधिकार अशा विषयांचा समावेश आहे. १२, १३ व १४ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे ‘एनटीए’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. जुलै महिन्यात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना ‘एनटीए’च्या वेबसाइटद्वारे मिळणार असून, त्या संदर्भातील माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  • नेट परीक्षेसंदर्भातील इतर अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ‘एनटीए’च्या वेबसाइटवर सातत्याने संपर्क करत राहावा, परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी वेबसाइटद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असे ‘एनटीए’कडून सांगण्यात आले आहे.
  • https://ugcnet.nta.nic.in व www.nta.ac.in या लिंकद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

Important About Exam 

  • १. ९, ११ व १२ जुलैला होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.
  • २. १२ ते १४ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार.
  • ३. जुलैमधील परीक्षांसाठीच्या प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांनी ‘एनटीए’च्या वेबसाइटशी संपर्क साधावा.
  • ४. डिसेंबर २०२१ व जून २०२२ची परीक्षा एकत्र होणार.

UGC NET December 2021 – June 2022 Date Announced

UGC Net Exam Details: National Testing Agency, NTA has been announced the UGC NET Exam dates. The will be held on the 8th, 9th, 11th, 12th of July, 12th, 13th & 14th of August 2022 under the National Testing Agency, NTA. Detailed schedule of exam will available soon on nta.ac.in & ugcnet.nta.nic.in. Further details are as follows:-

एनटीएकडून यूजीसी नेट परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यूजीसी-नेट डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ च्या विलीन झालेल्या सत्रांसाठी NTA द्वारे ८,९,११,१२ जुलै आणि १२ ,१३, १४ ऑगस्ट २०२२ रोजी परीक्षा होणार आहेत. तपशीलवार वेळापत्रक लवकरच अधिकृत वेबसाइट nta.ac.in आणि ugcnet.nta.nic.in वर अपलोड केले जाणार आहे.

  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency, NTA) यूनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन (University Grant Commission, UGC) म्हणजेच यूजीसी नेट परीक्षांच्या (UGC NET Exam) तारखा जाहीर केल्या आहे.
  • विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रोफेसर एम जगदेश कुमार यांनी यूजीसी नेट डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
  • प्रोफेसर एम जगदिश कुमार यांनी ट्विट केले करुन यासंदर्भात माहिती दिली.
  • यूजीसी-नेट डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ च्या विलीन झालेल्या सत्रांसाठी NTA द्वारे ८,९,११,१२ जुलै आणि १२,१२,१४ ऑगस्ट २०२२ रोजी परीक्षा होणार आहेत.
  • तपशीलवार वेळापत्रक लवकरच अधिकृत वेबसाइट nta.ac.in आणि ugcnet.nta.nic.in वर अपलोड केले जाणार आहे.

यूजीसी नेट जेआरएफ परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. यूजीसी नेटच्या वतीने नेट परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या माध्यमातून वर्षातून दोनदा ही परीक्षा घेतली जाते. गेल्यावर्षी करोना प्रादुर्भावाच्या भीषण उद्रेकामुळे, डिसेंबर २०२१ मध्ये होणारी यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली होती. यानंतर, यूजीसीने एनटीएसह, जून २०२२ सत्र परीक्षा तसेच डिसेंबर २०२१ ची प्रलंबित परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.

सोशल मीडियावर नाराजी व्यक्त

  • यूजीसी अध्यक्षांनी नेट परीक्षेच्या तारखा जाहीर केल्यापासून सोशल मीडियावर उमेदवारांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
  • परीक्षेला बसलेल्या अनेक उमेदवारांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दोन टप्प्यात परीक्षा आयोजित करण्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
  • हे वेळापत्रक पटण्यासारखे नाही.
  • यामुळे काही उमेदवारांना अभ्यासासाठी कमी वेळ मिळेल तर काहींना त्याच परीक्षेच्या तयारीसाठी जास्त वेळ मिळेल असे उमेदवारांचे म्हणणे आहे.
  • ऑगस्टमध्येच सर्वांसाठी नेट परीक्षा आयोजित करण्याची विनंती उमेदवारांनी यूजीसी नेट अध्यक्षांकडे केली आहे.

UGC NET Admit Card 2022

UGC Net Exam Details: UGC NET Exam admit card update. The admit card will be available soon. admit card can be issued at any time. How to check and download Download UGC NET admit card visit ugcnet.nta.nic.in. Further dteails are as follows:-

उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जाणार आहे. देशातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ‘असिस्टंट प्रोफेसर’ आणि ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर’ या पदांसाठी भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी यूजीसी नेट घेतली जाते. परीक्षा दोन शिफ्टमध्ये ३ तासांच्या कालावधीसाठी घेतली जाते.

  • यूजीसी नेटचे उमेदवार खूप दिवसांपासून यूजीसी नेट परीक्षेची वाट पाहत आहेत.
  • अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in या वेबसाईटवर लवकरच २०२२ च्या परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले जाणार आहे.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी (UGC NET Admit Card 2022), उमेदवारांनी UGC NET च्या वेबसाइटवर लॉग इन करणे आवश्यक आहे.
  • देशातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ‘असिस्टंट प्रोफेसर’ आणि ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर’ या पदांसाठी भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी यूजीसी नेट घेतली जाते.
  • परीक्षा दोन शिफ्टमध्ये ३ तासांच्या कालावधीसाठी घेतली जाते.

उमेदवार प्रवेशपत्र डाउनलोड करताना काही अडचण येत असल्यास किंवा प्रवेशपत्रामध्ये काही चुका आढळल्यास अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येणार आहे. सर्व कामकाजाच्या दिवसांमध्ये सकाळी १० ते संध्याकाळी ५.३० दरम्यान – ८०७६५३५४८२ आणि ७७०३८५९९०९ या क्रमांकांवर कॉल करू शकतात.

How to Download UGC NET Admit Card 2022: 

  • Candidates should first open the official website of UGC Net ugcnet.nta.nic.in to download the admission card.
  • Click on the link to download tickets in the News and Events section.
  • Candidates can submit their credentials after opening this link.
  • Once the ticket is opened, download it and print it out.
  • Although the UGC has not yet officially announced when the tickets will be issued, the UGC is likely to announce the tickets sometime.

अधिकृत वेबसाईट – ugcnet.nta.nic.in


UGC Net Application Date Extended

UGC Net Exam Details : University Grants Commission’s National Eligibility Test (UGC Net) has been extended. Candidates can now apply till May 30, UGC President Prof. Jagadesh Kumar gave this information through a tweet. Further details are as follows:-

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (यूजीसी नेट) अजांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना ३० मेपर्यंत अर्ज भरता येईल, यूजीसीचे अध्यक्ष प्रा. जगदेशकुमार यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) यूजीसी नेट ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे डिसेंबर २०२१ ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे परीक्षांचे सत्र सातत्य कायम ठेवण्यासाठी डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ ची परीक्षा एकत्रितरीत्या घेतली जाणार आहे.

UGC Net Exam Details

उमेदवारांकडून मुदतवाढीची मागणी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अजासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी आता उमेदवारांसाठी ३० मे ही अंतिम मुदत असेल, असे प्रा. जगदेशकुमार यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. उमेदवारांना अधिक माहिती ugcnet.nta.nic.in या संकेतस्थळावर मिळेल.


UGC NET 2022

UGC Net Exam Details: The National Testing Agency has made some significant changes to its information bulletin. These changes include application fee, number of subjects, exam centers and answer key challenge fee. Further details are as follows:-

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलांमध्ये अ‍ॅप्लिकेशन फी, विषयांची संख्या, एक्झाम सेंटर्स आणि आन्सर की (Answer Key) चॅलेंज फीचा समावेश आहे. 

  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) डिसेंबर 2021 आणि जून 2022 या सायकलसाठी होणाऱ्या कम्बाईन्ड यूजीसी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच नेट (UGC NET) परीक्षेचं अधिकृत नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे.
  • या वर्षी 30 एप्रिल रोजी यूजीसी नेट परीक्षेचं अ‍ॅप्लिकेशन रिलीज झालं आहे. आवश्यक पात्रता अटी पूर्ण करणारे विद्यार्थी यूजीसी नेट 2022 या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज (Online Application) करू शकतात.
  • या वर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये (Information Bulletin) काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
  • या बदलांमध्ये अ‍ॅप्लिकेशन फी, विषयांची संख्या, एक्झाम सेंटर्स आणि आन्सर की (Answer Key) चॅलेंज फीचा समावेश आहे.

महत्त्वाचे बदल:

एनटीएनं डिसेंबर 2021 आणि जून 2022 या या सायकलसाठी अ‍ॅप्लिकेशन फी (Application Fee) वाढवली आहे. ही फी अंदाजे 10 टक्क्यांनी वाढली आहे. जनरल (General Category) किंवा अनरिझर्व्हड कॅटेगरीच्या (Unreserved Category) अ‍ॅप्लिकेशन फीमध्ये 100 रुपयांची वाढ होऊन ही फी आता एक हजार 100 रुपये इतकी झाली आहे. ईएसडब्लू (EWS), ओबीसी-एनसीएलच्या (OBC-NCL) फीमध्ये 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना यावर्षी 550 रुपये अ‍ॅप्लिकेशन फी भरावी लागणार आहे. याशिवाय, एससी(SC), एसटी (ST), पीडब्लूडी (PwD) आणि ट्रान्सजेंडरसाठीच्या अ‍ॅप्लिकेशन फीमध्ये 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच या कॅटेगरींतील विद्यार्थ्यांना आता 250 ऐवजी 275 रुपये फी भरावी लागेल.

  • आतापर्यंत 81 विषयांसाठी (Subjects) यूजीसी नेट परीक्षा घेतली जात होती.
  • विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) यावर्षी परीक्षेसाठी आणखी एका विषयाचा समावेश केला आहे.
  • इन्फॉर्मेशन बुलेटिननुसार यूजीसीनं ‘हिंदू स्टडीज’ (Subject code 102) हा नवीन विषय आपल्या यादीमध्ये समाविष्ट केला आहे.
  • म्हणजेच आता यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज भरताना विद्यार्थ्यांना 82 विषयांच्या यादीतून आपला विषय निवडावा लागणार आहे.

एक्झाम सेंटर्सची संख्या वाढवली 

Last year, UGC NET exams were conducted in 239 examination centers. This year (2022) the number of exam centers has been increased. NET exams will be held at 541 places this year. NTA has also included in its Information Bulletin a complete list of exam centers, including cities.

आन्सर की चॅलेंज फी झाली कमी 

  • परीक्षा झाल्यानंतर लगेचच NTA प्राथमिक UGC NET answer key 2022, प्रश्नपत्रिका आणि सोडवलेली उत्तर पत्रिका उपलब्ध करून देणार आहे.
  • त्यामुळे परीक्षार्थींना काही आक्षेप असतील तर ते नोंदवू शकतात.
  • विद्यार्थ्यांना यापूर्वी प्रत्येक आन्सर की चॅलेंजसाठी एक हजार रुपये भरावे लागत होते.
  • मात्र, त्यामध्ये आता मोठी कपात करण्यात आली आहे.
  • आता प्रत्येक चॅलेंजसाठी केवळ 200 रुपये मोजावे लागतील.

परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे आहे. यूजीसी नेट डिसेंबर 2021 आणि जून 2022 ही परीक्षा सीबीटी (Computer Based Test) मोडमध्ये घेतली जाईल. 180 मिनिटे किंवा तीन तास कालावधी असलेली ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये आयोजित केली जाईल. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते 12 आणि दुसरी शिफ्ट 3 ते 6 या वेळेत असेल. पेपर I साठी 100 मार्क्स असतील, तर पेपर II हा 200 मार्क्सचा असेल. दोन्ही पेपरमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न (Objective Question) असतील. सर्व प्रश्न सोडवणं बंधनकारक आहे. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील. परीक्षा फक्त इंग्रजी (English Medium) आणि हिंदी माध्यमात (Hindi Medium) असेल. जे विद्यार्थी या वर्षी नेट परिक्षा देण्यास इच्छुक आहेत त्यांनी हे सर्व बदल काळजीपूर्वक समजून घेणं महत्त्वाचं आहे.


UGC NET 2022 Application Process

UGC Net Exam Details: The National Testing Agency (NTA) has started the application process for UGC NET 2022. For this, UGC NET 2021 notification has been issued for December and June 2022. NTA can apply by visiting UGC NET’s official website ugcnet.nta.nic.in (How to register for UGC NET 2022 Exam). Further details are as follows:-

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC NET 2022 साठी अर्ज प्रक्रिया (UGC NET 2022 Application Process) सुरू केली आहे. यासाठी, UGC NET 2021 डिसेंबर आणि जून 2022 साठी अधिसूचना (Official Notification of UGC NET 2022) जारी करण्यात आली आहे. 

Official Notification of UGC NET 2022

  • इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या परीक्षेसाठी (UGC NET 2022 Exam date) अर्ज करायचा आहे.
  • NTA UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन (How to register for UGC NET 2022 Exam) अर्ज करू शकतात.
  • या परीक्षेसाठी (UGC NET 2022) अर्ज प्रक्रिया 30 एप्रिलपासून सुरू झाली आहे.
  • उमेदवार https://examinationservices.nic.in/examsys22 या लिंकवर क्लिक करून या परीक्षेसाठी (UGC NET 2022) थेट अर्ज करू शकतात.
  • तसेच, तुम्ही https://cdnbbsr.s3waas.gov.in/s301eee509ee2f68dc6014898c309e86bf/uploads या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना (UGC NET 2022) देखील तपासू शकता.
  • अर्ज (UGC NET 2022 नोंदणी) 20 मे 2022 पर्यंत भरले जातील आणि 21 मे 2022 पासून फॉर्मसाठी दुरुस्ती विंडो उपलब्ध करून दिली जाईल.

Candidates should note that the date of UGC NET exam will be announced later. However, according to UGC President M Jagdesh Kumar, the tests for ‘Junior Research Fellowship’ and ‘Assistant Professor’ will be computer based and are likely to be conducted around the second week of June.

UGC NET Registration Fees 

उमेदवारांनी नोंद घ्यावी की सामान्य/अनारक्षित श्रेणीतील विद्यार्थ्यांना रु. 1100/- भरावे लागतील. जनरल-EWS/OBC/NCL साठी रु.550 आणि तृतीय लिंगासाठी रु. 275 भरावे लागतील.

UGC NET 2022 Important Dates 

  • ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – ३० एप्रिल
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मे

How to Register For UGC NET 2022 

  • UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in ला भेट द्या.
  • वेबसाइटच्या होम पेजवर, “UGC-NET डिसेंबरसाठी ऑनलाइन अर्जाची नोंदणी” या लिंकवर क्लिक करा. 2021 आणि जून 202.” लिहिले आहे
  • क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा आणि UGC NET अर्ज भरा.
  • नोंदणी शुल्क भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
  • UGC NET 2022 फॉर्म सबमिट केला जाईल.
  • UGC NET 2022 डाउनलोड आणि प्रिंट करा

CSIR-UGC NET June 2021

UGC Net Exam Details : CSIR-UGC NET June 2021 Exam: Candidates are generally informed about the date, time and examination center of the exam through Admit Card. But in the wake of the Covid-19 epidemic, the city of the examination center is informed in advance to help the candidates plan their journey for the exams.

सीएसआयआर-यूजीसी नेट जून २०२१ परीक्षा: उमेदवारांना सर्वसाधारणपणे परीक्षेची तारीख, वेळ आणि परीक्षा केंद्राची माहिती अॅडमिट कार्डद्वारे दिली जाते. पण कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना परीक्षेसाठी त्यांची प्रवासाची योजना आखण्यासाठी मदत व्हावी म्हणून परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती आगाऊ कळवली जाते.

ज्या उमेदवारांनी विविध विषयांसाठी लेक्चरशिप/असिस्टंट प्रोफेसर आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) च्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (NET)अर्ज केला आहे, ते आपल्याला मिळालेल्या परीक्षा केंद्राची माहिती प्रवेश पत्र मिळण्याआधीच माहित करून घेऊ शकतात.

असे जाणून घ्या परीक्षा केंद्राचे शहर 

सीएसआयआर-यूजीसी नेट जून २०२१ परीक्षेच्या उमेदवारांना आपल्या परीक्षा केंद्राची माहिती हवी असल्यास त्यांनी परीक्षा पोर्टल, csirnet.nta.nic.in ला भेट द्यावी. यानंतर होम पेज वर दिलेल्या संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल. नव्या पेजवर उमेदवारांना आपला अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि अन्य माहिती भरून सबमीट करा. यानंतर उमेदवार आपली ‘अॅडव्हान्स्ड सिटी इंफॉर्मेशन स्लिप’ डाऊनलोड व प्रिंट करा.

‘अॅडव्हान्स्ड सिटी इंफॉर्मेशन स्लिप’ – https://bit.ly/3tXH0HV

अॅडमिट कार्ड लवकरच 

In addition to providing information about the examination city, NTA has given an update regarding the issuance of CSIR UGC Net Admit Card 2022 in its circular dated 23rd January, 2022. Accordingly, the admission card will be made available to the candidates soon.

The CSIR UGC NET June 2021 exam will be conducted by NTA during this week from 29th January and then from 15th to 17th February 2022.


CSIR UGC NET Exam Date

UGC Net Exam Details : UGC NET exam dates have been announced by the National Testing Agency (NTA). The exam will start from January 29. The new schedule is posted on the NTA’s website. Further details are as follows:-

CSIR UGC NET Exam Date: यूजीसी नेट परीक्षेच्या तारखा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) जाहीर केल्या आहेत. २९ जानेवारीपासून या परीक्षेला सुरुवात होणार आहे. नवे वेळापत्रक एनटीएच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे. २९ जानेवारीपासून या परीक्षेला प्रारंभ होणार असून १७ फेब्रुवारीपर्यंत विविध तारखांना ही परीक्षा घेण्यात येईल.

याआधी ही परीक्षा ५ आणि ६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार होती. मात्र, त्याच दिवशी इतर काही परीक्षाही होणार आहेत. एकाच तारखेला असलेल्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून एनटीएने पेपरच्या तारखांमध्ये बदल केला आहे. २९ जानेवारी रोजी अर्थ, अॅटमॉस्फेरिक आणि प्लॅनेटरी सायन्सेसची परीक्षा होईल. त्यानंतर १५ फेब्रुवारीला फिजिकल सायन्सेस, १६ फेब्रुवारीला मॅथेमॅटिकल सायन्सेस आणि केमिकल सायन्सेस तर १७ फेब्रुवारीला लाइफ सायन्सेस या विषयांचे पेपर होतील. यासंदर्भातील वेळापत्रक आणि अॅडमिट कार्ड डाउनलोड करावयाची लिंक एनटीएच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ही परीक्षा कम्प्युटर आधारित पद्धतीने होणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी एनटीएच्या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

The NTA had first issued notice on December 27 regarding the test. The notice stated that the examination dates would be changed. Accordingly, a new schedule has been posted on the NTA’s website.


CSIR UGC NET Correction Window Active

UGC Net Exam Details : The CSIR UGC NET exam will be held from January 29, 15 to February 18, 2022. If there is any correction in the application, the correction window has been activated till January 9. Further details are as follows:-

CSIR UGC NET परीक्षा २९ जानेवारी, १५ ते १८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत घेतली जाणार आहे. अर्जात काही दुरुस्ती असल्यास ती करण्यासाठी ९ जानेवारीपर्यंत करेक्शन विंडो अॅक्टिव्ह करण्यात आली आहे.

All registered candidates for UGC NET Exam are advised to visit the website and view their details. Candidates can now make any corrections in their details in their respective registration form but after the last date of the correction window, in any case no corrections in details will be considered by NTA.

क्रेडिट/डेबिट कार्ड/नेट बँकिंग/यूपीआय किंवा पेटीएम वॉलेटद्वारे ऑनलाइन दुरुस्ती करताना संबंधित उमेदवाराकडून अतिरिक्त शुल्क भरले जाईल. ज्यांनी ८ जानेवारी २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी आवश्यक शुल्कासह अर्ज यशस्वीरित्या सबमिट केला आहे, अशा उमेदवारांसाठी सुधारणा सुविधा फक्त उपलब्ध आहे. CSIR UGC NET परीक्षा २९ जानेवारी, १५ ते १८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत घेतली जाणार आहे. परीक्षा दोन सत्रात घेतली जाईल.


CSIR UGC NET 2021

UGC Net Exam Details : The CSIR UGC NET exam will be held from January 29, 2022. Recently, the National Testing Agency (NTA) has announced revised test dates. Further details are as follows:-

CSIR UGC NET 2021: सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा २९ जानेवारी २०२२ पासून आयोजित केली जाणार आहे. अलीकडेच राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने म्हणजेच एनटीएने परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. 

NTA Official Notification नुसार, परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर केल्या आहेत, कारण तशी उमेदवारांची मागणी होती. २९ जानेवारी, ५ आणि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी या परीक्षा होणार होत्या. पण आता नव्या सुधारित वेळापत्रकानुसार आता परीक्षा २९ जानेवारी, १५ फेब्रुवारी आणि १८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत होणार आहेत. CSIR UGC NET Exam चे आयोजन दोन सत्रात केले जाईल. पहिले सत्र सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होईल, तर दुसरे सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत होईल. अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू आहे. इच्छुक उमेदवार csirnet.nta.nic.in वर जाऊन ३ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

सुधारित वेळापत्रक का? 

Earlier, the exams were scheduled to be held on February 5 and 6, 2022. But the exam was postponed due to clashes with some major exams. According to the official notice issued by the NTA, the entire schedule of the examination will be issued soon. Candidates should visit nta.ac.in snd csirnet.nta.nic.in for more information.


UGC NET 2021 Exam Date

UGC Net Exam Details : The National Testing Agency has changed the dates of UGC NET exams. In addition to the UGC NET exam on October 10, there are some other major exams. Therefore, the candidates had demanded that the examination should not be held on the same day. Accordingly, the examination will now be held in the first slot from October 6 to October 8. Further details are as follows:-

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी नेट परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केले आहेत. १० ऑक्टोबर रोजी UGC NET परीक्षेबरोबरच इतर काही प्रमुख परीक्षा देखील आहेत. त्यामुळे उमेदवारांनी या परीक्षा एकाच दिवशी होऊ नये अशी मागणी केली होती. त्यानुसार आता ६ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान पहिल्या स्लॉटमध्ये परीक्षा घेण्यात येईल.

तर दुसऱ्या स्लॉटमध्ये ही परीक्षा १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहे. तर यापूर्वी ही परीक्षा ६ ते ११ ऑक्टोबर २०२१ दरम्यान होणार होती. पण आता एनटीएने त्यात बदल केला आहे. एजन्सीने या संदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यानुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता चाचणीच्या डिसेंबर आणि जून सत्र २०२१ च्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आले आहेत.

सध्या यूसीसी नेट २०२१ ऑक्टोबर परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केला नसेल ते ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in आणि https://www.nta.ac.in/ वर लॉगिन करु शकतात.

UCG NET Exam Pattern 

यूजीसी नेट परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा असतो आणि परीक्षा एकूण तीन तासांची असते. परीक्षेमध्ये निगेटीव्ह मार्कींग नसते. यासोबतच दोन्ही पेपरमध्ये १५० प्रश्न असतात. ही परीक्षा वर्षातून दोनवेळा होणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. ही परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवाराला भारतातील कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये सहायक प्रोफेसर किंवा ज्युनिअर रिसर्च फलोशिप पदासाठी अर्ज करता येतो. उमेदवार पीचएडीसाठी देखील प्रवेश घेऊ शकतात


UGC NET Exam Dates

UGC Net Exam Details : Exam dates for the UGC Net December and June sessions have finally been announced. The exam in May 2021 was postponed due to corona. After that, they were waiting for the exam to take place. Details are given on the official website. Further details are as follows:-

यूजीसी नेट डिसेंबर आणि जून सत्रासाठी परीक्षेच्या तारखेची घोषणा अखेर करण्यात आली आहे. मे २०२१ मध्ये होणारी परीक्षा करोनामुळे स्थगित झाली होती. त्यानंतर ही परीक्षा कधी होणार याची वाट पाहीली जात होती. अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

यूजीसी नेट परीक्षेचे आयोजन ६ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या दोन सत्रात परीक्षा घेतली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यासंदर्भात नोटीस जाहीर केली आहे. यानुसार परीक्षेसाठी अर्ज करण्याचा अवधी वाढवून देण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अद्याप नोंदणी केली नसेल त्यांच्यासाठी ५ सप्टेंबरपर्यंत विंडो खुली असणार आहे. ६ सप्टेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. अर्जामध्ये बदल करण्यासाठी ७ ते १२ सप्टेंबरपर्यंत विंडो खुली असणार आहे.

UGC NET Exam Pattern 

यूजीसी नेट परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा असतो आणि परीक्षा एकूण तीन तासांची असते. परीक्षेमध्ये निगेटीव्ह मार्कींग नसते. यासोबतच दोन्ही पेपरमध्ये १५० प्रश्न असतात. ही परीक्षा वर्षातून दोनवेळा होणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. ही परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवाराला भारतातील कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये सहायक प्रोफेसर किंवा ज्युनिअर रिसर्च फलोशिप पदासाठी अर्ज करता येतो. उमेदवार पीचएडीसाठी देखील प्रवेश घेऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट – ugcnet.nta.nic.in


UGC NET Notification

UGC Net Exam Details : Important notifications have been released by UGC Net, which has been a great relief to many students during the Corona period. UGC NET 2021 exam schedule will be announced soon. A notification in this regard is expected to be published on the official website ugcnet.nta.nic.in soon. Further details are as follows:-

यूजीसी नेटतर्फे महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून यामुळे करोना काळात अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यूजीसी नेट २०२१ परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. यासंदर्भातील नोटिफिकेशन लवकरच अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी जेआरएफ (JRF) परीक्षा पास केली पण करोनामुळे त्यांना मास्टर्स डिग्री पूर्ण करता आली नाही अशा विद्यार्थ्याांसाठी यूजीसीने या नोटिफिकेशनमध्ये दिलासा दिला आहे. ज्या उमेदवारांनी डिसेंबर २०१८ मध्ये यूजीसी नेट (UGC NET) अॅण्ड जॉइंट सीएसआयआर यूजीसी (Joint CSIR UGC NET) टेस्ट क्वालिफाइड केली आहे त्यांना ३० जून २०२२ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. जे उमेदवार जून २०१९ मध्ये यूजीसी अॅण्ड नेट अॅण्ड सीएसआयआर यूजीसी टेस्ट पास झाले आहेत त्यांना ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत अतिरिक्त वेळ मिळाला आहे.

जे उमेदवार मास्टर डिग्री कोर्सचा अभ्यास पूर्ण करत आहेत ते देखील यूजीसी नेट एक्झाम (UGC NET 2021 Exam) साठी बसू शकतात. ज्या उमेदवारांनी आधीच मास्टर्स एक्झाम दिली आहे आणि आपल्या निकालाची वाट पाहत आहेत, ते देखील नेट एग्झाम देऊ शकतात.

UGC NET 2020 was postponed in December due to a corona outbreak. Thereafter, it was fixed between 2 May 2021 and 17 May 2021. So far UGC NET 2021 exam schedule has not been announced. Meanwhile, the notification of UGC Net 2021 is expected to be published on the official website ugcnet.nta.nic.in soon.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Sharad Taywade says

    Ha diploma ch hay n ya cha bes var job lagna ka nahi?

  2. Rohit says

    १)‌‌ माझा एक‌ आहे

  3. Dipali korde says

    Kadhi hoil mg net exam

  4. Patil Kajal Dipak says

    Arrival M.com in Account

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड