महत्वाचे! सतरा नंबर फॉर्म भरण्यासाठी उद्यापासून अतिविलंब शुल्क; फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेला अर्जाची संधी | SSC HSC Board Exams 2025

SSC HSC Board Schedule 2025

How to Fill Form 17 Of SSC HSC Exam 

SSC HSC Board Schedule 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी विद्याथ्यर्थ्यांना खासगीरीत्या सतरा नंबरद्वारे फॉर्म भराण्याची सुविधा उपलब्ध आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिविलच शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत गुरुवार (ता. ३१) पासून सुरू होत आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दहावीच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्च २०२४ च्या परीक्षेपासून संपर्क केंद्र बंद करून सर्व माध्यमिक शाळांतून फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्याथ्यांसाठी सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शत्तींनुसार नावनोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या कागदपत्रांची आवश्यकता

अर्ज प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात अतिविलंब शुल्कासह गुरुवार (ता. ३१) पासून ३१ डिसेंबरपर्यंत मुदत उपलब्ध असेल. अर्जभरताना शाळा सोडल्याचा दाखला (मूळप्रत), नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पासपोर्ट आकारातील छायाचित्राची आवश्यकता असेल.

त्यांनाही मिळणार संधी
• शिक्षणप्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या परंतु किमान पाचवी उत्तीर्ण असलेल्या मुला-मुलींना परीक्षेस प्रविष्ट करून घेण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.


SSC HSC Board Exam Date, Timetable 2025

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भरायचे आहेत. त्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु, आता मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


: Previous Updates : 

एक महत्वाचा अपडेट, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरायची प्रक्रिया सोमवार, ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना विवीध शाळांच्या माध्यमातून ५ नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज सादर करता येईल. 

 


SSC HSC Board Exam Date, Timetable 2025

मित्रांनो, महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत यंदा आठ ते दहा दिवस लवकरच घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षांच्या तारखांबाबत हरकती, सूचना मांडण्यासाठी २३ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची तोंडी, प्रात्यक्षिक अंतर्गत मल्यमापन परीक्षा  २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत, लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान घेण्यात येणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

तर दहावीची तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आणि लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या दरम्यान घेण्याचे नियोजन आहे. शाळा-कनिष्ठ महाविद्यालये, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्यासाठी संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विषयवार सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. तारखांवरील हरकती, सूचना [email protected] या संकेतस्थळावर पाठवण्याबाबत राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले.

 


Fee Waiver for students

SSC HSC Board Schedule 2024: The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (State Board) has announced to give examination fee waiver and fee reimbursement to the students of class 10th and 12th in drought-affected areas of the state. According to this, 2 lakh 84 thousand 208 students of 12th class, 3 lakh 28 thousand 914 students of 10th class, total 6 lakh 13 thousand 122 students will get fee reimbursement. The government decision has been announced by the school education department.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) राज्यातील दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, शुल्क प्रतिपूर्ती देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार दुष्काळी भागातील बारावीच्या 2 लाख 84 हजार 208 विद्यार्थ्यांना, तर दहावीच्या 3 लाख 28 हजार 914 अशा एकूण 6 लाख 13 हजार 122 विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती मिळणार आहे. तसा शासननिर्णयच शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. 

यंदा राज्यात कमी पाऊस पडल्याने राज्यभरातील 40 तालुक्यांसह 1 हजार 21 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, शुल्क प्रतिपूर्ती करण्याची योजना आहे. त्या अनुषंगाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधण्याबात राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना, तसेच त्यासंदर्भातील कार्यवाहीबाबत शाळांना सूचना दिल्या आहेत.
दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफी, शुल्क प्रतिपूर्तीसाठी 32 कोटी 7 लाख 97 हजार 475 रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाच्या योजना विभागाकडून सादर करण्यात आला होता. यामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 15 कोटी 88 लाख 24 हजार 925 रुपये, तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 16 कोटी 19 लाख 62 हजार 550 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


SSC HSC Board Exam New Update 2024

SSC HSC Board Exam 2024: There is important news for students of class 10th and 12th. Next month 12th and 10th exams will be held in March. Students will be given 10 minutes more time than the scheduled time for these exams to solve the paper. This will benefit the children. Before this, the examination papers were distributed to the examinees ten minutes before the scheduled time of the examination as well as the question papers were distributed in the examination hall.

 दहावी (SSC Exam)  आणि बारावी बोर्ड परीक्षा (HSC Exam)  देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये  परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून दिली जाणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा देणाऱ्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा विद्याथ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते.  परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल इाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत  पालक, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दिली जाणार आहेत. गेल्या वर्षी देखील वेळ वाढवून देण्यात येत आहे.

सकाळ सत्रात स. 10.30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक

फेब्रुवारी-मार्च 2024  परीक्षांचा वेळी ही सकाळ सत्रात सकाळी 11.00  वाजता तसेच दुपार सत्रात दु.3.00 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकाचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. सकाळ सत्रात स. 10.30 वाजता तसेच दुपार सत्रात दु. 2.30  वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे

फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षांसाठी खालीलप्रमाणे वेळ वाढवून देण्यात येणार (HSC- SSC Exam Schedule) 

परीक्षेचा सध्याचा वेळ

परीक्षेची सुधारीत वेळ

 सकाळी 11 ते दुपारी 2 

सकाळी 11 ते दुपारी 2:10

 सकाळी 11 ते दुपारी 1

 सकाळी 11 ते 1:10 

सकाळी 11 ते दुपारी 1.30

सकाळी 11 ते दुपारी 1.40

बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालवधीत होणार आहे.  फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणा आहे.


SSC HSC Board Exams Schedule 2024

बारावी आणि दहावीच्या वर्गासाठी घेण्यात येणाऱ्या शालांत प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात केले जाणार आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने यापूर्वीच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बाराव्या वर्गाची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रात्यक्षिक परीक्षा आणि माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची परीक्षा २ ते २० फेब्रुवारी दरम्यान घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे, दहाव्या वर्गाची परीक्षा १० ते २९ फेब्रुवारीदरम्यान शाळांना घ्यावयाची आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्य शिक्षण विषयांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा २७ मार्च ते ६ एप्रिलदरम्यान घेण्यात येईल. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

SSC HSC Board Exams 2023: Semester Pattern for 10th-12th now! One session before Diwali and second session in March; Implementation from 2024-25 or 2025-26. A major change is going to be made in the examination pattern for the students of class 10th and 12th. Now they will have exams twice a year. There will be one session before Diwali and the second and final session in March. According to the new National Education Policy, this change may be implemented from the upcoming academic year 2024-25 or 2025-26, informed senior sources in the Pune Board.

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत मोठा बदल केला जाणार आहे. आता त्यांची वर्षातून दोनदा परीक्षा होतील. दिवाळीपूर्वी एक सत्र आणि मार्चमध्ये दुसरे व अंतिम सत्र होईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या बदलाची अंमलबजावणी आगामी २०२४-२५ किंवा २०२५-२६च्या शैक्षणिक वर्षापासून होऊ शकते, अशी माहिती पुणे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

दहावी, बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या करिअरचा पाया मानला जातो. विद्यार्थ्यांमध्ये त्या परीक्षांची नेहमीच चिंता असते आणि पालकांवरही ताण असतो. अनेकजण विशेषत: मुली अनुत्तीर्ण झाल्यावर अर्ध्यातूनच शिक्षण सोडतात.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून हा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याची तयारी सुरू झाली असून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षा, अभ्यासक्रमासह इतर १० मुद्द्यांवर पालक, शिक्षक, अभ्यासकांसह सर्वसामान्य लोकांची मते मागविली आहेत. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासता येत नाही, असे तुम्हाला वाटते का? बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या सध्याच्या पद्धतीत बदल काही करण्याची गरज आहे का? बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती तशीच राहू द्यावी की बदलावी, असे तुम्हाला वाटते का? अशा प्रश्नांवर त्यांची मते मागवून घेतली आहेत. त्याचा विचार करून दोन वर्षांत नवीन पद्धत अवलंबली जाणार आहे.

पाठांतराची सवय कमी करण्याचा प्रयत्न

नवीन अभ्यासक्रमात पुस्तकांचा मजकूर कमी करून ते मनोरंजक आणि समर्पक बनविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुस्तकांच्या आशयाची सांगड घातली जाणार असून, विद्यार्थ्यांसाठी सामग्री लक्षात ठेवण्याऐवजी, ती वैचारिक बनविण्याचाही अभ्यासक्रमातून प्रयत्न होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

नवीन बदल असा असणार…

शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच अध्यापन करतील. पण, पदवी तथा पदव्युत्तर पदवीच्या परीक्षांप्रमाणे दहावी- बारावीच्या परीक्षाही सत्र पद्धतीनेच होतील. पहिले सत्र दिवाळीपूर्वी घेले जाणार असून पुढील सत्र मार्च महिन्यात होईल. तत्पूर्वी, त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पार पडेल. शेवटी दोन्ही सत्र परीक्षांचे गुण एकत्रित करून बोर्डाच्या माध्यमातून निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. तत्पूर्वी, पहिल्या सत्राचे गुण विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहेत.

सेमिस्टर पॅटर्नचा हेतू…

  • विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यांच्यावरील ताण कमी होईल
  • एका सत्रात कमी गुण मिळाल्यास दुसऱ्या सत्रात त्यांना जास्त अभ्यास करण्याची संधी
  • अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या सहा महिन्यातच पुन्हा संधी मिळेल आणि त्यामुळे अर्ध्यातून शाळा सोडणे थांबेल


Extension of time for SSC HSC applications 2023

SSC HSC Board Exams 2023: The online application deadline for Class X and Class XII exams has ended on Monday (20th), and the dates for application submission with late fee for Class X and late fee for Class XII have been announced. A circular in this regard has been issued by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education.

मार्च २०२४ परीक्षेस नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन, आयटीआयचे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सादर करता येत आहेत. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सोमवारी (ता.२०) संपली असून, दहावीसाठी मुदतवाढ आणि बारावीसाठी विलंब शुल्कासह अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यासंबंधी परीपत्रक काढण्यात आले आहे.

इयत्ता दहावीसाठी नियमित अर्जाची मुदत संपली असून आता ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. विलंब शुल्कासह १ ते ८ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येतील. इयत्ता बारावीसाठी विलंब शुल्कासह २१ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहेत. अर्जाचे शुल्क भरल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


 

SSC HSC Board Exams 2023 Update

SSC HSC Board Exams 2023: The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has provided the facility for private students to fill the Form No. 17 for the 10th and 12th examinations. Accordingly, the deadline has been extended till November 7 for students to fill the application form with late fee.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी आणि बारावीच्या माहे फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या परीक्षेस फॉर्म १७ द्वारे खासगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

परीक्षेसाठी अतिविलंब शुल्कासह नोंदणीची मुदत ७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा व अधिक माहिती करिता इयत्ता १० वी साठी http:// form17. mh- ssc. ac. in तर १२ वी साठी http:// form17. mh- hsc. ac. in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे नागपूर विभागीय मंडळाचे सचिव चिंतामण वंजारी यांनी कळवले आहे.

खासगी विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही. तसेच परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइनद्वारे देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडून दिलेल्या कालावधीनंतर परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी.

फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने विलंब शुल्काने १५ ऑक्टोबरपर्यंत आणि अतिविलंब शुल्काने ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याच्या तारखा निश्चित केल्या होत्या. परंतु त्यानंतर अतिविलंब शुल्काने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने दिलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काने नावनोंदणी करण्यासाठी ७ नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. यानंतर कोणत्याही प्रकारे मुदतवाढ दिली जाणार नाही, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे स्पष्ट केले आहे.

 


Maha Board SSC Online Application 2023

SSC HSC Board Exams 2023: On behalf of the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, the facility has been made available from Friday (20th) for regular students to fill online application form for regular students with regular fees for the Class X examination to be held in March 2024. Secondary schools will have to fill the exam form from Saral database. The applications of secondary school re-examiners, name registration certificate, private students who have received it, students entering the exam with upgrade and occasional subjects, students taking transfer of credit through industrial training institute etc. will be filled online in the usual manner.

The application facility will continue till November 20. After filling and submitting the applications of all the students, the pre-list will be made available from the login of the secondary schools during the application period.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी / मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाइन अर्जप्रक्रिया शुक्रवार, २० ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना २० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. ऑनलाइन अर्ज हे सरल डेटाबेसवरून भरायचे आहेत.

  या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्य मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची तारीख गुरुवारी जाहीर केली. पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी अर्ज हे माध्यमिक शाळेमार्फत भरावेत. अर्ज स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांची सरल डेटाबेसमध्ये नोंद असणे आवश्यक आहे. कौशल्य सेतू अभियानाचे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट मागणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून विषयासमोर ट्रान्सफर ऑफ क्रेडिटची नोंद करावी.
मार्च २०२४ मधील परीक्षेसाठी मार्च २०२३ अथवा जुलै-ऑगस्ट २०२३ मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजने अंतर्गत अर्ज भरून परीक्षेसाठी प्रविष्ट होता येणार आहे. त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणत्याही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्याला श्रेणीसुधार योजने अंतर्गत परीक्षेसाठी प्रविष्ट होता येणार नाही, अशा सूचना राज्य मंडळाने केल्या आहेत.

बोर्ड परीक्षांचे नवीन शुल्क…

  • नियमित विद्यार्थी : ५०० रुपये
  • नियमित खासगी विद्यार्थी : ५०० रुपये
  • पुनर्परिक्षार्थी : ४८० रुपये
  • श्रेणी सुधार : ९२० रुपये
  • आयसोलेटेड विद्यार्थी : ५२० रुपये
  • प्रात्यक्षिक शुल्क : प्रति विषय १५ रुपये
  • ‘एमसीव्हीसी’ प्रात्यक्षिक शुल्क : प्रति विषय ३० रुपये

यंदा इयत्ता दहावीसाठी राज्यातील अंदाजे १६ लाख तर बारावीसाठी १४ ते १५ लाख विद्यार्थी असतील, असा बोर्डाचा अंदाज आहे. परीक्षेसाठी राज्यात साडेपाच हजारांपर्यंत केंद्रे असणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी भाषा विषय सोडून अन्य विषयांच्या दोन पेपरमध्ये किमान एक दिवसाचे अंतर ठेवले जाते.

फेब्रुवारीअखेरीस सुरु झालेली बोर्डाची परीक्षा मार्चअखेरीस संपेल, असे सध्याचे नियोजन आहे. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात दहावीचे २८० तर बारावीसाठी १९० परीक्षा केंद्रे असतील. नगर जिल्ह्यात दहावीसाठी १७९ तर बारावीसाठी १०८, सोलापूर जिल्ह्यात दहावीसाठी १७६ तर बारावीसाठी ११४ परीक्षा केंद्रे असणार आहेत.

१२वी फेब्रु २०२४ परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाइन सादर करण्याच्या तारखेबाबत.

१०वी १२वी मार्च२४ परीक्षेसाठी खाजगी अर्ज विलंब शुल्काने स्वीकारणेबाबत

उच्च नायलाय मुंबई खंडपीठ नागपूर औरंगाबाद विधिज्ञांचे पॅनल निश्चितीबाब

DATE EXTENDED OF PRIVATE CANDIDATE(17.NO) FORM FOR HSC SSC MAR 2024

संभाव्य वेळापत्रक इ. १० वी मार्च २०२४ 


Maha Board SSC, HSC Exam 2024 

Maharashtra SSC, HSC Time Table 2024, Maharashtra Board Class 10th 12th Date Sheet 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) फेब्रुवारी आणि मार्चमध्ये इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षा घेणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीची म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे. तर 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 19 मार्चपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत होणार आहे.  या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Maharashtra Board Admit Card 2024: कधी मिळणार हॉल तिकिट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. मात्र, यासंदर्भात सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही. लक्षात ठेवा की प्रवेशपत्राशिवाय तुम्हाला परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

 

Maharashtra Board 10th 12th Time Table 2024

  • महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर 10वी आणि 12वी वेळापत्रक 2024 च्या लिंकवर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
  • विद्यार्थी ही PDF चेक करू शकतात आणि डाउनलोड करू शकतात.

Maharashtra Board Exam 2024: उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण लागणार?

महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 35 टक्के गुण मिळवणे बंधनकारक असेल. मात्र, यापेक्षा कमी गुण मिळाल्यास त्यांना पुर्नपरीक्षेला बसण्याची संधी मिळेल. महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2024 शी संबंधित लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही बोर्डाची अधिकृत वेबसाइट देखील पाहू शकता.


SSC HSC Board Exams 2023: According to the important changes in the new education policy, many student centric and student welfare decisions have been taken. According to these rules, the 10th and above board exams will now be held twice a year. Students of class XI and XII will be able to choose subjects according to their interest and not branch wise.

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा आता दोन टप्प्यात होणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षांपासून बोर्ड परीक्षासंदर्भात हा मोठा बदल आमलात आणला जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy ) अभ्यासक्रमाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाच्यावतीने बुधवार, २३ ऑगस्ट २०२३ ला देण्यात आली. आता २०२४ च्या शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तके तयार केली जाणार असून, बोर्ड परीक्षा दोन टप्प्यात होणार आहेत.

शिवाय, विद्यार्थ्यांचा ज्या विषयांचा अभ्यास पूर्ण झाला, फक्त त्याच विषयाचे पेपर देण्याचे स्वातंत्र्यही विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. सोबतच, अकरावी आणि बारावीला दोन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले आहेत. त्यामध्ये एका भारतीय भाषेचा समावेश असायला हवा, अशी अट घालण्यात आली आहे. काल ( केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने काय काय निर्णय घेतले याबाबत जाणून घेऊयात..

इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा आता वर्षातून दोन टप्प्यात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्षातून दोन्ही वेळा बोर्डाची परीक्षा देण्याची मुभा आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर मिळणाऱ्या गुणांपैकी सर्वोत्तम गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नव्या शैक्षणिक आराखड्यानुसार (new curriculum framework), अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थांना यापुढे दोन भाषा अनिवार्य करण्यात आल्या आहेत. शिवाय, त्यापैकी एक भारतीय भाषा असणे गरजेचे आहे, अशी अट घालण्यात आली आहे

शिक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy) अभ्यासक्रमाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली असून, पुढील शैक्षणिक वर्षासाठी या नियमानुसार शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके (textbooks) तयार केली जाणार आहेत.

आताच्या बोर्डाच्या पद्धतीनुसार, विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील भार कमी व्हावा यासाठी हा नवा पॅटर्न राबविण्यात येणार आहे. शिक्षणाच्या या नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आकलन आणि यशाचे मुल्यांकन करता येईल.

नव्या धोरणांमुळे विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळावी यासाठी वर्षातून किमान दोनदा बोर्ड परीक्षा दिल्या जात आहेत, असे शिक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. शिवाय वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार असणाऱ्या या परीक्षांमध्ये ज्या विषयांचा अभ्यास झालाय, फक्त त्याच विषायाची परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच एकाच वेळी सर्व विषयांचीही परीक्षा दोन वेळा देता येणार आहे. निकालानंतर ज्या प्रयत्नामध्ये सर्वोत्तम गुण मिळाले असतील अशा गुणांचा विचार अंतिम निकालासाठी केला जाणार आहे.

याशिवाय, अकरावी-बारावीसाठी विषयांची निवड विद्याशाखानिहाय, म्हणजेच कला, विज्ञान आणि वाणिज्य, बायफोकल अशी राहणार नसून कोणत्याही शाखेतील विविध विषय निवडण्याचे स्वातंत्र्य नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना मिळणार आहे.


Maha SSC-HSC Exam Important Update

SSC HSC Board Exams 2023 – The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education conducted the 10th and 12th exams in February-March. Now the students are curious about when the result of this exam will be released. Important information regarding the result has been received. The wait of the students for the results of 10th-12th is about to end. The result will be available for the students soon on the official website of the board, maharesults.mic.in.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल कधी लागणार यासंदर्भात उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली आहे. निकालासंदर्भात महत्वाची माहिती मिळाली आहे. दहावी-बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा संपणार आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट maharesults.mic.in वर विद्यार्थ्यांसाठी निकाल लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाकडून बारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लावला जातो. त्यानुसार २० मे पूर्वी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लावला जातो. त्यानुसार ३१ मे पूर्वी दहावीचा निकाल लागणार आहे.

दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15,77,256 विद्यार्थी बसले होते. त्यात 8,44,116 मुले तर 7,33,067 मुलींचा समावेश होता. राज्यभरातील 5,033 सेंटरवर दहावीची परीक्षा झाली होती. आता या सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे.

कुठे पाहाता येईल निकाल?

दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहाता येणार आहे.

  • www.mahresult.nic.in
  • www.hscresult.mkcl.org
  • www.mahahhscboard.in

 

 


SSC HSC Board Exams 2023

SSC HSC Board Exams 2023 – Date wise detailed final time table of 10th-12th examinations is available on the board’s website ‘www.mahahsscboard.in’. The time table facility on the Board’s website is for information only. The timetable issued in printed form by the Secondary School, Higher Secondary School, Junior College before the examination will be final. Download SSC HSC Board Exams 2023 Time Table from below Link :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीचे २ मार्चपासून सुरू होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर १९ सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले होते.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

SSC HSC Board Exams 2023 Time Table

या वेळापत्रकांबाबत सूचना असल्यास मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार संघटना, पालक, शिक्षक यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक अंतिम करण्यात आलेले आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.

त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य कोणत्याही संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल, अशी सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षा कालावधी :

परीक्षा : कालावधी

  • बारावी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) सर्वसाधारण व दिलक्षी विषय आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३
  • दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा) : २ मार्च  ते २५ मार्च २०२३

How to download the Maharashtra board class 10th and 12th date sheet?

Step 1: Visit the official website of Maharashtra at mahahsscboard.in.

Step 2: Click on the link available to download Date Sheet of SSC/ class 10th OR click on the link available to download Date Sheet of HSC/ class 12th

Step 3: Download the PDF/ word file that opens up.

  1. TIMETABLE SSC-MARCH-2023 
  2. TIMETABLE HSC-FEB-2023 VOCATIONAL
  3. TIMETABLE HSC-FEB-2023 GENERAL AND BIFOCAL
  4. TIMETABLE NOTIFICATION FOR HSC AND SSC FEB/MAR 2023

Maharashtra 10th Board Exam Time Table 2023

Exam Date 1st shift (11 am – 2 pm) 2nd shift (3 pm – 6 pm)
Thursday, March 2, 2023 First Language: Marathi, Hindi, Urdu, Gujarati, Kannada, Tamil, Telugu, Malayalam (for regular and repeater candidates), Sindhi, Bengali, Punjabi Second or Third Language: German, French
Friday, March 3, 2023 Second or Third Language: Marathi, Kannada, Tamil, Telugu, Malayalam (for regular and repeater candidates), Sindhi, Bengali, Punjabi
1st shift (11 am – 1 pm)

Second or Third Language: (Composite course)

Marathi (Composite)

Saturday,

March 4, 2023

Multi Skill Assistant Technician/ Introduction to Basic Technology, Automotive Service Technician, Store Operation Assistant, Assistant Beauty Therapist, Tourism and Hospitality – Food & Beverage Service Trainee, Agriculture – Solanaceous Crop Cultivator, Electronics & Hardware Field Technician – Other Home Appliances, Home Care – Home Health Aide, Mechanical Technology, Electrical Technology, Electronics Technology, Power-Consumer Energy Meter Technician, Physical Education (Sport) – Early year physical activity facilitator, Apparels Sewing Machine Operator, Plumber General
Monday,

March 6, 2023

First language (English),

Third Language (English)

Wednesday,

March 8, 2023

Second or Third language: Hindi
1st shift (11 am – 1 pm)

Second or Third Language (Composite Course): Hindi

Friday,

March 10, 2023

Second or Third language: Urdu, Gujarati, Sanskrit, Pali, Ardhamagadhi, Persian, Arabic, Avesta, Pahalavi, Russian
Monday,

March 13, 2023

1st shift (11 am – 1 pm)
Mathematics Part-1 (Algebra),Arithmetic (Only for eligible Divyang Candidates)
Wednesday,

March 15, 2023

1st shift (11 am – 1 pm)

Mathematics Part-II (Geometry)

Friday,

March 17, 2023

st shift (11 am – 1 pm)

Science and Technology (Part I)

1st shift (11 am – 1.30 pm)

Physiology, Hygiene & Home Science (Only for eligible Divyang Candidates)

Monday, March 20, 2023 1st shift (11 am – 1 pm)

Science and Technology Part-II

Thursday,

March 23, 2023

1st shift (11 am – 1 pm)

Social Sciences Paper-I: History and Political Science

Saturday,

March 25, 2023

1st shift (11 am – 1 pm)

Social Sciences Paper-II: Geography

Maharashtra Board HSC Time Table 2023 for Science

Date of Exam Morning Session (11 AM to 2 PM)
27th of February,2023 Physics
1st of March,2023 Chemistry
3rd of March,2023 Mathematics & Statistics
7th of March,2023 Biology
13th of March,2023 Computer Science

SSC HSC Board Exams 2022 Update 

SSC HSC Board Exams 2022: The latest update for SSC HSC Board Exam Rules. As per the latest news, The rules for this year’s 10th and 12th exams have been changed. Students will not get their exam center in their school from this year, also the extra time of 30 minutes which was given during Corona period has also been cancelled. Further details are as follows:-

HSC, SSC Board Exam Rule Changed

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या दहावी, बारावी परीक्षांचे नियम बदलण्यात आले आहेत. यंदाच्या एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या परीक्षा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होत आहेत. याचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर झाले आहे. असे असताना बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. 

विद्यार्थ्यांना यंदापासून त्यांच्या शाळेतच त्यांचे परीक्षा केंद्र मिळणार नाही, तसेच कोरोना काळात जो ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जात होता, तो देखील रद्द करण्यात आला आहे. कोरोनापूर्व नियमावली लागू करण्यात येणार असून पूर्वीप्रमाणेच नियम असणार आहेत.

  • “कोरोना महामारीवेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या होम सेंटर्सची म्हणजेच ते शिकत असलेल्या शाळेतच परीक्षेची सुविधा आणि 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ सुरू करण्यात आला.
  • आता कोरोनाचा फार मोठा धोका नसल्यामुळे, आम्ही जुने नियम परत आणत आहोत” असे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.
  • ऑनलाइन वर्गादरम्यान विद्यार्थ्यांना अडचणी आल्याने त्यांना भरपाईसाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला होता.
  • तसेच कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी होम सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली होती.
  • आगामी बोर्ड परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना नेमलेल्या केंद्रावर परीक्षेसाठी जावे लागणार आहे.

SSC HSC Exam Tentative Timetable

संभाव्य वेळापत्रक…

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
  • त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा २ मार्चला सुरू होणार आहेत.

तपशील : लेखी परीक्षेचा कालावधी

  • बारावी (सर्वसाधारण व द्विलक्षी) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३
  • दहावी : २ मार्च ते २५ मार्च

Previous Update

दहावी, बारावी परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट – SSC HSC Board Exams 2022

SSC HSC Board Exams 2022: Ssc Hsc Exam Preparation From Maharashtra Board. करोना प्रादुर्भावामुळे २०२१ ची दहावी, बारावी परीक्षा झाली नाही. अंतर्गत मूल्यमापन गुणदान करण्यात आले. २०२२मध्ये करोनाचा प्रादुर्भाव कायम होता. परीक्षा घेण्यात आली, परंतु शाळा तेथे केंद्र, २५ टक्के अभ्यासक्रम कमी, अधिकचा वेळ असे बदल मंडळाने केले होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २०२३ची परीक्षा २०२०मध्ये झाली त्याप्रमाणे घेण्यासाठी मंडळाने तयारी केली आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षेच्या अनुषंगाने तयारी सुरू केली.
  • करोनानंतर नियमित परीक्षा होत असल्याने, परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्थेची मंडळाकडून चाचपणी करण्यात आली.
  • आठ डिसेंबरपासून पुन्हा जिल्हानिहाय बैठकांचे नियोजन करण्यात आले. विभागात दहावी, बारावी परीक्षेसाठी नोंदणी संख्या वाढली आहे.

शाळा तेथे परीक्षा केंद्र नसणार आहेत. त्यामुळे परीक्षेची व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी मंडळाची धांदल वाढली. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, परीक्षार्थींची संख्या, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, सोयीसुविधांबाबतचा आढावा विभागीय पातळीवर निश्चित करण्यात आला. परीक्षा केंद्रांची पाहणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. यंदा दहावी, बारावीचे सुमारे वीस नवीन परीक्षा केंद्र वाढू शकतात, असे सांगण्यात येत आहे. दहावीसाठी विभागात पाच जिल्ह्यांत साडेसहाशेपेक्षा अधिक, तर बारावीचे पावणेचारशेपर्यंत परीक्षा केंद्र संख्या असतील असे सांगण्यात येते. जिल्हानिहाय बैठकांमधून परीक्षा केंद्रांचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.

विद्यार्थी संख्येत वाढ

  • दहावी, बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
  • बारावी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत संपली, तर दहावीची सुरू आहे.
  • दहावीला नोंद केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ७९ हजारांपर्यंत आहे.
  • बारावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६७ हजारपर्यंत आहे.
  • गतवर्षीच्या तुलनेत परीक्षार्थी विद्यार्थी संख्या वाढेल असे मंडळातील सूत्रांनी सांगितले.

हमीपत्र घेणार…

दहावी, बारावीच्या अनेक परीक्षा केंद्रावर सोयीसुविधांचा अभाव असल्याचे २०२२ परीक्षेत समोर आले होते. शाळा तेथे केंद्र परीक्षा असताना अनेक केंद्रावर विद्यार्थी क्षमतेप्रमाणे सोयीसुविधा नसल्याचे भरारी पथकांच्या पाहणीत आढळले. फेब्रुवारी-मार्च २०२३मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेसाठी सर्व परीक्षा केंद्रांकडून हमीपत्र घेतले जाणार आहे. ज्यात वर्ग खोल्या, बाकडे, जनरेटरची सुविधा, पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे आदी सुविधा पुरवण्याबाबतचा समावेश असेल.

परीक्षेच्या नियोजनाबाबतची तयारी सुरू आहे. केंद्रनिश्चितीसाठी केंद्रांच्या भेटीची प्रक्रिया झाली असून विविध बैठकांचे आयोजन दोन दिवसांत सुरू होत आहे. परीक्षा केंद्रांना पायाभूत सुविधांबाबतही सूचना देण्यात येत आहेत.
-विजय जोशी, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 


Previous Update –

दहावी, बारावी परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट

SSC HSC Board Exams 2022: HSC Exam Extension of deadline for 12th exam application till tomorrow (30th November 2022). Further details are as follows:-

फेब्रुवारी -मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्‍या परीक्षेसाठी अर्ज (आवेदनपत्रे) भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. याअंतर्गत नियमित शुल्‍कासह परीक्षा अर्ज भरण्याची मुदत बुधवार (ता.३०) पर्यंत वाढविली आहे. विलंब शुल्‍कासह शुक्रवार (ता.२) पर्यंत अर्ज भरता येईल.

  • या संदर्भात महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सूचना जारी केली आहे.
  • त्‍यानुसार उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्‍त्र, कला व वाणिज्‍य शाखांची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डेटाबेसवरुन ऑनलाइन पद्धतीने भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
  • नियमित विद्यार्थ्यांसह सर्व शाखांचे पुर्नपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट विद्यार्थ्यांना नियमित शुल्‍काने आवेदनपत्रे भरण्यास मुदतवाढ दिली जात आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार बुधवार (ता.३०) पर्यंत नियमित शुल्‍कासह परीक्षा अर्ज भरता येतील. पुढील दोन दिवस शुक्रवार (ता.२) पर्यंत विलंब शुल्‍कासह अर्ज भरण्याची मुदत असेल. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन काढून शुल्‍क बँकेत भरण्यासाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदत असेल. तर चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या, प्रिलिस्‍ट जमा करण्याची मुदत ७ डिसेंबरपर्यंत असेल.

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. Chetan pawar says

    Boradachi prashna patrika pathav

  2. Nikhil Rathod says

    दहावीच्या पेपरची लिंक पाठवा

  3. Sanket says

    दहावीच्या पेपरचा टाइम टेबल पाठवा

  4. Sanket says

    दहावीच्या पेपरचा टाइम टेबल पाठवा

  5. Nitin kamble says

    ह्या वर्षी बोर्ड आहे की नाही

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड