TATA समूह पाच वर्षांत पाच लाख रोजगार देणार; पात्रता आणि अर्ज कसा करायचा! – TATA Group Mega Bharti 2024

TATA Group Mega Bharti 2024

TATA Group Mega Bharti 2024

टाटा समूह हि एक आघाडीची कंपनी आहे. रोजगार निर्मिती मध्ये टाटा ग्रुप चा मोठा वाटा आहे. आता, वस्तुनिर्मिती (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्राचे महत्त्व उत्तरोत्तर वाढत असून, हे क्षेत्र आगामी काळात अधिकाधिक रोजगारक्षम होणार आहे. वस्तुनिर्मिती क्षेत्राची ही क्षमता ओळखून टाटा समूहाने येत्या पाच वर्षांत या क्षेत्रात पाच लाख नवे रोजगार निर्माण करण्याचा संकल्प सोडला आहे. सेमीकंडक्टर, ई-वाहने, बॅटरी आणि संबंधित उद्योग यांच्यात हे रोजगार निर्माण केले जातील, असे टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी मंगळवारी सांगितले. ‘इंडियन फाउंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंट’ या संस्थेच्या कार्यक्रमात चंद्रशेखरन बोलत होते. वस्तुनिर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रामणावर रोजगार निर्माण केल्याखेरीज देशाला विकसित देश हा दर्जा प्राप्त करता येणार नाही. सेमीकंडक्टर क्षेत्रातील टाटा समूहातील गुंतवणूक, प्रेसिशन निर्मितीसाठी केलेली गुंतवणूक, ई-वाहने, बॅटरी आणि संबंधित उद्योग यांच्यात टाटा समूहाने गुंतवणूक केली आहे; जेणेकरून टाटा समूह येत्या पाच वर्षांत पाच लाख नवे रोजगार निर्माण करू शकेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ता संदर्भातील पूर्ण विविध जाहिराती लवकरच प्रकाशित होतील. 

TATA JOBS
टाटा समूहाचा सेमीकंडक्टर प्रकल्प आसाममध्ये आकारास येत आहे. याच राज्यात ई-वाहने आणि बॅटरी यांच्या निर्मितीचे प्रकल्पही येऊ घातले आहेत. या सर्व प्रकल्पांच्या अनुषंगाने छोटेमोठे असे जवळपास पाच हजार कारखाने निर्माण होतील. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. सरकारलाही वस्तुनिर्मिती क्षेत्राचे महत्त्व कळले आहे. सरकारने वस्तुनिर्मिती क्षेत्राला चालना देण्याचे धोरण अवलंबले आहे. देशात सध्या सुमारे १० लाख नागरिक दरमहा रोजगारक्षम होत आहेत. त्यामुळे रोजगारांची निर्मिती करणे अपरिहार्य आहे, असेही चंद्रशेखरन यांनी सांगितले.

 


आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

टाटासारख्या मोठ्या कंपनीत नोकरी करावे, असे अनेकांना वाटते. जर तुम्हालाही टाटामध्ये नोकरी करायची असेल तर सध्या टिआरएफमध्ये नोकरीची संधी आहे.चांगल्या कंपनीत जास्त पगाराची नोकरी मिळावी, अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यात अनेकांचे टाटासारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याचे स्वप्न असते. टाटा इंडस्ट्रीमध्ये असलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च टीआरएफमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. टिआरएफमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही भारत सरकारची अणुऊर्जा विभागाची संस्था आहे.त्यामुळे सरकारी नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. (Tata Jobs) या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

TRF मध्ये सायंटिफिक ऑफिसर, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सुपरवायजर कॅन्टीन, क्लर्क, वर्क असिस्टंट अशा अनेक पदांसाठी भरती सुरु आहे. टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्जमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि शिक्षण संस्थेतून आयटीआय/बारावी / ग्रॅज्युएशन / बीई / बीटेक / कॉम्प्युटर सायन्स, आयटी इलेक्ट्रॉनिक्स, हॉटेल मॅनेजमेंट पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. टिआरएफमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी विविध विषयात पदवी आणि मास्टर्स केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

टाटा इन्स्टिट्यूटच्या या भरतीसाठी २८ ते ४३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोगटात सवलत देण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १८५०० ते १ लाख १० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीद्वारे केली जाणार आहे. (Tata Institute Of Fundamental Research Job) टिआरएफमधील या नोकरीसाठी उमेदवार ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे. उमेदवारांना मुदतीपूर्वी अर्जाची हार्ड कॉपी प्रशासकीय अधिकारी, रिक्रूटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्ज १, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४०००५ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

 


 

टाटा इलेक्ट्रॉनिक्स लवकरच होसूर येथील नवीन आयफोन असेंबली प्लांटमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. नवीन भरतीच्या माध्यमातून तब्बल २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या भरतीनंतर प्लांटमधील कर्मचाऱ्यांची संख्या ४० हजारांपर्यंत पोहोचेल, अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत कंपनीने होसूर, कृष्णगिरी येथे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स कारखाना उभारला आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स होसूर युनिटमध्ये २० हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याची घोषणा चंद्रशेखरन यांनी केली. त्यानंतर आता प्लांटमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. 

 

ते म्हणाले, हा केवळ कारखाना नाही, तर अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे युनिट आहे. या प्लांटमध्ये उच्च दर्जाची वाहने तयार केली जातील. प्रथमच टाटा इलेक्ट्रॉनिक्सकडून प्रगत प्लॅटफॉर्म टाटा मोटर्स आणि जग्वार लँड रोव्हर (JLR) द्वारे संयुक्तपणे विकसित केले जाईल. एकदा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर, कारखाना ५ हजारांहून अधिक थेट नोकऱ्या निर्माण होतील. कंपनी एक नवीन परिसंस्था विकसित करेल, ज्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असेही अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी सांगितले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Shubham mandhare says

    How to apply?

  2. Sandip sasane says

    Salyri

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड