भरती आयोगासाठीच्या कर्मचारी वर्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी; नोकरभरतीला वेग मिळणार!!
Staff Recruitment Commission Bharti 2022
Staff Recruitment Commission Bharti 2022
Staff Recruitment Commission Bharti 2022: The latest update for Staff Recruitment Commission Recruitment 2022. The cadre for the Recruitment Commission has received approval from the State Cabinet. Therefore, the government recruitment in Goa is likely to gain speed now. For more details about the recruitment, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
भरती आयोगासाठीच्या कर्मचारी वर्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गोव्यातील सरकारी नोकरभरतीला आता वेग मिळण्याची शक्यता आहे. कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातूनच गोव्यातील नोकरभरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती. तसंच यासाठी लागणारा कर्मचारी वर्गही लवकरच भरला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Staff Recruitment Commission Vacancy 2022
- राज्यात यापुढे होणारी नोकरभरती ही सरळ अथवा शिफारशीने न करता गोवा राज्य लोकसेवा आयोगामार्फतच केली जाईल.
- यासाठी आयोगाबरोबरच मनुष्यबळ विकास महामंडळाची मदत घेतली जाणार असून ही प्रक्रिया केंद्र सरकारने घालून दिलेल्या भरती प्रक्रियेनुसार करण्यात येईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मागच्याच महिन्यात दिली होती.
- मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यात विविध खात्यांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत.
- ही पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. मात्र, यासाठी राज्य लोकसेवा आयोगाने घालून दिलेल्या शिफारशींची काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी केली जाईल.
याशिवाय ही संपूर्ण प्रक्रिया या स्वतंत्र आयोगामार्फत केली जाईल. खात्यांतर्गत भरतीसाठी आवश्यकता पत्रे आणि रिक्त पदांचा तपशील आयोगाला सादर करण्यात येईल. आयोग त्याप्रमाणे रिक्त पदांची उद्घोषणा करून परीक्षा, मुलाखत आणि निकाल या पद्धतीने भरून ती राज्य सरकारला सादर करेल.’, असंही मुख्यमंत्री म्हणाले होते.
Table of Contents