सावधान, सुरक्षारक्षक मंडळाची भरतीची खोटी जाहिरात व्हायरल!
मित्रांनो सोशल मीडियावर अनेक वेळा खोट्या बातम्या किंवा जाहिराती व्हायरल होतात. याचाच प्रत्यय आता आला आहे. नागपूर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातर्फे सुरक्षारक्षकांची भरती प्रक्रिया होईल. त्याकरिता सुरक्षारक्षकांचे ट्रेनिंग घेण्यात येईल अशा आशयाच्या बातम्या निरनिराळ्या व्हॉटस्अॅपग्रुपद्वारे पसरविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पत्रकावर मंडळाचे सचिव यांची स्वाक्षरी कॉपी पेस्ट केली आहे. तेंव्हा उमेदवारांनी अशी कोणतीही जाहिरात सध्या प्रकाशित झालेली नाही याची दक्षता घ्यावी.
मंडळातर्फे अशी कोणतीही भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. सोशल मीडियावरील भरतीचे हे वृत्त खोटे आहे.मंडळाने भरती बाबत कुठलेही पत्र किंवा आदेश निर्गमित केलेले नाहीत, असे नागपूर जिल्हा सुरक्षारक्षक’ मंडळाचे सरकारी कामगार अधिकारी व सचिव एम. पी. मडावी यांनी स्पष्ट केले आहे.