तलाठी संगणकीय परीक्षा २०१९
Talathi Exam Mess
अट्टाहासाने संगणकीय परीक्षा घेण्याचा नादात ४ दिवस दोन सत्रात चाललेल्या तलाठी पदाच्या परीक्षेत ई-महापरीक्षा या सरकारी कंपनीकडून प्रश्न चुकले. त्या चुकलेल्या प्रश्नांसाठी प्रत्येकी दोन गुण बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पाच लाखांहून अधिक परीक्षणार्थी उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
या पदासाठी प्रश्नपत्रिका काढण्यात आल्या होत्या. एका प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण अशी रचना होती. प्रत्येक सत्रासाठी नवी प्रश्नपत्रिका काढण्यात येत असल्याने काठिण्यपातळीवर उमेदवाराचे आक्षेप आहेत. त्यातच चुकलेल्या प्रश्नांना गुण देण्याच्या निर्णयामुळे लायक उमेदवार निवड यादीत मागे फेकले जाणार आहेत. ई-महापरीक्षा प्रकल्पाचे संचालक दिनेश पाटील यांनीही काही जणांवर असा अन्याय होऊ शकतो असे मान्य केले असून महसूल विभागाने चुकलेल्या प्रश्नासाठी गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. असे सांगितले.
औरंगाबाद येथे तलाठी पदाची परीक्षा देणार बालाजी कुटे म्हणाले, अशी विचीत्र परीक्षा कुठेच बघितली नाही. मी पहिल्या दिवशी २ जुलै २०१९ रोजी परीक्षा दिली होती. त्या वेळी प्रश्नपत्रिकेत पाच प्रश्न चुकले होते. त्याचे गुण मिळतील पण ज्यांची प्रश्नपत्रिका चुकली नव्हती त्याच्यावर अन्याय होईल. पाच लाखाहून अधिक उमेदवारांनी दिलेल्या परीक्षेवर काठिण्यपातळीवरही आक्षेप घेण्यात आले आहे. मात्र काठिण्यपातळीवरचे आक्षेप चुकीचे असून तज्ज्ञ व्यक्तीच्या मदतीने प्रश्नसंच तयार करण्यात आले होते. त्यामुळे काठिण्यपातळी व सोपे प्रश्न याचे प्रमाण योग्य होते. असा दावा प्रकल्प संचालक दिनेश पाटील यांनी सांगितले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
घोळ काय ?
राज्यभरातील रिक्त १८०० तलाठी पदांसाठी राज्यात २४ दिवस दोन सत्रात संगणकीय परीक्षा घेण्यात आली. संगणकाची पुरेशी संख्या नसल्याने प्रत्येक सत्रात नवी प्रश्नपत्रिका काढली जाते. एका प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न असत. म्हणजे तलाठी परिक्षेत ४ दिवसात विचारलेल्या प्रश्नांची संख्या ४८०० एवढी झाली. यातील काही प्रश्न ई-महापरीक्षा विभागाकडूनच चुकले. म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या परीक्षेचे अंतिम गुणांकन वेगवेगळे झाले. चुकलेल्या प्रश्नांचे गुण बहाल करण्यात येणार असल्याने ज्यांची प्रश्नपत्रिका पूर्णतः बरोबर होती अशा उमेदवारांवर आपोआप अन्याय होत आहे.
Aajun talathi cha righalt lagala nahi dhulyach
bharti parksha radda karavi navin pariksha ghavi