राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मार्च महिन्याच्या पगाराबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय! – State Employees Payment Update
State Employees Payment Update
State Employees Payment Update – राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे आनंदाची बातमी आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतना संदर्भात. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुढील एप्रिल महिन्यात मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा मोठा सण येत आहे. तथा पुढील एप्रिल महिन्यात 14 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती राहणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्यांच्या वेतना संदर्भात अर्थातच जे वेतन राज्य कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात मिळेल त्या वेतनाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
रमजान ईद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त मार्च महिन्याचे वेतन हे कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच निर्गमित करण्याचा मोठा निर्णय झाला आहे. यामुळे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. विशेष बाब अशी की याबाबतचे शासन परिपत्रक देखील निर्गमित करण्यात आले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचे परिपत्रक निर्गमित केले असून पुढील महिन्यात 10 आणि 11 एप्रिल ला असणाऱ्या रमजान ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतर 14 एप्रिलला असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या निमित्ताने राज्य कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मार्च महिन्याचे वेतन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या संदर्भात शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत 19 मार्च 2024 रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित झाले आहे. यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात येणाऱ्या सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही अशी आशा आहे. परिणामी शिक्षण आयुक्तालयाच्या या निर्णयाचे राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.
Comments are closed.