दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज आजपासून सुरु, या लिंक वरून… SSC Supplementary Exam Forms 2025
SSC Supplementary Exam Forms 2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) जून-जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारपासून (दि. १५) सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २४ मेपर्यंत, तर विलंब शुल्कासह २९ मेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडून शुक्रवारी (दि. १६) दुपारी तीन वाजता गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी https://www.mahahsscboard.in/ वरील प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल दिनांक १३/०५/२०२५ रोजी ऑनलाईन जाहीर झालेला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जून-जुलै २०२५ मध्ये घेण्यात येणार आहे. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (फेब्रु मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट न झालेले), व जून-जुलै २०२५ परीक्षेसाठी नावनोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, III विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने इयत्ता १० वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्य मंडळाने पुरवणी परीक्षेसाठी बारावीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी या पूर्वीच सुरू केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही नोंदणी सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधारण्यास इच्छुक विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआयचे विद्यार्थी यांना अर्ज भरता येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइन घेता येईल. श्रेणीसुधार विद्यार्थ्यांना जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६, जून-जुलै २०२६ अशा तीन लगतच्या संधी उपलब्ध राहतील. नियमित आणि विलंब शुल्काने अर्ज भरण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.