Job Opportunities: नवीन नोकर भरतीसाठी 50% रिक्त पदे भरली जाणार!!

State Mega Bharti 2022

State Mega Bharti 2022

State Mega Bharti 2022 : Good news for job seekers! Jobs will be increased from July claiming 50% of the vacancies for new recruits. The recruitment process will be soon. Further details are as follows:-

NokarBharti 2022

पुढील तीन महिन्यांत मोठ्या संख्येने लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. खरं तर, स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंट या रिक्रूटमेंट कंपनीच्या (Of the recruitment company) आकडेवारीनुसार, पुढील तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) मोठ्या प्रमाणात नोकरभरती होण्याची शक्यता आहे.

राज्यातील संपूर्ण मेगाभरती जाहिराती

 • अनेक क्षेत्रातील नोकऱ्या 25 ते 90 टक्क्यांनी वाढू शकतात.
 • येत्या तिमाहीत 50 टक्क्यांपर्यंत भरती होण्याची शक्यता आहे.
 • आयटी, टेलिकॉम, बीएफएसआय, एफएमसीजी आणि हेल्थकेअरमधील नोकऱ्या दर तिमाही आणि वर्षानुवर्षे वाढणार आहेत.
 • नोकर भरती प्रक्रियेत (In the recruitment process) उत्पादन, ऑटोमोटिव्ह आणि ईपीसी या क्षेत्रांमध्ये 25 टक्क्यांवरून 90 टक्क्यांपर्यंत नोकऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते.
 • काही क्षेत्रातील लोक कोविड सारख्या अडचणींमुळे (Due to difficulties) गेल्या वर्षी कामावर घेऊ शकले नाहीत.
 • पण आता या क्षेत्रांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे, कारण या वर्षी नोकरभरतीची परिस्थिती बदलण्याची अपेक्षा आहे.

सर्व सेक्टर्समध्ये वाढणार नोकरीची संधी

 • लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर जून महिन्यात सर्व सेक्टर्समध्ये मे 2021च्या तुलनेत नोकर भरती वाढलेली दिसली.
 • गेल्या सहा महिन्यामध्ये सर्व सेक्टर्समधील नोकर भरतीमध्ये 6 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे.
 • मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट रिपोर्टनुसार, कोरोना प्रादुर्भावाची लाट आणि त्यानंतर लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतरही गेल्या सहा महिन्यात सर्व सेक्टर्समधील नोकर भरतीत 6 टक्केंनी वाढ पाहायला मिळाली.
 • पुढील काळातही बऱ्याच कंपन्या वर्क फ्रॉम होम चा पर्याय पूर्णतः बंद करून, आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात कामाला बोलविणार आहेत.
 • जे कर्मचारी कार्यालयात येण्यास असर्मथ असतील त्याच्या जागी नवीन कर्मचारी भरती केली जाईल.

Open Opportunity For Skill Based Candidates 

 • कोरोनामुळे आयटी, टेलिकॉम, बीएफएसआय, एफएमसीजी आणि हेल्थकेअरमधील या क्षेत्रांना अधिक फटका बसला आहे.
 • त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून फारशी भरती झालेली नाही. मात्र आता परिस्थिती सुधारत असून येथे आणखी नोकऱ्या उपलब्ध होतील.
 • परंतु, या क्षेत्रातही कौशल्यधारक लोकांना अधिक संधी दिली जाणार असल्याने, तरुणांनी आपल्या पदवीसह कौशल्य वाढविण्यावरही भर देणे गरजेचे आहे.

बाजारात स्थिरता आल्यानंतर भरती वाढली

अग्रवाल म्हणाले, “बाजारात प्रतिभेच्या कमतरतेमुळे कंपन्या फुल-स्टॅक रिटेन्शन स्ट्रॅटेजीवर लक्ष केंद्रित करत आहेत. हे उच्च कामगिरी करणार्‍या लोकांसाठी आणि येत्या काही महिन्यांत बदल शोधत असलेल्या लोकांच्या बाजूने काम करते.’ कोविडनंतर कंपन्यांसमोर आव्हाने उभी राहिली आहेत. मात्र, बाजारात स्थिरता आल्यानंतर नोकरभरतीत वाढ झाली आहे. याशिवाय, डिजिटलायझेशनमुळे, प्रत्येक कंपनी स्पर्धेत पुढे राहण्यासाठी आपले कर्मचारी संख्या वाढवत आहे.

कोविड नंतर नोकरभरती वाढली

स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंटचे संचालक सिद्धार्थ अग्रवाल म्हणाले, “साथीच्या आजाराच्या दोन वर्षांच्या अंतरानंतर, या वर्षाच्या सुरुवातीपासून नोकरभरतीत वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीशी तुलना केली असता, या वर्षी भरतीची भावना आधीच 45 टक्क्यांनी सुधारली आहे. विशेषत: एंट्री-लेव्हल नोकऱ्यांमध्ये. याशिवाय, BFSI आणि IT क्षेत्रात जास्तीत जास्त भरती होणार आहे.


State Mega Bharti 2022

State Mega Bharti 2022: Good News: Great opportunity for job seekers. A large number of job opportunities are expected in the next few months. A report on this has been submitted recently. About 63 per cent of the companies will be recruited in the near future, the survey report said. Further details are as follows:-

पुढील काही महिन्यांत मोठ्याप्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याबाबत नुकताच एक अहवाल सादर करण्यात आला आहे. पुढील काळात सुमारे 63 टक्के कंपन्यांकडून कर्मचारी भरती करण्यात येणार असल्याचे या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

State Mega Bharti 2022

 • देशावर दोन वर्ष कोरोना (Corona) संकट होते. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा (Lockdown) मोठा फटका हा कंपन्यांना बसला.
 • मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.
 • कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.
 • निर्बंध हटवल्यानंतर आता कंपन्यांकडून देखील गेल्या दोन वर्षांत झालेले आपले नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
 • त्यामुळे पुढील काळात रोजगाराच्या अनेक संधी (Job opportunities) उपलब्ध होणार आहेत.
 • भारतात पुढील काही महिने जॉब मार्केट मजबूत स्थितीत राहण्याची शक्यता आहे.
 • याबाबत Manpower Group’s employment scenario चा सर्वेक्षण अहवाल मंगळवारी जाहीर झाला.
 • या सर्वेक्षण अहवालानुसार पुढील काही महिन्यांत देशातील जवळपास 63 टक्के कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
 • 2022 च्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत रोजगार भरतीचे प्रमाण हे गेल्या आठ वर्षांती सर्वोच्च स्थानावर असेल असा या अहवालाचा अंदाज आहे.

अहवाल काय सांगतो

सर्वेक्षणानुसार जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जवळपास 63 टक्के कंपन्या या मोठ्याप्रमाणात कर्मचारी भरतीची प्रक्रिया राबवणार आहेत. तर बारा टक्के कंपन्यांकडून कर्मचारी कपातीची शक्यता आहे. 24 टक्के कंपन्या कर्मचारी धोरणात कोणताही बदल करणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मॅनपॉवर ग्रुप इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप गुलाटी यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. भारतातील कंपन्या अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत सकारात्मक आहेत. परिणामी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमामात कर्मचारी भरती करण्यात येऊ शकते. कोरोना काळात उत्पादनाची मागणी घटल्याने कर्मचारी कपात करण्यात आली होती.


State Mega Bharti 2022  

State Mega Bharti 2022 : Fifty-Three Lakh Seats Are Vacant In The Government because of the Retired employee, promotion. There are 17 lakh vacancies are sanctioned in State Government Departments. There are 10 lakh 70 thousand 840 seats of government departments including Zilla Parishad. Further details are as follows:-

लोकसभा, विधानसभेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे मागील पाच-सहा वर्षांत रिक्त जागांची भरती होऊ शकली नाही. सध्या सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे लोकहिताच्या शासकीय योजना लाभार्थींपर्यंत प्रभावीपणे पोचत नसल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थ विभागाने निर्बंध उठवूनही अद्याप भरती प्रक्रिया घोषित झालेली नाही.

 • राज्याच्या सरकारी विभागांमध्ये जवळपास १७ लाख जागा मंजूर आहेत.
 • त्यात जिल्हा परिषदांसह शासकीय विभागांची दहा लाख ७० हजार ८४० जागा आहेत.
 • पण, त्यातील सव्वादोन लाख जागा शासकीय विभागांमधील आणि ६१ हजार रिक्त जागा जिल्हा परिषदांमधील मागील काही वर्षांत भरलेलीच नाहीत.
 • जिल्हा परिषदांमधील अनेक विभागांचा पदभार एकाच अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे सोपविला गेला आहे. कृषी, गृह, जलसंपदा, महसूल व वन, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य या विभागांमध्ये तशी स्थिती आहे.
 • तत्कालीन फडणवीस सरकारने ७० हजार जागांची मेगाभरती जाहीर केली होती.
 • सरकार बदलले तरीदेखील त्याला मुहूर्त लागला नाही.
 • कोरोना काळात अनेकांचा मृत्यू झाला. मे २०२० नंतर मे २०२२ पर्यंत अनेकजण सेवानिवृत्त झाले तर काहींनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.
 • त्यामुळे डिसेंबर २०२० अखेर सरकारच्या विविध विभागांमधील रिक्त जागा दोन लाख ४४ हजार होत्या.
 • कोरोनानंतर त्यात आणखी २७ हजारांची वाढ झाली असून सद्यस्थितीत रिक्त जागांची एकूण संख्या दोन लाख ७१ हजारांवर पोहोचली आहे.

रिक्त जागा वाढण्याची कारण 

दरवर्षीची सेवानिवृत्त कर्मचारी, पदोन्नती यामुळे बालविकास, सामाजिक न्याय, उच्च व तंत्रशिक्षण, शालेय शिक्षण, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, पशुसंवर्धन या विभागांमधील रिक्त जागा वाढल्या आहेत.

विभागीय स्तरावर होणार भरती 

 • राज्यातील जिल्हा परिषदांमधील ६१ हजार जागा रिक्त असून त्याची भरती प्रक्रिया संबंधित विभागीय स्तरावर होऊ शकते.
 • कोरोनानंतर राज्याची आर्थिक स्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे.
 • त्यामुळे सरकारच्या सर्वच विभागांमधील जवळपास एक लाख जागांची भरती एकाचवेळी होणार आहे.
 • दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी २०२३ पूर्वी पुन्हा तशीच मोठी भरती करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे.

State Mega Bharti 2022

State Mega Bharti 2022 : The total number of state government employees is 17 lakh. The number of government department and Zilla Parishad employees is 10 lakh 70 thousand 840. Out of which 8 lakh 26 thousand 435 posts were filled. That means 2 lakh 44 thousand 405 posts are vacant. Further details are as follows:-

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची 2.44 लाख इतकी पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, ही आकडेवारी डिसेंबर २०२० पर्यंतची असून त्यानंतर रिक्त पदांचा अनुशेष वाढला आहे. राज्य सरकारचे तीन टक्के कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात. त्या तुलनेत भरती केली जात नाही, त्यामुळे अनुशेष वाढत जातो. 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १७ लाख इतकी आहे. त्यातील शासकीय विभाग आणि जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांची संख्या १० लाख ७० हजार ८४० आहे. त्यापैकी ८ लाख २६ हजार ४३५ पदे ही भरलेली होती. म्हणजे २ लाख ४४ हजार ४०५ पदे ही रिक्त होती. या कर्मचाऱ्यांमध्ये अनुदानित शाळा, संस्थांमधील कर्मचारी, महामंडळांचे कर्मचारी, आदींचा समावेश नाही.

महत्त्वाचे – राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये 13 हजार 521 पदांची भरती लवकरच!!

खुशखबर!! सार्वजनिक बांधकाम खात्यात लवकरच 100 पदांसाठी भरतीप्रक्रिया होणार सुरु!!

आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; ‘MKCL’ किंवा ‘TCS’च्या माध्यमातून पुन्हा परीक्षा

शाळा परिसरात होमगार्ड पदाची भरती केली जाणार!! शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

म्हाडा सरळसेवा भरती नवीन अपडेट!! कागदपत्र पडताळणीची यादी व तारीख जाहीर

खुशखबर!! राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात 2 हजार 500 पदांची मोठी भरती!!

खुशखबर!! महाराष्ट्रात सुमारे 66 हजार जणांना मिळणार रोजगार!!

Jalsampada Vibhag 

जलसंपदा विभाग :

जलसंपदा विभागाची एकूण मंजूर पदे 45,217असून त्यापैकी 21,489 पदे रिक्त आहेत. महसूल व वन विभागाची एकूण मंजूर पदे 69,584 असून त्यापैकी 12,557 पदे रिक्त आहेत. उच्च व तंत्र विभागाची एकूण मंजूर पदे 12,407 असून त्यापैकी 3,995 पदे रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची एकूण मंजूर पदे 36,956 असून त्यापैकी 124,23 पदे रिक्त आहेत.

Adivasi Vibhag 

आदिवासी विकास

आदिवासी विकास विभागाची एकूण मंजूर पदे 21,154 असून त्यापैकी 6213 पदे रिक्त आहेत. शालेय शिक्षण व क्रिडा विभागाची एकूण मंजूर पदे 7050 असून त्यापैकी 3828 पदे रिक्त आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाची एकूण मंजूर पदे 21,649 असून त्यापैकी 7751 पदे रिक्त आहेत. सहकार पणन विभागाची एकूण मंजूर पदे 8867 असून त्यापैकी 2933 पदे रिक्त आहेत. सामाजिक न्याय विभागाची एकूण मंजूर पदे 6573 असून त्यापैकी 3221 पदे रिक्त आहेत.

Department of Industry, Energy and Labor

उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाची एकूण मंजूर पदे 8197 असून त्यापैकी 3686 पदे रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाची एकूण मंजूर पदे 36956 असून त्यापैकी 12,423 पदे रिक्त आहेत. वित्त विभागाची एकूण मंजूर पदे 18191 असून त्यापैकी 5719 पदे रिक्त आहेत. शालेय शिक्षण विभागाची एकूण मंजूर पदे 7050 असून त्यापैकी 3828 पदे रिक्त आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाची एकूण मंजूर पदे 8308 असून त्यापैकी 2949 पदे रिक्त आहेत. महिला व बालविकास विभागाची एकूण मंजूर पदे 3936 असून त्यापैकी 1451 पदे रिक्त आहेत. विधि व न्याय विभागाची एकूण मंजूर पदे 2938 असून त्यापैकी 1201 पदे रिक्त आहेत. पर्यटन व सांस्कृतिक विभागाची एकूण मंजूर पदे 735 असून त्यापैकी 386 पदे रिक्त आहेत. सामान्य प्रशासन विभागाची एकूण मंजूर पदे 8795 असून त्यापैकी 2325 पदे रिक्त आहेत.

State Mega Bharti 2022

अनिल गलगली यांच्या मते रिक्त पदामुळे सेवेत दिरंगाई होते आणि सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागात रिक्त पदांची संख्या अधिक आहे. सरासरी 23 टक्के पदे रिक्त असली तरी काही विभागात 30 ते 50 टक्क्यांपर्यंत पदे रिक्त असल्याची खंत अनिल गलगली यांनी व्यक्त करत केली आहे की शासनाने तत्काळ ही रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असतानाही राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये नोकरभरती केलेली नाही. 2020 भरती झाली नव्हती. पुढची मेगाभरती केव्हा होईल याची खात्री नाही. परंतु दोन लाख पदे रिक्त असल्याची माहिती पहिल्यांदाच समोर आल्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेवर अतिरिक्त पदांचा किती ताण पडतोय हे चित्र बाहेर आलो आहे. माहिती अधिकारात सर्वच विभागांमध्ये या रिक्त पदांची माहिती आहे.


State Mega Recruitment 2022

State Mega Bharti 2022: Deputy Chief Minister Ajit Pawar and Rural Development Minister Hasan Mushrif have promised to take a decision soon regarding the recruitment process for various posts in the state. Further details are as follows:-

राज्यातील विविध पदांच्या भरती प्रक्रिये संदर्भात लवकरच निर्णय घेऊ, तसेच भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. 

राज्यातील जिल्हा परिषद, जलसंपदा, ऊर्जा, पशुसंवर्धन, आरोग्य, म्हाडा (MHADA), शिक्षण यांच्यासह अन्य विभागातील विविध पदांची रखडलेली भरती प्रक्रिया (Recruitment Process) तातडीने राबविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, राज्यातील विविध पदांच्या भरती प्रक्रिये संदर्भात लवकरच निर्णय घेऊ, तसेच भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

 • रविकांत वरपे यांनी राष्ट्रवादी भवन येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांची भेट घेत त्यांना भरती प्रक्रियेसंदर्भातील निवेदन दिले.
 • वरपे यांनी निवेदनात म्हटले आहे, की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात विविध खात्यात 71 हजार पदे रिक्त असल्याचे सांगत पद भरती करण्याचे आश्वासन दिले होते.
 • मात्र, हे आश्वासन हवेतच विरले.
 • त्यामुळे विविध पदांसाठी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची निराशा झाली होती.
 • आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी राज्यातील रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले आहे.
 • सरळसेवा भरती संदर्भात म्हणणे ऐकून घेऊन सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या.

रविकांत वरपे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की महाविकास आघाडी सरकारने कोव्हिड19 नंतर नोकर भरती संदर्भात घेतलेल्या निर्णयांचे सकारात्मक परिणाम दिसत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाबत घेतलेल्या निर्णयाचे एमपीएससी, सारथी, बार्टी, महाज्योती आदी संस्थांमध्ये तयारी करीत असलेल्या युवकांमध्ये समाधानाची भावना आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या काही परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेत अडकत असून, याबाबत राज्य लोकसेवा आयोगाच्या कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी. चालू वर्षातील रिक्त जागांचे मागणीपत्र राज्य लोकसेवा आयोगाला सादर करावेत. राज्यातील सरळसेवा नोकर भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी. राज्य सरकारच्या वर्ग 3 व 4 च्या परीक्षा खासगी कंपन्यांमार्फत घेऊ नयेत. एमकेसीएल, इन्फोसिस व टीसीएस यांच्यामार्फत परीक्षा घेण्यात याव्यात. सर्व विभागांच्या परीक्षा पारदर्शक व्हाव्यात, यासाठी मार्गदर्शक तत्वांची एसओपी जाहीर करावी. ग्रामविकास, पशुसंवर्धन, ऊर्जा, जलसंपदा, शिक्षण यांच्यासह अन्य विभागांची रखडलेली भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी.


Mega Recruitment 2022

State Mega Bharti 2022: Recruitment of Computer Engineer, Data Entry Operator, Driver, Gardener and other semi-skilled workers, Telephone Operator, Lift Operator, Caretaker, Peon, Peon, Watchman, Cleaner, Helper, Carrier and other posts. Further details are as follows:-

राज्य सरकारच्या तिजोरीवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नोकरभरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे वीस ते तीस टक्के खर्चात बचत होणार आहे. या भरतीला कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

Mega Bharti 2022 – Vacancy Details 

कोणत्या पदांची होणार कंत्राटी भरती

संगणक अभियंता, डेटा एंट्री ऑपरेटर,वाहनचालक, माळी व इतर अर्धकुशल कामगार टेलिफोन ऑपरेटर,  त्याशिवाय लिफ्ट ऑपरेटर, केअरटेकर, शिपाई, चपराशी, चौकीदार, सफाई कर्मचारी, मदतनीस, हमाल व इतर पदे

शासकीय खर्च आटोक्यात येऊन विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा म्हणून कर्मचाऱ्यांच्या नवीन पदनिर्मिती न करता कर्मचारी सेवेचे आऊटसोर्सिंग (बाह्ययंत्रणेद्वारे) करण्याचा निर्णय राज्याच्या वित्त विभागाने घेतला आहे. सरकारी सेवेतील काही कामे बाह्ययंत्रणेकरून केली जातील. त्यामुळे सरकारी खर्चात वीस ते तीस टक्के बचत होईल.  मंत्रालयीन विभागातील लिपिक, टंकलेखक, स्वीय सहायक, लघुटंकलेखक, सर्व कार्यालयांमधील कनिष्ठ लेखापाल ही पद नियमितपणे भरणे आवश्यक असल्याने बाह्ययंत्रणेतून वगळण्याचा निर्णयही वित्त विभागाने घेतला आहे.

वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि गृह विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील १०० टक्के पदे ही सरळसेवा पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. मात्र, शासकीय रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्याची भूमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख घेत असल्याची टीका कर्मचारी संघटनांनी केली आहे.

 • कंत्राटी नोकरभरती हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. आमची संघटना त्याविरुद्ध मोठे आंदोलन उभारेल. – भाऊसाहेब पठाण, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ.
 • कायमस्वरूपी पदे भरण्याच्या आपल्याच घोषणेला सरकारने हरताळ फासला आहे. कंत्राटी भरतीचा निर्णय तातडीने मागे घ्या, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. – विश्वास काटकर, सरचिटणीस, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना.

Maharashtra State Mega Bharti 2022

Maharashtra State Mega Bharti 2022 : The number of vacancies in important departments in the state has increased significantly. The recruitment process for 1700 posts in the Maharashtra state will be implemented in three phases after April as there are difficulties in implementing government schemes effectively. Further details are as follows:-

State Mega Recruitment 2022

राज्यात विविध विभागात लाखो पदे रिक्त असून मागील पाच सहा वर्षात सरकारी नोकर भरती झालेली नाही. महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत.

विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत विचारला होता. नाना पटोले यांच्या प्रश्नाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिले. राज्यात भरतीसाठी १५ हजार ३९० पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले १ हजार ७०० पदांसाठी लवकरच जाहिराती प्रसिद्ध होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

राज्यात कोविडमुळे गेल्या 2 वर्षात शासकीय नोकरभरती झालीच नाही. त्यासंदर्भात नाना पटोलेंनी विचारलेल्या प्रश्नावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिले आहे. विविध शासकीय विभागांसाठी एकूण ११ लाख ५३ हजार ४२ पदे मंजूर असून त्यातील ८ लाख ७७ हजार ४० पदे भरलेली आहेत तर २ लाख ३ हजार ३०३ पदे रिक्त आहेत. राज्यात कोविड प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या काळात पदांची भरती होऊ शकली नाही, मात्र आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवून भरती प्रक्रियेला गती दिली आहे. गृह, आरोग्य आदी विभागांना देखील पद भरतीची परवानगी दिली असून भरती प्रक्रिया ताबडतोब राबवली जाणार आहे, असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

शासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवेच्या कोट्यातील भरती प्रक्रिया करण्यासाठी विविध विभागांकडून १५ हजार ३९० पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले असून ७३६६ पदांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे. या सहा महिन्यात साधारणतः ६ हजार २०० पदांकरिता ३०० जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून लवकरच 1700 पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करुन भरती प्रक्रिया राबविण्यात येईल असे सांगून गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उत्तम काम केले असल्याचेही राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले.

काय म्हणाले होते नाना पटोले

विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, दरवर्षी 9 टक्के कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असतात. आता जो रिक्त पदांचा आकडा सांगितलेला आहे तो कमी आहे. रिक्त पदांची संख्या यापेक्षा जास्त आहे. गेल्या पाच-सहा वर्षात एकही नोकर भरती झालेली नाही. विधानसभेतही कर्मचाऱ्यांचा मोठा बॅकलॉग आहे. कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसेल तर आपण जनतेला सेवा कशी देणार ? मागील सरकारच्या काळातही नोकर भरती केली गेली नाही. ह्या रिक्त पदांची भरती लवकर होणे गरजेचे आहे. विविध विभागात रिक्त असलेल्या लाखो पदांची भरती करण्यासंदर्भात राज्य सरकारची काय योजना आहे? आणि किती दिवसात नोकर भऱती करणार, असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.

जलसंपदा विभागातील पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली आहेत. रिक्त पदांच्या भरतीचे नियोजन सुरु असून तीन महिन्यांत जलसंपदा विभागातील 14 हजार पदांची भरती प्रक्रिया राबविली जाईल. जेणेकरून प्रलंबित व प्रस्तावित कामांना गती येईल.

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Sagar Ashoksingh Rajput says

  Kadhi honar bharati pariksha nahi gheta Direct Bharti karawet

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड