Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

तलाठीची आन्सर की जाहीर

राज्यात १ हजार ७७६ जागांसाठी सुरू असलेल्या तलाठी पद भरती अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आन्सर की युट्यूबवर जाहीर झाल्याचा दावा परीक्षार्थींना केला होता. २६ जुलै रोजी राज्यातील सर्व केंद्रांवरील तलाठी भरतीच्या परीक्षा पार पडल्यानंतर आता महापरीक्षा पोर्टलद्वारे अधिकृत आन्सर की जाहीर करण्यात आली आहे. यामुळे परीक्षेत समान काठीण्य पातळी, प्रश्नांची पुनरावृत्ती आणि लिक झालेले प्रश्न या दाव्यांनंतर जाहीर झालेल्या या ‘आन्सर की’मुळे परीक्षार्थींचा संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे.

तलाठी भरतीत नाशिक जिल्ह्यात ६१ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ३० हजार १२६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी २ ते २६ जुलै या कालावधीत नाशिकमधील ६ केंद्रावर २० हजार ३०१ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. या परीक्षार्थींना अनेकदा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. शहरातील दोन केंद्रांवर आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे महापरीक्षा पोर्टलद्वारे पुन्हा परीक्षा घेण्यात आली. आधारकार्ड तपासणी ते प्रश्नांची पुनरावृत्ती आणि युट्यूबवर लिक झालेल्या प्रश्नांपर्यंत हा गोंधळ येऊन पोहोचला. १८ दिवस घेण्यात आलेल्या या परीक्षेत अगोदरच युट्यूबवर काही प्रश्न लिक झाल्याने परीक्षार्थींनी भरती अंतर्गत पारदर्शकता नसल्याची ओरड केली. या भरती अंतर्गत अनेक गोंधळ झाल्याने काही परीक्षार्थी कोर्टात धाव घेण्याच्या तयारीत असल्याने भरतीवर स्थगिती येणार का, या प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरीत आहे. मात्र, महापरीक्षा पोर्टलद्वारे आता अधिकृत आन्सर की जाहीर करण्यात आली आहे. या आन्सर की नुसार गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याने, आन्सर कीमध्ये कोणताही घोळ नसावा, अशी अपेक्षा परीक्षार्थींनी व्यक्त केली आहे. परीक्षार्थींनी

https://mahapariksha.gov.in/revanswerkey/  या लिंकद्वारे आन्सर की तपासावी, अशी सूचना महापरीक्षा पोर्टलद्वारे करण्यात आली आहे.

अन्सार कि


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड