तारापूर अणूऊर्जा केंद्र पदभरती चाचणी आक्षेपार्थ, भरती रद्द करण्याची मागणी! – TAPS Tarapur Bharti 2024
TAPS Tarapur Recruitment 2024
तारापूर अणुऊर्जा केंद्रात (टॅप्स) रिक्त असणाऱ्या ५५ जागांसाठी घेतलेल्या कौशल्य चाचणी परीक्षेत अनुत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांची फेरचाचणी घेण्यावर प्रकल्प पीडितांनी आक्षेप घेतला आहे. काही विशेष उमेदवारांसाठी हा घाट घालण्याचा प्रकार आहे, असा संशय व्यक्त करत संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी तसेच भारतीय अणुऊर्जा महामंडळाच्या (एनपीसीआयएल) वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अणुशक्ती प्रकल्प पीडित जनता रोजगार समितीने केली आहे. तारापूर अणुऊर्जा केंद्रातील मनुष्यबळ विकास, वित्त तसेच भांडार (स्टोअर्स) विभागातील ५५ जागांसाठी १८ व १९ एप्रिल २०२३ मध्ये लेखी परीक्षेची प्राथमिक फेरी घेण्यात आली होती. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची २० एप्रिल रोजी द्वितीय परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत अनेक स्थानिक व प्रकल्पग्रस्त उमेदवार सहभागी होते. यामध्ये टॅप्समधील निविदा विभागात काम करणारे एक कंत्राटी कर्मचारी, त्यांची पत्नी, एक बहीण-भाऊ व तिची मैत्रीण यांना नेत्रदीपक यश मिळाले होते. या निकालाबाबत वरिष्ठांकडून संशय व्यक्त करण्यात आला. या परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाला का? याबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती, असे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले. गैरप्रकाराबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ मध्ये २७ मे २०२३ रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रकल्प पीडितांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कथित गैरव्यवहाराबद्दल तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी टॅप्सचे पदाधिकाऱ्यांना या प्रकरणात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते.
‘टॅप्स’चा इन्कार
सर्व आरोप ‘टॅप्स’ व्यवस्थापनाने फेटाळले आहेत. एनपीसीआयएलच्या तारापूर अणुऊर्जा केंद्राने भरतीसाठी निश्चित केलेल्या नियमांनुसार लेखी परीक्षा प्रक्रिया पार पाडली आहे. भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार नाहीत. उमेदवार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यात आली आहेत. परीक्षांचे निकाल उमेदवार लॉगिनमध्ये उपलब्ध आहेत, असे व्यवस्थापनाने विचारलेल्या प्रश्नावलीच्या उत्तरात स्पष्ट केले आहे. भरती रद्द करणे अथवा सुरू ठेवण्याचा निर्णय, नियमांनुसार घेतला जातो. कौशल्य चाचणी परीक्षा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेतला जातो, व्यवस्थापनाने म्हटले आहे. अधिक माहितीसाठी npcilcareers. co. in वेब पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यानच्या काळात ५ जुलै २०२३ रोजी त्रयस्थ संस्थेमार्फत दुसऱ्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या निवडक उमेदवारांची कौशल्य चाचणी मुंबई येथे घेण्यात आली होती. त्यामध्ये दोन-तीन उमेदवारांची निवड झाल्याचे सांगण्यात आले. या उमेदवारांना त्यांच्या कागदपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी लवकरच पाचारण करण्याचे एसएमएसद्वारे कळविण्यात आले होते. तर दुसरीकडे चौकशीदरम्यान नेत्रदीपक यश मिळवलेल्या उमेदवारांना साध्या प्रश्नांची उत्तर देणे शक्य झाले नव्हते, अशी माहिती अशी माहिती देण्यात आली होती.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दरम्यानच्या काळात या भरती प्रक्रियेत कोणतीही प्रगती झाली नाही. आता काही दिवसांपूर्वी बदललेल्या रिक्त पदांच्या संख्येच्या आधारे व पूर्वी झालेली कौशल्य चाचणी रद्द केल्याने एप्रिलअखेरीस अथवा मे महिन्यात नव्याने कौशल्य चाचणी घेण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र ही परीक्षा स्थानीय पातळीवर उत्तीर्ण न होऊ शकलेल्या काही विशेष उमेदवारांना रिक्त जागांवर सामावून घेण्यासाठी आयोजित केली जात असल्याचा संशय समितीतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
या संदर्भात समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची भेट घेऊन मागणीसंदर्भात पाठपुरावा केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी टॅप्स व्यवस्थापनाशी संपर्क साधून चौकशी अहवाल सादर करण्याचे तसेच निर्णय होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान रिक्त पदांच्या संख्येत बदल झाल्याने फेर कौशल्य चाचणी आयोजित केली जात असल्याचे टॅप्स व्यवस्थापनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला सांगितल्याचे समजते. मात्र असे झाले असल्यास संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबविण्याची गरज असल्याची भूमिका जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतल्याचे टॅप्सला सांगण्यात आल्याची माहिती मिळते
Comments are closed.