Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सावधान! SSC भरतीसंदर्भात बनावट नोटीस व्हायरल

SSC Exam Important Instructions

SSC Exam Important Instructions  : SSC Jobs: ssc recruitment fake notice regarding tier 0 goes viral –  कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) च्या भरती संदर्भात (SSC Bharti) सोशल मीडिया वर एक नोटिस व्हायरल होत आहे. ही नोटिस बनावट स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (PIB) यांनी लोकांना या फेक नोटीससंदर्भात सावध केलं आहे.

पीआयबी, भारत सरकारने आपल्या फॅक्ट चेक ट्विटर हँडल वर यासंबंधीची सूचना दिली आहे. व्हायरल होणाऱ्या या नोटिशीचा फोटो ट्विट करून ही नोटीस बनावट असल्याचे सांगितले आहे. ही बनावट नोटिस (SSC Fake Notice) आणि पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) पुढे देण्यात येत आहे.

इस नोटिशीत एसएससी च्या नव्या टियर संबंधी माहिती देण्यात आली आहे. याचे नाव टियर-0 (SSC Tier-0) असल्याचे म्हटले आहे. नोटिशीत लिहिलंय की- ‘एसएससी च्या सर्व्हरवर लोड आल्याकारणाने आयोगाने एक नव्या टियरला सुरुवात केली आहे, ज्याचं नाव टियर-० आहे. हा क्वालिफाईंग नेचर चा आहे. हा टियर क्वालिफाय केल्यानंतरच उमदेवार एसएससीच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकणार आहेत. यासंबंधीची माहिती लवकरच जारी करण्यात येईल.’

पीआयबीने हे स्पष्ट केलं आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशनने अशी कुठलीही नोटीस, परिपत्रक जारी केलेलं नाही. हे बनावट आहे, यावर बिल्कुल विश्वास ठेवू नये.

सोर्स : म. टा.


SSC Exam Important Instructions  : स्टाफ सिलेक्शन कमिशनने परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत…

SSC Exam Important Instructions  – SSC exam 2020 : स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC) ने मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा संगणकआधारित असणार आहेत.

SSC कनिष्ठ अभियंता परीक्षा, 2018 पेपर II निकाल व कट ऑफ गुण जाहीर

१७ सप्टेंबरला जारी झालेल्या परिपत्रकान्वये दिल्ली पोलीस, उपनिरीक्षक, ज्युनियर हिंदी अनुवादक, ज्युनिअर अनुवादक, सिनिअर हिंदी अनुवाद आदी पोस्टसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये परीक्षा होणार आहेत.

SSC Exam Important Instructions

या परीक्षांसदर्भात कर्मचारी भरती आयोगाने उमेदवारांना पुढील सूचना दिल्या आहेत – 

१) उमेदवारांनी प्रवेशपत्रात दिलेल्या रिपोर्टिंग वेळेनुसार परीक्षा केंद्रावर पोहोचावे.
२) नियोजित वेळेनंतर उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या आत येण्यास मज्जाव केला जाईल.
३) प्रवेश पत्र, पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (दोन प्रती ३ से.मी. X ३.५ से.मी.)
३) फोटो आयडी कार्ड
४) जन्मतारखेचा दाखला (विशेषत: अन्य राज्यातील विद्यार्थ्यांसाठी)
५) फेस मास्क
६) हँड सॅनियाटझर
७) पारदर्शक पाण्याची बाटली

तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप येथून डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Rutuja patil says

    What about SSC junior Engineer exam?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड