महत्वाचा अपडेट- दहावी-बारावीचा निकाल १५ मेपर्यंत लागणार! | Maharashtra SSC Result 2025

Maharashtra SSC Result 2025

SSC Result 2025

Maharashtra SSC Result 2025 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी- बारावीची परीक्षा यंदा दरवर्षीच्या तुलनेत १० ते १५ दिवस अगोदर सुरू होत आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्यात कॉपीमुक्त परीक्षा घेण्यावर शिक्षण विभागाने लक्ष केंद्रित केले असून त्या अनुषंगाने विविध पावले उचलली जात आहेत. आता दहावी- बारावीच्या परीक्षांचा निकालही १५ मेपर्यंत लागणार असल्याचे सूतोवाच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले. शिक्षण विभागाच्या अखत्यारितील विषयांचा आढावा घेण्यासाठी भुसे शुक्रवारी पुणे दौऱ्यावर आले होते. सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक करण्यात येईल, असेही भुसे यांनी या वेळी सांगितले. तसेच, या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

खालील संकेतस्थळावर जाहीर होणार निकाल : 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

“सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये ‘मराठी’ विषय बंधनकारक करण्यात येईल. राज्यातील शाळांच्या गुणवत्तापूर्ण विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात येत आहे,” असे भुसे म्हणाले,


 

Maharashtra SSC Result 2024: After the announcement of the 10th result, the process of verification of marks, revaluation of answer sheets and application for photocopies has been started through the state board. For this, students will be able to apply online to the departmental board from today, Tuesday (28th).
Many students have doubts about their result after the declaration of result. Many students feel that their marks are low. Such students are given an opportunity to view, re-evaluate or verify their answer sheet through the board. This online facility has been immediately made available to students through the state board after the announcement of class 10 results on Monday.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळामार्फत गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांचे फेरमूल्यांकन व छायाप्रतींसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आज, मंगळवारपासून (दि. २८) विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 

Maha SSC Revaluation Process 2024

निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना आपल्या निकालाबाबत शंका असते. आपल्याला मिळालेले गुण कमी आहेत, असे अनेक विद्यार्थ्यांना वाटते. अशा विद्यार्थ्यांना मंडळामार्फत त्यांची उत्तरपत्रिका पाहण्याची, त्याची फेरमूल्यांकन करण्याची किंवा गुणपडताळणी करण्याची संधी दिली जाते. सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळामार्फत तातडीने विद्यार्थ्यांना ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

२८ मे ते विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या ११ जूनदरम्यान गुणपडताळणी, छायाप्रती व फेरमूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे गुण पडताळणीसाठी प्रत्येक विषयाला ५० रुपये शुल्क आहे, तर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ४०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत फेरमूल्यांकनासाठी अर्ज करावा लागणार आहे. फेरमूल्यांकनासाठी मंडळामार्फत प्रत्येक विषयास तिनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे सर्व ऑनलाइन अर्ज करण्याबाबची सर्व माहिती मंडळामार्फत https:// verification.mh-ssc.ac.in या वेबसासटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुरवणी परीक्षेसाठी ३१ पासून अर्ज प्रक्रिया
दहावीच्या परीक्षेत जे विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा द्यायची आहे, त्यांच्यासाठी जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ३१ मेपासून सुरू होणार आहे. त्यासाठीची सूचना मंडळामार्फत स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.


Maharashtra 10th Result 2024 Out

Maharashtra SSC Result 2024:  Maharashtra Board of Secondary and Higher Secondary Education SSC Result 2024 Release on 27 May at 1:00 p.m. Class 10th result is available on the official website maharesults.nic.in. SSC Board of Maharashtra students will also be able to search here by roll number, mother name and name wise.

Maharashtra SSC Result 2024: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावी आणि बारावीचा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान महाराष्ट्र राज्य बोर्डाने बारावी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. 21 मे 2024 ला बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान आता बारावीचा निकाल जाहीर झाला असल्याने दहावी बोर्डाचा निकाल कधी लागणार अशी विचारणा विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून निकाल पाहता येईल तसेच विषयनिहाय मिळालेल्या गुणांची प्रत (प्रिंट) घेता येणार आहे. यावर्षी दहावीच्या तोंडी परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यात आले. त्यामुळे बारावीपाठोपाठ दहावीचा निकालदेखील यंदा लवकर जाहीर होत आहे. तसेच, या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल mahresult.nic या वेबसाईटवर उपलब्ध होईल. याशिवाय आणखी काही वेबसाईटवर निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येऊ शकतो. तुम्ही या वेबसाईटना भेट देऊ शकता. काही अडचण आल्यास डिजीलॉकरचा भविष्यात फायदा होऊ शकतो.

SSC Nikal 2024 Out

Maharashtra SSC Board Result 2024 LIVE Updates: संपूर्ण मार्कशीट पाहण्यासाठी या संकेतस्थळांना भेट द्या 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतीच इयत्ता दहावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली आहे. यंदा दहावीचा एकूण निकाल 95.81 टक्के लागला आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 99.1 टक्के असा लागला आहे, तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे.

 

राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांकडून दहावीची लेखी परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ या कालावधीत घेण्यात आली. ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ सूत्रानुसार निकाल जाहीर केला जाणार आहे. दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमध्ये गुणपत्रकांचे वाटप केले जाईल तसेच ऑनलाइन निकालानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने  मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी २८ मे ते ११ जूनपर्यंत अर्ज करता येईल. दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. याकरिता पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार, ३१ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली.

विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल मे च्या तिसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल मे च्या चौथ्या आठवड्यात जाहीर करू असे म्हटले होते. यानुसार 27 मे ला दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. यंदा 10 वीच्या परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. एकूण 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
दरम्यान आता या लाखो विद्यार्थ्यांच्या निकाल येत्या तीन दिवसांनी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आज आपण निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आपला निकाल कुठे पाहू शकतात याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

निकाल कुठं पाहणार?

जेव्हा दहावीचा निकाल जाहीर होईल तेव्हा mahahsscboard.in,

mahresult.nic.in,

sscresult.mkcl.org या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. यासाठी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे.

वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे दहावीच्या निकालाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. लिंक वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला आसन क्रमांक आणि आईचे नाव टाकायचे आहे.
यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे आणि विद्यार्थ्यांना आपला रिझल्ट पाहता येणार आहे. ज्यांना ऑफलाइन निकाल बघायचा असेल ते एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाहू शकतात.
यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जायचे आहे. यात MH10 लिहून पुढे तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. मग हा मॅसेज तुम्हाला 57766 वर पाठवायचा आहे. हा एसएमएस पाठवल्यानंतर तुमचा निकाल तुम्हाला SMS केला जाईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Mallamma says
Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड