शिक्षक भरती आता लॉकडाऊन नंतरच
Teacher Recruitment After Lockdown
शिक्षक भरतीचा मुहूर्त टळणार लॉकडाऊन संपल्यानंतरच मिळणार गती
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दीर्घकाळ रखडलेली शिक्षक भरती सुरू करण्यासाठी शासनाने हालचाल सुरू केली होती. मात्र, सध्याचा कोरोना परिस्थिती मुले आता लॉकडाऊन मागे घेतल्याशिवाय पुन्हा हे पुन्हा पवित्र पोर्टलचे काम सुरळीत होऊ शकणार नाही. त्यातच सध्या राज्यामध्ये असणाऱ्या जिल्हाबंदीचा निर्णय शिथील केल्याशिवाय खासगी संस्थांनाही शिक्षक भरती करता येणे कठीण होणार आहे.
शिक्षण विभागाच्या वतीने यंदा मार्च अखेरपर्यंत ही भरतीप्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न होता. या माध्यमातून राज्यातील सुमारे बारा हजारावर जागांची भरती होण्याची अपेक्षा उमेदवारांमध्ये होती. मात्र आता प्रक्रियेत अडकलेल्या उमेदवारांची भरती करोनामुळे आणखीच प्रलंबित राहण्याची भीती उमेदवेारांमधून व्यक्त होऊ लागली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कोरोनामुळे टीईटीचा निकालही लांबणीवर
तसेच, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) या परीक्षेचा निकालदेखील कोरोना प्रादुर्भाव मुळे लांबणीवर पडला आहे. या परीक्षेची अंतरीम उत्तरसूची जाहीर करण्यात आल्याने उमेदवारांना अंतिम निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यंदा शासनाने नवीन नियमानुसार काही नवीन वर्गवारीसाठी गुणांचीही सवलत वाढविली आहे. नव्या नोंदींनुसार निकषांमध्ये बसणाऱ्या उमेदवारांना या सवलतीचा फायदाही देण्यात येत आहे. मात्र यंदा करोनाच्या फटक्याने टीईटी परीक्षेचाही निकाल लांबल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.
Kitvi pass war aahe bharti