दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक मार्गदर्शन
SSC HSC Students to Get Educational Help by Counselors of Maharashtra Board
SSC HSC Students to Get Educational Help by Counselors of Maharashtra Board : SSC HSC Exam 2021: दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये सुरू होत आहेत. यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. त्यामुळे त्यांना परीक्षेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये व त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरात तब्बल ४२६ तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.
महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मुंबईमध्ये सर्वाधिक ८३ समुपदेशकांची नियुक्ती केली असून, त्याखालोखाल पुणे ४६, ठाणे ३०, कोल्हापूर २६, रत्नागिरी २५, सातारा २०, नाशिक १८, अहमदनगर १३, रायगड १२, औरंगाबाद १२, अमरावती ११, नागपूर ८ असे सर्व जिल्ह्यांमध्ये समुपदेशक नेमले आहेत. या समुपदेशकांची जिल्हानिहाय यादी, त्यांचे मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दहावीच्या अर्जांसाठी मुदतवाढ
२०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढीनुसार विद्यार्थांना २ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. मंडळाने २ फेब्रुवारीपर्यंत दिलेल्या मुदतीत विद्यार्थांना नियमित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. मात्र त्यानंतर विलंब शुल्क आकारले जाईल. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत ३ ते १३ फेब्रुवारीपर्यंत आहे. नियमित विद्यार्थी तसेच पुनर्परीक्षार्थी, खासगी, श्रेणीसुधार योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी www.mahahsscboard.in या वेबसाइटवर परीक्षा अर्ज भरू शकतात. तसेच १७ नंबरचा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याची मुदत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
सोर्स : म. टा.