गुगलने विद्यार्थ्यांसाठी लाँच केलं ‘एनिवेअर स्कूल’ – ५० नवे फिचर्स!
The Anywhere School With Over 50 New Features
The Anywhere School With Over 50 New Features : गुगलने लाँच केलं ‘एनिवेअर स्कूल’; ५० विविध फिचर्स. गुगलने विद्यार्थ्यांसाठी आणले आहेत ५० नवे फिचर्स…
Google the anywhere school: सध्या केवळ भारतातच नव्हे तर जगभरात विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. या कोट्यवधी विद्यार्थ्यांसाठी गुगलने एक नवं पाऊल उचललं आहे. ‘द एनीवेअर स्कूल’ नावाचा नवा उपक्रम गुगलने लाँच केला आहे. यात मीट, क्लासरुम, जी सुईट आणि अन्य प्रोडक्टसह ५० नवे फिचर्स आणले आहेत. जगभरातील २५० देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सप्टेंबर महिन्यात, गुगल मीट या गुगलच्या अॅपवर तब्बल ४९ लोक दिसतील असे बदल करण्यात येणार आहेत. कंपनीने मंगळवारी जारी केलेल्या एका निवेदनानुसार, लवकरच आणखी नवी वैशिष्ट्ये गुगल विद्यार्थी-शिक्षकांसाठी आणणार आहे. मॉडरेटर नेहमी पहिल्यांदा जॉइन होऊ शकेल आणि मीटींग बंद करू शकेल अशी व्यवस्था, इन-मिटींग चॅट डिसेबल होणे या आणि अशा अनेक नव्या वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात गुगल मीट चा बॅकग्राउंड ब्लर करण्याची सुविधा देणार आहे. गुगलच्या शिक्षण विभागच्या उपाध्यक्ष अवनी शाह म्हणाल्या, ‘ब्रेकआऊट रुम्स, अटेंडन्स ट्रॅकिंगसारखे अनेक फिचर गुगल विद्यार्थी-शिक्षकांसाठी लाँच करणार आहे.’ येत्या वर्षअखेर कंपनी हँड रेझिंग, प्रश्नोत्तरे, पोलिंगसारखे फिचर आणणार आहे. तसेच टेम्पररी रेकॉर्डिंगसारखं फिचर सर्व एज्युकेशन कस्टमर्सना मोफत उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे शहा यांनी सांगितले.
जगभरात गुगल क्लासरुम ही वेब सर्विस शाळा कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. विद्यार्थ्यांना फायदेशीर होईल असे ‘टू-डू विजेट ऑन क्लासेस पेज’ गुगल आणणार आहे. शिक्षक आता विद्यार्थ्यांना क्लासमध्ये इन्वाइट करण्यासाठी लिंक शेअर करू शकतात. क्लासरुम आता आणखी दहा भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे, यानंतर एकूण भाषांची संख्या ५४ वर जाणार आहे.
सोर्स : म. टा.