JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

यूजीसी-नेटचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा ; उद्या पासून परीक्षा | UGC NET Exam Date 2025

UGC NET Exam Date 2025

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने डिसेंबर २०२५ परीक्षेचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे.ही परीक्षा ३१ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत देशभरातील विविध केंद्रांवर संगणक-आधारित चाचणी पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.  इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन लवकरात लवकर प्रवेशपत्र डाउनवलोड करावे. 

प्रवेशपत्र डाउनलोड करा 

 

 

दोन पेपर एकाच सत्रात तीन तासांत परीक्षा केंद्रांची यादी परीक्षेच्या १० दिवस आधी एनटीएच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल ही परीक्षा संपूर्ण देशभरात ८५ विषयांसाठी कॉम्प्युटर बेस्ड पद्धतीने होईल. दोन पेपर एकाच सत्रात तीन तासांत होतील. यात ३०० गुणांसाठी १५० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

UGC NET Exam Date 2025

राज्य सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चिंतेची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ आणि यूजीसी-नेट डिसेंबर २०२५ परीक्षा दोन्ही ४ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही परीक्षांचा दिवस एकच आल्याने विद्यार्थी संभ्रमात असून नाराजी व्यक्त केली आहे.

मूळ वेळापत्रकानुसार MPSC ची गट-क परीक्षा ३० नोव्हेंबर २०२५ रोजी होणार होती. मात्र, त्याच दिवशी संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) इतर स्पर्धा परीक्षा आयोजित असल्याने उपकेंद्रांच्या उपलब्धतेत अडचणी येऊ नयेत म्हणून आयोगाने परीक्षेची सुधारित तारीख ४ जानेवारी २०२६ अशी जाहीर केली.

दरम्यान, राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) तर्फे यूजीसी-नेट डिसेंबर २०२५ परीक्षेचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, या परीक्षा ३१ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत देशभरातील विविध केंद्रांवर होणार आहेत. त्यामध्ये ४ जानेवारी रोजीची परीक्षा एमपीएससीच्या तारखेशी जुळल्याने विद्यार्थ्यांना दोन्हींपैकी एक परीक्षा निवडावी लागणार आहे.

यूजीसी-नेट परीक्षेद्वारे ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) मिळवणे किंवा प्राध्यापक होण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करतात, तर एमपीएससीद्वारे सरकारी नोकरीची संधी मिळते. दोन्ही परीक्षांसाठीची तयारी बऱ्याच अंशी समान असल्याने अनेक विद्यार्थी दोन्ही परीक्षा देण्याचा मानस बाळगतात. मात्र, आता दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

काही विद्यार्थ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, “आयोगाने तारीख बदलल्यानंतर आम्ही ४ जानेवारीसाठी गट-क परीक्षेची तयारी सुरू केली होती. पण आता यूजीसी-नेटची परीक्षा देखील त्याच दिवशी येत असल्याने आम्हाला एका संधीचा त्याग करावा लागणार आहे.”

या संदर्भात एमपीएससीने आपल्या परिपत्रकात नमूद केले आहे की, “सदर परीक्षेच्या दिवशी इतर कोणत्याही संस्थेची परीक्षा असल्यास, उमेदवाराने स्वतःच्या निर्णयाने कोणती परीक्षा द्यायची ते ठरवावे.”

 

 

 


UGC NET Exam Date 2025

UGC NET Exam Date 2025: यूजीसी नेट डिसेंबर सत्राच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार नेट डिसेंबर २०२४ ची परीक्षा १ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत होणार होती. परंतु, आता प्रसिद्ध केलेल्या विषयनिहाय वेळापत्रकानुसार परीक्षा ३ जानेवारी २०२५ पासून सुरू होईल आणि १६ जानेवारीला संपणार असल्याचे स्पष्ट केले आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केलेल्या विषयवार वेळापत्रकानुसार, ८५ विषयांसाठी परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. पहिल्या सत्राचा कालावधी सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत असेल, तर दुसऱ्या सत्राचा कालावधी दुपारी ३ ते सायंकाळी ६ पर्यंत असेल.

परीक्षेला उपस्थित होणाऱ्या उमेदवारांना वेळापत्रक आणि अधिक माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाइटवर https://ugcnet.nta.ac.in उपलब्ध असेल.

एनटीएने सूचित केले आहे की परीक्षेच्या शहराची माहिती परीक्षा सुरू होण्याच्या आठ दिवस आधी, म्हणजेच २७ डिसेंबर २०२४ पर्यंत उपलब्ध करून दिली जाईल.

असे आहे नेट परीक्षेचे वेळापत्रक:
३ जानेवारीला पहिल्या सत्रामध्ये सार्वजनिक प्रशासन आणि दुसऱ्या सत्रामध्ये अर्थशास्त्र.
६ जानेवारीला कॉम्प्युटर सायन्स, बंगाली, चायनीज, राजस्थानी आणि इतर विषयांच्या परीक्षा घेतल्या जातील. त्याचबरोबर राज्यशास्त्रासह इतर विषयांच्या परीक्षा दुसऱ्या सत्रामध्ये होणार आहेत.
७ जानेवारीला दुसऱ्या सत्रामध्ये वाणिज्य, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी, सामाजिक कार्य यासह इतर विषयांच्या परीक्षा होतील.
गृहविज्ञान आणि संगीत विषयांची परीक्षा ८ जानेवारीला घेण्यात येणार आहे

 


UGC NET Exam Date 2025

UGC NET Exam Date 2025: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) मार्फत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी ‘यूजीसी नेट’ ही परीक्षा १ ते १९ जानेवारी २०२५ मध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १० डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राष्ट्रीय स्तरावर सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ संशोधन फेलोशिप आणि पीएच.डी. प्रवेश यासाठी पात्रता परीक्षा म्हणून ही परीक्षा घेतली जाते. एकूण ८५ विषयांमध्ये संगणक आधारित चाचणी या पद्धतीने घेतली जाते. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना १० डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

परीक्षेसाठीच्या ऑनलाइन अर्जाचे शुल्क भरण्यासाठी ११ डिसेंबरपर्यंत मुदत आहे, तर ऑनलाइन अर्जात दुरुस्ती १२ ते १३ डिसेंबर या कालावधीत करता येईल, असे ‘एनटीए’तर्फे सांगण्यात आले. अधिक माहितीसाठी https:// ugcnet.nta.ac.in किंवा www. nta.ac.in या वेबसाइटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


UGC NET Exam Date Subject Wise 2024

नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएतर्फे घेतल्या जाणाऱ्या युजीसी नेट परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा सुधारणा केली आहे. येत्या २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत ८३ विषयांची वेगवेगळ्या दिवशी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यामधील २६ ऑगस्ट रोजी येणाऱ्या श्री कृष्ण जन्माष्टमी सणामुळे या दिवसाची सर्व परीक्षा २७ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. या दिवशी ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा होत आहे. त्या विद्यार्थ्यांनी हा बदल लक्षात घ्यावा अशा सूचना केल्या आहेत.
गेल्या २ ऑगस्ट एनटीएने ८३ विषयांसाठी होत असलेल्या या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले होते, त्यानुसार हिंदी आणि तत्त्वज्ञान या विषयांची परीक्षा २६ ऑगस्ट रोजी पहिल्या सत्रात सकाळी ९ ते १२ या वेळेत होणार होती.
यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजेच दुपारी ३ ते ६ या वेळेत हिंदी, उडिया, नेपाळी, मैनपुरी, आसामी आणि संथाली या भाषांच्या परीक्षा होणार होत्या. मात्र, आता नवीन बदलानंतर या विषयांच्या परीक्षा २७ ऑगस्टला त्याच सत्रामध्ये घेतल्या जाणार आहेत. ऑगस्ट परीक्षेच्या केंद्रानुसार सूचना स्लिप माहिती देण्यात येत आहे.

UGC NET 2024 Exam Date : National Testing Agency (NTA) has published a notification for City intimation slips for exams on August 21st, 22nd, and 23rd, 2024, are available. Slips for other dates will be released soon. Please check your photo ,signature and QR code on your City Intimation. If either the photo,signature or the QR code is missing, kindly re-download it..

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2024 रोजी परीक्षांसाठी सिटी इंटिमेशन स्लिप्ससाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. इतर तारखांच्या स्लिप्स लवकरच प्रसिद्ध केल्या जातील. कृपया तुमच्या शहराच्या माहितीवर तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि QR कोड तपासा. फोटो, स्वाक्षरी किंवा QR कोड गहाळ असल्यास, कृपया ते पुन्हा डाउनलोड करा..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

The National Testing Agency (NTA) will conduct UGC – NET June 2024 Examination in Computer Based Test (CBT), mode for 83 subjects at different cities across the country between 21st August 2024 to 04th September 2024. The NTA is now displaying the Advance Intimation for Allotment of Examination City for UGC –
NET June 2024 to be conducted on 21st, 22nd & 23rd August 2024. Subject – wise details are mentioned in Annexure – I.

The candidates are advised to check/download their Examination City Intimation Slip of UGC – NET June 2024, (using their Application No. and Date of Birth) from the website https://ugcnet.nta.ac.in/w.e.f. 12th August 2024 and go through the instructions contained therein. The Candidates may please note that this is NOT the Admit Card for the examination. This is advance information for the allotment of the city where the Examination Centre will be located, to
facilitate the candidates.

The Admit Card of UGC – NET June 2024 shall be issued later. In case any candidate faces difficulty in downloading/checking the Examination City Intimation Slip for UGC – NET June 2024, he/she can contact on 011-40759000 or e-mail at [email protected]. The Candidates are also advised to visit the NTA website(s) www.nta.ac.in and https://ugcnet.nta.ac.in//, for the latest update


 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड