T20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या टीम इंडियाचे सामने कधी होणार! – T20 World Cup 2024 Schedule
T20 World Cup 2024 Schedule
T20 World Cup 2024 Schedule 2024 – यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या ICC T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज आणि यूएसए मधील एकूण 9 मैदानांवर 2024 च्या T20 विश्वचषकात एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. T20 विश्वचषक 2024 चा सलामीचा सामना 1 जून रोजी यजमान यूएसए आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 26 आणि 27 जून रोजी होणार आहेत. 29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे. भारतीय संघाला अ गटात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडासोबत ठेवण्यात आले आहे. भारतीय संघाचे पहिले तीन गट सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. तर भारतीय संघ 12 जून रोजी अमेरिकेविरुद्ध तिसरा गट सामना खेळणार आहे. भारताचा शेवटचा गट सामना 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध होणार आहे.
भारतीय संघाचे वेळापत्रक
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- 5 जून – वि आयर्लंड, न्यूयॉर्क
- 9 जून – वि.पाकिस्तान, न्यूयॉर्क
- 12 जून – वि अमेरिका, न्यूयॉर्क
- 15 जून – वि.एस. कॅनडा, फ्लोरिडा
T20 वर्ल्ड कप 2024 चा फॉरमॅट असा असेल
आगामी T20 विश्वचषक 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. 20 संघांची ही स्पर्धा बाद फेरीसह एकूण 3 टप्प्यात खेळवली जाईल. सर्व 20 संघ प्रत्येकी 5 च्या 4 गटात विभागले जातील. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करतील. यानंतर, सर्व 8 संघ प्रत्येकी 4 च्या 2 गटात विभागले जातील. सुपर-8 टप्प्यात दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन संघ उपांत्य फेरीच्या दोन सामन्यांद्वारे अंतिम फेरीत प्रवेश करतील.
टीम इंडियाचं शेड्यूल (सर्व मॅच रात्री 8 वाजता, भारतीय वेळेनुसार)
1 जून – भारत vs बांग्लादेश, नॅसो काउंटी स्टेडिअम, न्यूयॉर्क (वॉर्म-अप मॅच)
5 जून- भारत vs आयर्लंड, नॅसो काउंटी स्टेडिअम, न्यूयॉर्क
9 जून- भारत vs पाकिस्तान, नॅसो काउंटी स्टेडिअम, न्यूयॉर्क
12 जून- भारत vs अमेरिका, नॅसो काउंटी स्टेडिअम, न्यूयॉर्क
15 जून- भारत vs कॅनडा, फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा
टीम इंडिया सुपर-8मध्ये क्वॉलिफाय केले तर त्यांचे शेड्युल पुढीलप्रमाणे असेल
20 जून- भारत vs C-1, ब्रिजटाउन, बार्बाडोस
22 जून- भारत vs D-2, नॉर्थ साउंड, अँटीगा
24 जून- भारत vs B-2, ग्रोस आयलेट, सेंट लूसिया
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.
Comments are closed.