ठाणे परिवहन विभागात ४८६ वाचकांची भरती होणार! – Thane Parivahan Bharti
TMT Bharti 2024
Thane Parivahan Bharti – परिवहन सेवेत नोकरीची संधी – ठाणे जिल्ह्यातील ४८६ कंत्राटी वाहकांची केली जाणार भरती. टप्याटप्याने इलेक्ट्रिक बसचा समावेश होत आहे. तसेच येत्या काळात आणखी नव्याने बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. परंतु, परिवहनच्या ताफ्यात वाहकांची कमतरता असल्याने आजघडीला रोजच्या रोज २० ते ३० फेऱ्या रद्द होत आहेत. त्याचा फटका रोज परिवहनला सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता परिवहनने तब्बल ४८६ वाहकांची कंत्राटी स्वरुपात भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
परिवहनच्या ताफ्यात सद्यस्थितीला ३५०च्या आसपास बसेस आहेत. त्यात ११३च्या आसपास इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. त्यातील ९९ बस रस्त्यावर धावत आहेत. उर्वरित सात बस या वाहक नसल्याने आगारात पडून आहेत. परिवहनच्या ताफ्यात आजघडीला कंत्राटदाराच्या २४०, परिवहनच्या स्वतःच्या १५० च्या आसपास, व्होल्वो ३०, इलेक्ट्रिक ११३ बसेस आहेत. परिवहनमधून रोज दोन ते अडीच लाख प्रवासी प्रवास करतात. दुसरीकडे, परिवहनच्या ताफ्यात असलेल्या बसपैकी यापूर्वी १५३ बस या जुन्या झाल्याने भंगारात काढल्या, तसेच काही दिवसांपूर्वी आणखी १७ बस भंगारात काढल्या आहेत. परंतु, आता परिवहनच्या ताफ्यात बसेसची संख्या वाढत आहे.
येत्या काळात परिवहनच्या – ताफ्यात पीएम ई – बस योजनेतून पालिकेला १०० इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. परिवहन उपक्रमामध्ये ९५२ वाहक कार्यरत आहेत. त्यामध्ये ६२१ कायमस्वरुपी आहेत. उर्वरित कंत्राटी वाहक आहेत. त्यात २०६ पुरुष आणि १२५ महिलांचा समावेश आहे. ठाणे परिवहन कार्यालयाच्या इतर विभागातील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या कामाचा भार काही कायमस्वरुपी वाहकांवर सोपविला आहे. ६२१पैकी १८० वाहकांना कार्यलयीन कामांचा पदभार दिला आहे. त्यामुळे वाहकांची संख्या कमी झाल्याने बसफेऱ्यांवर परिणाम झाला आहे.
Comments are closed.