महाराष्ट्रातील तरूणांसाठी सैन्य दलात नोकरीची संधी
महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली असून भारतीय सैन्य दलाने 10 दिवसाच्या नोकर भरती मेळाव्या द्वारा सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर टेक्निकल. सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन अॅण्ड अॅम्युनिअशन), सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट), सोल्जर टेक्निकल ( नर्सिंग असिस्टंट/ व्हेटरनरी), सोल्जर ट्रेडमॅन, सोल्जर स्टोअरकिपर टेक्निकल, शिपाई, हवलदार आणि सोल्जर ज्युनिअर कमिशन ऑफिसर या पदांसाठी भरती होणार आहे. महाराष्ट्रातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार वरील पदांसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात.
मुंबई शहर, उपनगर व परिसरातील जिल्ह्यात राहणाऱ्या तरुणांना अनेक वर्षांनी लष्करात भरती होण्याची संधी आहे. तीन टप्प्यांत होणारी ही भरती पुढील महिन्यात मुंब्रा येथे होत आहे. मुंबईतील लष्कर भरती कार्यालयाकडून ही मोहीम राबवली जाणार आहे.
भरतीची तारीख व ठिकाण
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ही भरती १३ ते २३ डिसेंबर २०१९ दरम्यान मुंब्र्यातील कौसा व्हॅली येथील अब्दुल कलाम आझाद क्रीडा संकुलाच्या मैदानावर होईल.
- या जिल्ह्यातील युवकांना संधी : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड व नाशिक
भरतीचे निकष
पद जन्म दिनांक उंची वजन छाती (न फुगवता/फुगवून) शिक्षण
शिपाई (सामान्य) १ ऑक्टोबर १९९८ १६८ सेंमी ५० ७७/८२ किमान ४५ टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण.
ते प्रत्येक विषयात किमान ३३ टक्के गुण
१ एप्रिल २००२
शिपाई (तांत्रिक) १ ऑक्टोबर १९९६ १६७ सेंमी ५० ७६/८१ किमान ५० टक्क्यांसह विज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण
ते प्रत्येक विषयात किमान ४० टक्के गुण
१ एप्रिल २००२
शिपाई (नर्सिंग) वरीलप्रमाणे वरीलप्रमाणे ५० वरीलप्रमाणे वरीलप्रमाणे
शिपाई (तांत्रिक लिपीक) वरीलप्रमाणे १६२ सेंमी ५० ७७/८२ ६० टक्के गुणांसह कुठल्या शाखेतील बारावी उत्तीर्ण प्रत्येक विषयात किमान ५० टक्के तसेच इंग्रजी, बूक किपिंग ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आवश्यक
शिपाई (ट्रेडमन) वरीलप्रमाणे १६८ सेंमी ४८ ७६/८१ किमान आठवी ते दहावी उत्तीर्ण
अशी होईल निवड प्रक्रिया
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांची जिल्हा किंवा तालुका स्तरावर तपासणी होईल. या तपासणीची वेळ, तारीख व ठिकाण प्रवेश पत्रावर नमूद असेल. तपासणीनंतर प्रत्यक्ष भरतीच्या दिवशी (मुंब्रा येथे) शारीरिक व वैद्यकीय तपासणी होईल. दोन्ही तपासण्या यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवाराची लेखी परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारीत घेतली जाईल. त्यानंतर प्रशिक्षणासाठी अंतिम निवड केली जाईल.
भारतीय सैन्य दलात नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांनासाठी भारतीय सैन्य दलाने त्याच्या वेबसाईटवर नवी संधी निर्माण करुन दिली आहे. भारतीय सैन्य दलाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात 10 ते 13 डिसेंबर दरम्यान ठाणे परिसरात नोकर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करावा लागणार. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी अर्जदाराला भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत वेबसाईवर भेट द्यावी लागणार आहे. तसेच नोकरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराला नोकरीची संधी देण्यात येणार आहे.
दहा दिवस चालणाऱ्या या खुल्या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ज्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या ईमेल आयडीवर प्रवेशपत्र पाठवण्यात येणार आहे.
प्रवेश पत्रकावर नमूद करण्यात आलेल्या तारखांनुसार उमेदवारांना भरतीसाठी हजर व्हावं लागणार आहे. ज्यामध्ये बायोमॅट्रीक प्रणाणीने त्यांची पडताळणी झाल्यानंतर पुढे तीन टप्प्यांच्या भरती प्रक्रियेसाठी त्यांना पाठवण्यात येणार आहे. शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि सर्वसाधारण प्रवेश परीक्षा (लेखी) असे टप्पे उमेदवारांना पार करावे लागणार आहेत. पहिल्या दोन्ही चाचण्यांमध्ये यशस्वी झालेले उमेदवार तिसऱ्या टप्प्यासाठी पात्र असतील. भरतीचा तिसरा टप्पा २०२० जानेवारी- फेब्रुवारी या महिन्यांमध्ये होणार आहे. ज्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना पुढे सैन्यदलाच्या सेवेत रुजू होण्याची संधी मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा – 022-22153510
Mumbai Thane Army Rally 2019 from 10th December 2019 to 13 December 2019.
आयटीआय फिटर नौकरी
Joining
I will appreciate that you are giving Notice for Recruitment in Army. Those who are interested to join in Army they can be ready to go there as per your given instructions. Thanks.I am an Retired Air Veteran.