खुशखबर! आज या महिलांच्या खात्यात होणार १० हजार रुपये जमा!
Ten Thousan for womnes sarkari yojna
Ten Thousan for womnes sarkari yojna – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, बिहारमधील नितीश कुमार-भाजप सरकारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेंतर्गत, उद्या (शुक्रवारी) राज्यातील सुमारे साडेसात लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये थेट हस्तांतरित करण्यास सुरुवात होईल. मुख्यमंत्री नितीशकुमार तब्बल ७५० कोटी रुपयांचा या योजनेचा पहिला हप्ता प्रसृत करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. बिहार सरकारने यापूर्वी २२ सप्टेंबर रोजी या योजनेंतर्गत निधी हस्तांतरित करण्याचे वेळापत्रक निश्चित केले होते. मात्र विविध कारणांमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. आता उद्या महिलांच्या खात्यात हा निधी जमा केला जाईल.
मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी आणि उपजीविकेसाठी प्रोत्साहन म्हणून ही १०,००० रुपयांची एकरकमी रक्कम देण्यात येणार आहे. सहा महिन्यांनंतर मूल्यांकन करून महिलांना २ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त मदत दिली जाईल, असे आश्वासन बिहार सरकारने दिले आहे. नितीश कुमार यांनी गेल्या महिन्यात या योजनेची घोषणा केली आणि ७सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली. ग्रामीण आणि शहरी भागातील १ कोटींहून अधिक महिलांनी आत्तापर्यंत अर्ज केले असून, यातील सुमारे ७५ लाख महिलांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १०,००० रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. उर्वरित पात्र महिलांना टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जाईल. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम हस्तांतरित करण्याचा सरकारचा मानस आहे. ही योजना केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेली “मोफत रक्कम” नसून, महिलांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याचा एक प्रयत्न आहे. म्हणजेच, या योजनेंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येतील, असे सरकारने म्हटले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕GGMC मुंबई मध्ये 421 रिक्त पदांकरिता भरती सुरु; १०वी पास उमेवारांना संधी
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅नागपूर महानगरपालिका अंतर्गत १७४+ रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!
✅ ठाणे महापालिकेत तब्बल 1775 पदांसाठी भरती सुरु!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आत्तापर्यंतची सर्वाधिक लाभ रक्कम
महिलांसाठीच्या योजनांमधील ही आत्तापर्यंतची सर्वाधिक रक्कम आहे. भाजप व एनडीएने याआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महाराष्ट्र, त्याआधी मध्य प्रदेश व अलीकडे दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या आधी महिलांना रोख रक्कम देण्याची रणनीती राबविली होती. एनडीएला या योजनेने त्या-त्या वेळी निवडणुकीत भरपूर प्रमाणात लाभ झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणासारख्या राज्यांत पात्र महिलांना प्रत्येकी २,१०० रुपये देण्यात आले. मागील वर्षी झालेल्या जम्मू-काश्मीर निवडणुकीत माँ सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी १८,००० रुपये व भाजपचे सरकार आले तर उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी दोन मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते.