दहावी बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाणून घ्या

SSC HSC Exams 2021

SSC HSC Exams 2021 : ssc hsc exam 2021 final timetable available on maharashtra board website at mahahsscboard in – राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र राज्य मंडळाकडून १६ फेब्रुवारीला जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकावर मागवण्यात आलेल्या सूचनांनतर शुक्रवारी दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मेदरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे एप्रिल-मे २०२१मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक १६ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले होते. त्यावर आलेल्या सूचनांचे अवलोकन करून राज्य मंडळाने शुक्रवारी दहावी व बारावीचे संभाव्य वेळापत्रकच अंतिम केल्याचे जाहीर केले. अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.


दहावी-बारावी परीक्षांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ!!

SSC HSC Exams 2021 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षेला खासगीरित्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठीची मुदत वाढवून सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

सोमवार २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाइटवर जाऊन दहावी साठी http://form17.mh-ssc.ac.in या लिंकवर, तर बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in या लिंकवर नोंदणी करता येणार आहे. विलंब शुल्कासह १ ते ७ मार्च या कालावधीत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. मात्र त्यानंतर यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दहावी व बारावी परीक्षेसाठी अर्जही ऑनलाइन पद्धतीने नियमित व विलंब शुल्कासह स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजांमार्फत भरावे. माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजांतील प्राचार्य यांनी ऑनलाइन अर्ज भरताना कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर सरकारने व विशेषतः आरोग्य विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या सर्व सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.

सोर्स : म. टा.


SSC HSC Exams 2021 : राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, पुन्हा लॉकडाउन होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षा होणार की, नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात किंवा ऑनलाइन घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होऊ लागली आहे. मात्र, तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही. यामुळे परीक्षा ऑफलाइनच होतील, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यात वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागांमध्ये ‘नाइट कर्फ्यू’ लावण्यात आला आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास लॉकडाउनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांवरही करोनाचे पुन्हा सावट आले आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी किंवा ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे ट्विटर मार्फत करण्यात येत आहे.

वाढत्या करोनामध्ये प्रत्यक्षात परीक्षा घेतल्यास आमच्या मुलांचा जीव धोक्यात घातला जाऊ शकतो. अनेक शाळांमध्ये व परीक्षा केंद्रावर पुरेशा सुरक्षा व्यवस्था नाही त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आमच्या मुलांच्या जिवाची काळजी घेऊन दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. तर काही विद्यार्थी व पालकांनी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना ट्विटरवरून केली आहे.


SSC HSC Exams 2021 : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, शालेय विद्यार्थ्यांनाही आता करोनाची लागण होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयता दहावी व बारावीच्या परीक्षा कशा होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या परीक्षा ऑनलाइन घेण्यास पालक आणि संघटनांची पसंती असली, तरी तज्ज्ञांचा विरोधाचा सूर आहे.

राज्यातील करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने गेल्या आठवड्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत, तर इयत्ता दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे. करोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले. दिवाळीनंतर राज्यात करोनाचा कमी प्रादुर्भाव असणाऱ्या ठिकाणी इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर दीड महिन्याने काही जिल्ह्यांत इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, मुंबई आणि परिसरातील शाळा अजूनही बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू असले, तरी ग्रामीण भागात त्यास मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा अपेक्षित अभ्यास पूर्ण झालेला नाही. आता परीक्षा जवळ आल्या असताना, अनेक ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना करोनाची लागण होत आहे. अशा परिस्थितीत अनेक जिल्ह्यांत २८ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. या सर्वांचा परिणाम इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे नियोजन करण्यावर होत असल्याचे चित्र आहे.

मुलांच्या सुरक्षेच्या कारणामुळे पालकांकडून ऑनलाइन परीक्षेला पसंती देण्यात येत आहे. मात्र, दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३१ लाख इतकी आहे. अशा परिस्थितीत लॅपटॉप, कम्प्युटर किंवा स्मार्टफोनवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात अडचणी आहेत. त्यातच इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या ग्रामीण भागात आहे. सध्या शहरी भागातही इंटरनेटचा वेग मंदावल्याच्या अनेक तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाइन परीक्षा तांत्रिक अडचणीची व गैरसोयीचे ठरू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


10 वी, 12 वी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर

SSC HSC Exams 2021 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच परीक्षा फेब्रुवारी-मार्चऐवजी एप्रिल-मे या कालावधीत होईल.

करोना व लॉकडाउनमुळे बारावी व दहावी परीक्षांच्या निकालास विलंब झाला. लॉकडाउनमुळे १० महिन्यांहून अधिक काळ शाळा, महाविद्यालये बंद होती. परिणामी २०२१ मधील परीक्षा एप्रिल-मे या कालावधीत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यानंतर विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. दरम्यानच्या काळात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या. यानंतर आता राज्य मंडळाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

शाळा व कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, या हेतूने; तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असून, विद्यार्थ्यांनी याच वेळापत्रकाचा आधार घ्यावा. सोशल मीडियावर प्रसिद्ध होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा व अन्य परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळा व महाविद्यालयांना कळवले जाईल, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.

हरकती, सूचना पाठवा

‘दहावी व बारावीच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत काही हरकती, सूचना असल्यास त्या राज्य अथवा विभागीय मंडळाकडे २२ फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरूपात पाठवाव्यात,’ असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळवले आहे.


दहावी, बारावीच्या परीक्षा कधी? निकाल कधी? जाणून घ्या….  

SSC HSC Exams 2021 : SSC HSC Exam Dates 2021: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत आणि बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे या कालावधीत आयोजित केली जाणार आहे.

करोनासाठी आवश्यक ती काळजी घेऊन या परीक्षांचे नियोजन केले जाणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. परीक्षा झाल्यानंतर बारावी परीक्षांचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्या तर दहावीचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

निकाल कधी?

दहावी, बारावी परीक्षेचे निकाल कधी जाहीर केले जातील याबाबतची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दहावीचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस लागणार आहे. बारावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

गेले अनेक दिवस लाखो विद्यार्थी परीक्षांच्या तारखांची आतुरतेने वाट पाहत होते. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा विलंबाने होत आहेत.


दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखेबाबत शिक्षणमंत्र्यानी दिली महत्त्वाची माहिती

SSC HSC Exams 2021 : Schools in the state are being started in phases, now the important information given by the Minister of Education about the 10th and 12th examinations – गेल्या वर्षभरापासून देशात आणि राज्यात धुमाळूक घालत असलेला कोरोनाचा संसर्ग आता हळूहळू नियंत्रणात येत आहे. तसेच कोरोनाविरोधातील लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील मुंबई वगळता इतर भागातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग काही काळापूर्वी सुरू झाले होते. तर आता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होत आहेत. त्यानंतर आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबतही महत्त्वाची माहिती शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या मध्यावर किंवा शेवटच्या आठवड्यात घेण्याबाबत विचार सुरू आहे. याबाबत निश्चित असा निर्णय लवकरच घेतला जाईल.

दरम्यान, नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने काल केली होती. तसेच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला असतील, अशी सूटही सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र मुंबई महानगपालिका क्षेत्रातील मात्र पुढील निर्णयापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोर्स : लोकमत


SSC HSC Exams 2021 : SSC HSC Exam Dates Update: Maharashtra board SSC HSC exams 2021 dates will be declared in this week –  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra Board) इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा (Exam timetable) या आठवड्यात जाहीर करणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही माहिती दिली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दहावीची परीक्षा मे महिन्यात तर बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर आयोजत करण्यात टेणार असल्याचे पाटील यांनी सोमवारी सांगितले. यापूर्वी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.

बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे निवृत्त झाल्याने दिनकर पाटील यांच्यावर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. ‘आम्ही परीक्षांच्या तारखा या आठवड्यात जाहीर करू. विद्यार्थी, शिक्षक, पालकांना परीक्षांच्या तारखा पुरेशा वेळेआधी माहित असल्या तर त्यांना तयारीसाठी पूर्ण वेळ मिळेल,’ असं पाटील म्हणाले.

दहावी-बारावी परीक्षा सर्वसाधारणपणे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जातात. पण यावर्षी कोविड-१९ महामारी स्थितीमुळे त्या विलंबाने घेण्यात येणार आहेत. परीक्षा ४० ते ४५ दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

पाटील म्हणाले, ‘बोर्डाने नुकतेच पुरवणी परीक्षांचे आयोजन केले होते. सुमारे दोन लाखांवर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षा सुरळीत पार पडली. दोन आठवड्यात निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्यांना कोणतीही समस्या जाणवली नाही. याच पद्धतीने संपूर्ण सुरक्षा, खबरदारीसह नियमित परीक्षाही आम्ही आयोजित करू असा आम्हाला विश्वास आहे.’

दरम्यान, दहावीचे परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.


SSC HSC Exams 2021 : ssc hsc exams 2021 likely to be conducted in april and may, says education minister varsha gaikwad – केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ‘सीबीएसई’च्या दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा (Maharashtra Board Exam 2021 Date) जाहीर केल्या आहेत. यानंतर राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावीची परीक्षा ३ मेनंतर आणि बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

SSC HSC Exams 2021

करोनामुळे यंदा शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. तर, मुंबई आणि परिसर वगळता राज्यातील इतर भागात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या, तरी विद्यार्थी आणि पालकांचे परीक्षा कधी होणार, याकडे लक्ष होते. या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा तीन मेनंतर आणि बारावीची परीक्षा पंधरा एप्रिलनंतर घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली. त्याचप्रमाणे पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

तसेच, राज्यातील करोनाची परिस्थिती आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून माहिती घेऊनच शाळा सुरू करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. मुंबई-पुणे व्यतिरिक्त अनेक भागांमध्ये शाळा सुरू झाल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.

सोर्स : म. टा.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड