कृषी विद्यापीठ भरपूर पदे रिक्त, नवीन पदभरती कधी होणार!
state's agricultural universities vacant Posts
सध्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची सध्या फारच हलाखीची अवस्था झाली आहे. या कृषी विभागात तब्बल ५७ टक्के पदं रिकामी पडून आहेत! शास्त्रज्ञ नाहीत, अधिकारी नाहीत, कर्मचारी नाहीत – आणि यामुळे संशोधनाचं सगळंच चक्र ठप्प झालंय. या मुळे आता नवीन पदभरती नेमकी कधी सुरु होणार या कडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या रिक्त पदांच्या मुळे विविध विभागातील अनेक कामे अडकली आहे. आता सर्व स्तरातून नवीन भरती लवकरच राबवावी हि मागणी जोर धरत आहे.
शास्त्रज्ञांची कामं अन्य विभागांच्या जबाबदाऱ्यांसह एकाच माणसाकडे ढकलली जातायत. एकट्यानं दोन-तीन विभाग सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे कामाचा दर्जा कमी होतोय, वेळेवर निर्णय घेतले जात नाहीत, आणि संशोधन क्षेत्रात आपली गतीच हरवली आहे. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी नुकताच विद्यापीठाचे कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील यांची भेट घेतली. त्यांनी परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “हे विद्यापीठ एकेकाळी देशात अव्वल स्थानावर होतं. संशोधन, शिक्षण आणि शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यात याचा मोलाचा वाटा होता. पण आता… रेटिंग घसरत चाललंय, गती हरवत चाललीय!” असं त्यांनी खंत व्यक्त करत सांगितलं.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कोट्यवधींची मशिनरी धूळखात – प्रयोगशाळा निष्क्रिय
विद्यापीठात जैवतंत्रज्ञान आणि टिश्यू कल्चर प्रयोगशाळा तयार करण्यात आली, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले. पण आता काय? सगळं साचं धूळ खात पडलंय! कारण वापरणाऱ्याच माणसं नाहीत. मशीनरी आहे पण चालवायला तंत्रज्ञ नाही, संशोधनाला लागणारे कर्मचारी नाहीत – मग त्या प्रयोगशाळेचं उपयोग तरी काय?
पद रिक्ततेची टक्केवारी वाढतेय – धोका अजून वाढणार?
सध्याच्या घडीला ५७% पदं रिकामी असताना, जून महिन्यापर्यंत ती संख्या ६५ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. हे चित्र अधिक गंभीर आहे. कारण याचा थेट परिणाम केवळ संशोधनावर नाही, तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या ज्ञानावरही होतोय.
राज्यातील कृषी विद्यापीठांत तब्बल ६,७९१ रिक्त पदे
सध्या महाराष्ट्र राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये सुमारे साडेबारा हजार मंजूर पदांपैकी जवळपास ५४ टक्के पदे रिक्त आहेत. या चारही विद्यापीठात बऱ्याच वर्षांपासून पदभरती प्रक्रिया थांबली आहे आणि अनुभवी शास्त्रज्ञ निवृत्त होत असल्याने विद्यापीठांमधील संशोधनाची गती कमी झाली आहे. अनेक विभागात रिक्त पदे असल्यांचे चित्र आहे, त्या मुले अनेक कामे सुद्धा खोळंबली आहे. राज्य सरकारच्या या निष्क्रियतेमुळे शेतकरी आणि कृषी पदवीधरांमध्ये नाराजी आहे, आणि त्यामुळे कृषी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांची रुची कमी होत चालली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राहुरी, परभणी, दापोली, आणि अकोला येथील कृषी विद्यापीठांमध्ये १२,४८२ मंजूर पदांपैकी ६,७९१ पदे सध्या रिक्त आहेत. यामध्ये अ, ब, क, आणि ड या श्रेणीतील विविध पदांचा समावेश आहे. विशेषत: गट अ मध्ये ४८.२३%, गट ब मध्ये ४१.८०%, गट क मध्ये ४१.४७%, आणि गट ड मध्ये ६२.६८% पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमध्ये सहायक प्राध्यापक, वरिष्ठ संशोधन सहायक, कनिष्ठ संशोधन सहायक, आणि कृषी सहायक या पदांचा समावेश आहे. एकूण १५१५ पदे सध्या रिक्त आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कने देशातील सर्वोत्तम ४० कृषी विद्यापीठांची यादी जाहीर केली, पण त्यात राज्यातील एकही विद्यापीठ नाही. यावरून राज्यातील कृषी विद्यापीठांची स्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत, अशी मागणी कृषी पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी करत आहेत, कारण यामुळे विद्यार्थ्यांची कृषी अभ्यासक्रमांवरील रुची कमी होत चालली आहे.
Table of Contents
Comments are closed.