iPhone निर्माता फॉक्सकॉन करणार 40 हजार पदांची भारतात मोठी भरती! – Telecom Sector Recruitment

Telecom Sector Recruitment by foxconn

आयफोन बनवणारी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी फॉक्सकॉनने (foxconn) मोठी घोषणा केली आहे. फॉक्सकॉन कंपनी भारतात (India) 1200 कोटी रुपये खर्च करून 40 हजार रोजगार निर्माण करण्याच्या तयारीत आहे.  फॉक्सकॉनचा भारतातील व्यवसाय 2024 पर्यंत 10 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाणार आहे. त्यामुळं रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत. Foxconn ने त्याच्या कर्नाटक स्थित कंपनी Hon High Technology India Mega Development Private Limited मध्ये सुमारे 1,200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. Foxconn Singapore Pvt. या कंत्राटी आयफोन उत्पादन कंपनीच्या सिंगापूर युनिटने अलीकडेच 10 रुपये प्रति शेअर दराने Foxconn Hon Hi Technology India Mega Development Pvt Ltd चे 120.35 कोटी पेक्षा जास्त शेअर्स खरेदी केले आहेत. कर्नाटक सरकारने गेल्या आठवड्यात एका निवेदनात म्हटले होते की फॉक्सकॉन डोड्डा बल्लापूरजवळ एक प्रचंड उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी 25000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. ज्यामुळं 40,000 रोजगार निर्माण होतील. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

FoxCom Jobs

 

चीन नंतर भारतातील दुसरा सर्वात मोठा प्लांट कर्नाटकमध्ये असलेले हे युनिट लवकरच फॉक्सकॉनचा चीननंतरचा दुसरा सर्वात मोठा प्लांट असेल. यातून 40000 थेट रोजगार निर्माण होणार आहेत. फॉक्सकॉनचा भारतातील व्यवसाय 2024 पर्यंत 10 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाणार आहे. अलीकडील गुंतवणुकीसह, फॉक्सकॉन सिंगापूरने कर्नाटक युनिटमध्ये एकूण 13,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. कर्नाटक सरकारने फॉक्सकॉनला राज्यातील आगामी मोबाइल उत्पादन युनिटसाठी 300 एकर जमीन दिली आहे. भारतात आतापर्यंत 1.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक फॉक्सकॉनने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आतापर्यंत भारतात 1.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. आम्ही येत्या वर्षात बरेच काही करु अशी माहिती सीईओ यंग लिऊ यांनी दिली.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. Megha Ramesh atugade says

    Majhi 12 jhaliye. Mscit typing jhalay. Ahe ka vacancy plz tell

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड