मे २०२५ पासून स्टाफ सिलेक्शन परीक्षा देताना ‘आधार’ अनिवार्य? जाणून घ्या नव्या नियमांबद्दल!
Staff Selection Commission Recruitment
स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एसएससीने त्यांच्या आगामी सर्व भरती परीक्षांमध्ये आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रणाली मे २०२५ पासून लागू केली जाईल आणि सध्या ती ऐच्छिक असेल. या निर्णयाचा उद्देश परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरळीत करणे आहे. एसएससी ही केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये व विभागांतील नॉन-गॅझेटेड पदांसाठी परीक्षा घेणारी एक प्रमुख भरती संस्था आहे. आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उमेदवारांना आता ऑनलाईन नोंदणीपासून ते परीक्षा केंद्रावर उपस्थिती नोंदवण्यापर्यंत आधारचा वापर करून स्वतःची ओळख पडताळता येणार आहे. यामागे प्रमुख हेतू म्हणजे परीक्षांमध्ये होणारी फसवणूक, जसे की दुसऱ्याच व्यक्तीने परीक्षेला बसणे किंवा खोटी ओळख सादर करणे, हे प्रकार थांबवणे. आयोगाच्या मते, आधार आधारित पडताळणीमुळे अशा प्रकारांवर परिणामकारक नियंत्रण ठेवता येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App