महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल मे महिन्यात जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.
यंदा एकूण ३१ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, त्यापैकी २१ लाख विद्यार्थ्यांचे अपार (AADHAR Based Permanent Academic Record) आयडी मंडळाकडे प्राप्त झाले आहेत. हे विद्यार्थी त्यांचा निकाल थेट डिजिलॉकर अॅपमध्ये पाहू शकणार आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध केला जाईल.
राज्य मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, यंदा परीक्षा नेहमीपेक्षा १०-१५ दिवस लवकर घेण्यात आल्या होत्या. परीक्षेदरम्यानच पेपर तपासणीस सुरुवात करण्यात आली होती. क्रीडागुण व सवलतीचे गुण २१ एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदवले गेले, त्यामुळे संपूर्ण निकाल प्रक्रिया अधिक वेगवान व कार्यक्षम झाली आहे.
या वर्षी शिक्षकांनी तपासणीवर कोणताही बहिष्कार न घातल्याने उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन वेळेत पूर्ण झाले. मंडळाने शाळा व महाविद्यालयांकडून सतत पाठपुरावा करत निकाल प्रक्रियेत गतिमानता आणली आहे.
महत्त्वाचं म्हणजे, महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे, जिथे तब्बल ८७ टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्यात आले आहेत, आणि त्यापैकी सुमारे ६०-६५ टक्के अपार आयडी राज्य मंडळाकडे पोहोचले आहेत. त्यामुळे यंदा निकालाच्या प्रक्रियेमध्ये डिजिटल सुलभता आणि शाश्वतता अधिक दिसून येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम अंतिम टप्प्यात असून १५ मेपूर्वी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या संधी वाढवण्यासाठी यंदा परीक्षा लवकर पार पडल्या. त्यामुळे निकालदेखील लवकर जाहीर करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. याशिवाय, पुरवणी परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, उत्तरपत्रिका तपासणी वेगाने सुरू असून १५ मेपूर्वी निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. मागील दोन वर्षांत मे अखेरीस निकाल जाहीर झाला होता, मात्र यंदा परीक्षा लवकर झाल्याने निकालाची तारीखही पुढे आणली गेली आहे.
विद्यार्थ्यांसाठी नियम कडक करण्यात आले होते. यंदा परीक्षा केंद्रांवर त्या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी नियुक्त न करता इतर शाळांमधून पर्यवेक्षक आणि अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. राज्यातून सुमारे ३१ लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते.
निकाल जाहीर झाल्यानंतर तो राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांनी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळावर अद्ययावत माहिती तपासावी.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















