तलाठी भरती लवकरच होणार
Talathi Bharti Stared Soon
जिल्ह्यातील रिक्त जागांवरील 67 तलाठीपदांसाठी परीक्षा झाली, गुणतालिका जाहीर झाली. मात्र, आरक्षणातील तीन टक्क्यांची तफावत आल्याने अद्याप अंतिम निकाल जााहीर झालेला नाही, त्यामुळे तलाठ्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या नियुक्त्या आता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील तलाठ्यांच्या 75 जागा रिक्त होत्या. त्यातील 8 जागा अनुकंपा उमेदवारांतून भरल्या जाणार आहेत. उर्वरित 67 जागांसाठी 28 फेब—वारीला जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीत मराठा समाजाला 16 टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. यानंतर दि. 2 ते दि. 26 जुलै रोजी जिल्ह्यातील दहा केंद्रांवर तलाठीपदांसाठी ऑनलाईन परीक्षा झाली. या परीक्षेची उमेदवारांची गुणतालिका जाहीर करण्यात आली.
दरम्यान, मराठा समाजातील उमेदवारांना 13 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार 4 जुलै रोजी या टक्केवारीनुसार भरती करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या. प्रारंभी 16 टक्क्यांप्रमाणे जागा राखीव ठेवल्या होत्या, आता 13 टक्क्यांनुसार त्या भरायच्या आहेत. यामुळे उर्वरित 3 टक्के जागा कशा भरायच्या, याबाबत जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे. आरक्षित जागांबाबत नवीन आदेश आल्याने तसेच सध्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. यानंतर दिवाळी आहे. यामुळे या महिन्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता कमीच आहे.
अनुकंपावरील नियुक्त्याही प्रतीक्षेत
सर्वच रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये 8 अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांचाही समावेश आहे. मात्र, यापूर्वीची पदे न भरल्याने आणि;आचारसंहिता सुरू असल्याने अनुकंपावरीलही नियुक्त्या प्रतीक्षेत आहेत.
नायब तहसीलदारांची निम्मी पदे रिक्त
जिल्ह्यात नायब तहसीलदारांची 58 पदे मंजूर आहेत. यापैकी जवळपास निम्मी म्हणजे 23 पदे रिक्त आहेत. या पदांचा कार्यभार अन्य नायब तहसीलदारांकडे दिला आहे. पन्हाळ्यात तर एकही नायब तहसीलदार नव्हते. यामुळे गगनबावड्यातील नायब तहसीलदारांची पन्हाळ्यात तातडीने बदली करण्यात आली आहे. निवडणुकीच्या धामधुमीत जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकार्यांची वानवा आहे. यामुळे आहे त्या अधिकार्यांवरील कामाचा ताण प्रचंड आहे. नायब तहसीलदारांसह लिपिकांच्याही 47 जागा रिक्त आहेत. त्याचाही ताण अन्य कर्मचार्यांवर पडत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जिल्ह्यात लवकरच 31 नवे तलाठी सजे
जिल्ह्यात करवीर, इचलकरंजीसह अन्य तलाठी सजांची विभागणी करून नवे तलाठी सजे निर्माण केले आहेत. असे एकूण 31 नवे तलाठी सजे स्थापन केले आहेत. या तलाठी सजांनुसार त्यांचा आकारबंध करण्याचे काम भूमिअभिलेख विभागात सुरू आहे. हा आकारबंद झाला की, सध्याच्या गावांत समाविष्ट असलेले दफ्तर वेगळे केले जाईल आणि नवे तलाठी कार्यालय सुरू होईल. येत्या तीन-चार महिन्यांत नवी तलाठी कार्यालये अस्तित्वात येणार आहेत.
Lavakar order issue kara