खुशखबर – राज्यातील 15 विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार | TISS Admission 2022

TISS Admission 2022

TISS Admission 2022

TISS Admission 2022Employment opportunities for students in the state. Registration from 1 October. Education and employment opportunities will be available to 15 thousand students of class 12th in the state. Further details are as follows:-

शिक्षण आणि रोजगाराच्या संधी यांचे प्रमाण व्यस्त असल्यामुळे राज्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे विद्यार्थीदशेत मुलांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार राज्यातील बारावीच्या १५ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • यासाठी राज्य शासनाने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत नुकताच सामंजस्य करार केला असून, यासाठीच्या नोंदणीचा श्रीगणेशा १ तारखेपासून पासून झाला आहे.
  • ग्रामीण भागातील गरजू, होतकरू विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, अशी शासनाला अपेक्षा आहे. टाटा इन्स्टिट्यूटच्या वतीने स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या करारानुसार या अभ्यासक्रमासाठी https://admissions.tiss.edu या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार असून, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रवेशाची अंतिम तारीख असेल.

जानेवारी २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष अभ्यासक्रमाची सुरूवात होणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आधारित प्रमाणपत्र देण्यात येईल. यामध्ये पहिल्या वर्षानंतर डिप्लोमा कोर्स, दुसऱ्या वर्षानंतर ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स तर तिसऱ्या वर्षानंतर बॅचलर इन व्होकेशनल एज्युकेशन हे प्रमाणपत्र मिळेल.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या नामांकित मानद विश्‍वविद्यालय संस्थेच्या ‘स्कुल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन’ या विभागाद्वारे युजीसी निकषानुसार पदविका व पदवी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • यासाठी ‘कमवा व शिका’ या तत्वावर कोणत्याही शाखेचा विद्यार्थी बारावीनंतर प्रवेश घेऊ शकेल.
  • या संस्थेने अभ्यासक्रमाकरीता ३ हजार ७५० उद्योगांसोबत करार केला असून, विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर त्यांच्या आवडीनुसार विषय अथवा जॉबरोल निवडण्याची सोय उपलब्ध असणार आहे.
  • समग्र शिक्षा कार्यालयाने जागतिक बँक पुरस्कृत ‘स्टार्स’ प्रकल्पांतर्गत ‘मिलाप’ (Maharashtra Young Leaders Aspirations Development Programme) हा कार्यक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे.
  • राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
  • या नोंदणीसाठी https://registrations.hcltechbee.com/ हे संकेतस्थळ उपलब्ध आहे. आतापर्यंत ३४ हजार विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे.

“सामंजस्य कराराद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असून, स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. जास्तीत जास्त गरजू, इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.”
– कैलास पगारे, समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड