कृषी विद्यापीठांत अनेक वर्षांपासून पदभरती न झाल्यामुळे तब्बल ६,७९१ पदे रिक्त
state's agricultural universities vacant Posts
राज्यातील कृषी विद्यापीठांत तब्बल ६,७९१ रिक्त पदे
सध्या महाराष्ट्र राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये सुमारे साडेबारा हजार मंजूर पदांपैकी जवळपास ५४ टक्के पदे रिक्त आहेत. या चारही विद्यापीठात बऱ्याच वर्षांपासून पदभरती प्रक्रिया थांबली आहे आणि अनुभवी शास्त्रज्ञ निवृत्त होत असल्याने विद्यापीठांमधील संशोधनाची गती कमी झाली आहे. अनेक विभागात रिक्त पदे असल्यांचे चित्र आहे, त्या मुले अनेक कामे सुद्धा खोळंबली आहे. राज्य सरकारच्या या निष्क्रियतेमुळे शेतकरी आणि कृषी पदवीधरांमध्ये नाराजी आहे, आणि त्यामुळे कृषी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांची रुची कमी होत चालली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राहुरी, परभणी, दापोली, आणि अकोला येथील कृषी विद्यापीठांमध्ये १२,४८२ मंजूर पदांपैकी ६,७९१ पदे सध्या रिक्त आहेत. यामध्ये अ, ब, क, आणि ड या श्रेणीतील विविध पदांचा समावेश आहे. विशेषत: गट अ मध्ये ४८.२३%, गट ब मध्ये ४१.८०%, गट क मध्ये ४१.४७%, आणि गट ड मध्ये ६२.६८% पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमध्ये सहायक प्राध्यापक, वरिष्ठ संशोधन सहायक, कनिष्ठ संशोधन सहायक, आणि कृषी सहायक या पदांचा समावेश आहे. एकूण १५१५ पदे सध्या रिक्त आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कने देशातील सर्वोत्तम ४० कृषी विद्यापीठांची यादी जाहीर केली, पण त्यात राज्यातील एकही विद्यापीठ नाही. यावरून राज्यातील कृषी विद्यापीठांची स्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत, अशी मागणी कृषी पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी करत आहेत, कारण यामुळे विद्यार्थ्यांची कृषी अभ्यासक्रमांवरील रुची कमी होत चालली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.