दहावीचा निकाल जाहीर लगेच येथे क्लिक चेक करा.. -Maharashtra SSC Result 2023

Maharashtra SSC Result 2023

Maharashtra SSC Result Date 2023

SSC HSC Result Date 2023 : The Maharashtra Board will dealer today on 2nd June 2023 @ 13.00. The Maharashtra SSC result will be available on the board’s official website mahahsscboard.in and mahresult.nic.in. For More updates keep visiting MahaBharti.in

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. खालील सेक्शन मधून आपण आपला निकाल बघू शकता. यंदाच्या वर्षी निकाल ९३.८३ लागला आहे. बारावीप्रमाणे दहावीमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत १५ लाख २९हजार ९६ विद्यार्थ्यांपैकी ९३.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागातील ९८.११टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नागपूर विभागाचा ९२.०५टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९५.६४ टक्के इतकी आहे.  

 

या निकाला संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. काही तासतच दहावीचा निकाल लागणार आहे. दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. निकालाची पत्रकार परिषद सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलीय आज दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार. महाराष्ट्र एसएससीचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल. विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव यासारखे आवश्यक तपशील प्रदान करून महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 मध्ये प्रवेश करू शकतात. निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेचा आसन क्रमांक आणि प्रवेश पत्र किंवा अर्जावर आईचे पहिले नाव वापरावे लागेल. महाराष्ट्र एसएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याने प्रत्येक विषयात किमान 35 टक्के गुण मिळवले पाहिजेत. मात्र, 20 टक्के गुण मिळवणाऱ्यांनाही उत्तीर्ण मानले जाईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. त्यामध्ये राज्याचा निकाल ९३.८३ टक्के एवढा लागल आहे.  गतवर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांनी निकालात घट झाली आहे अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.  राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीसाठी ६७ विषयात आणि आठ माध्यमात परीक्षा घेण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होत आहे. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे. राज्यातील महाराष्ट्र इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यावर्षी सुमारे 14 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. एसएससी निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेचा आसन क्रमांक आणि प्रवेशपत्र किंवा अर्जावर दिलेले आईचे नाव वापरणे आवश्यक आहे. खालील परिणाम, थेट लिंक, उत्तीर्णतेची टक्केवारी आणि इतर तपशीलांवरील नवीनतम अद्यतनांसाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत रहा.

 

महाराष्ट्र एसएससी निकाल 2023: कसे तपासायचे? Maharashtra SSC Board Namewise, School Wise, SMS Result 2023  • सर्व प्रथम मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – mahresult.nic.in.
  • मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र SSC निकाल 2023 साठी लिंकवर क्लिक करा.
  • उघडणाऱ्या नवीन पेजमध्ये तुमची ओळखपत्रे जसे की सीट नंबर आणि आईचे नाव भरा.
  • महाराष्ट्र 10वी चा निकाल 2023 आता तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  • तुमचा निकाल तपासा आणि संदर्भासाठी डिजिटल स्कोअरकार्ड डाउनलोड करा.

परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीनुसार शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळांकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासंदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळांकडे विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा. परीक्षेत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लगतच्या दोनच संधी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहणार आहेत. पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी ७ जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येतील. त्याबाबत स्वतंत्रपणे परिपत्रक काढण्यात येईल, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.

 


Maharashtra SSC HSC Result Date 2023

SSC HSC Result Date 2023 – When the 10th-12th exams are over, children and parents are curious about the result. But it is not known when the result will come till the last moment. So everyone’s eyes are on the news. Now information is coming that the results of both the exams will be released in the month of June. The SSC, HSC Result 2023 Date will be published by Maharashtra board soon. Due to the strike called for the old pension scheme, it was predicted that the results of the 10th and 12th examinations would be delayed. It consisted of teachers and non-teaching organizations who examined the answer sheets of the 10th and 12th board examinations. There was uncertainty about when the result would be given. But now the work of checking the answer sheets is going on at a fast pace, so the result will be available in time.

आपल्याला माहीतच आहे, दहावी-बारावीच्या परीक्षा आटोपल्यावर मुलांना आणि पालकांना उत्सुकता असते ती निकालाची. पण शेवटच्या क्षणापर्यंत निकाल कधी लागणार, हे माहिती नसतं. त्यामुळे सर्वांची नजर बातम्यांवर आणि शोषण मीडियावरील अपडेट्स वर असते. आता जून महिन्यात दोन्ही परीक्षांचे निकाल लागतील अशी माहिती पुढे येत आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे दहावी-बारावीचा परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तवली होती. यात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांचा समावेश होता. अश्यात निकाल कधी लागेल, याबाबत अनिश्चितता होती. मात्र आता उत्तरपत्रिका पत्रिका तपासण्याचे काम जलद गतीने सुरू असल्याने निकाल वेळेत लागणार आहे. या संर्दभातील पुढील अपडेट आणि माहिती आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच. 

 

१४ लाख ५७ हजार २९४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली तर १५ लाख, ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली आहे.त्यामुळे लवकरात लवकर दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका जलद गतीने तपासणी होणार असे ही बोर्डाने सांगितले आहे. यंदा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता त्यामुळे निकालास उशीर होईल असे सांगण्यात आले होते. पण तसे काहीही न होता. बारावी आणि दहावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल वेळेवरच लागणार आहेत.

 

दहावीच्या बोर्ड परीक्षेची पेपर तपासणीची डेडलाईन १५ एप्रिल असणार आहे. तर त्याआधी बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. बारावी बोर्डाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावीचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांचे निकाल जून महिन्यातच लागणार आहे, एवढे मात्र जवळपास निश्चित आहे.

 

हे होते नियम : यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये अनेक नियम बदलले होते. या परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी कठोर नियम जाहीर केले होते. मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर विकत घेतला तर परीक्षा रद्द केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर पुढील पाच परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचं निलंबन केलं जाईल, असेही बोर्डाकडून सांगण्यात आले होते.

 


SSC Board Result – SSC HSC Result Date 2023 : The SSC Exam was held in March. But the result is not declared. Maharashtra SSC result 2022 date update. Result is now declare today at 1 PM . Further details are as follows:-

विद्यार्थी आणि पालकांना www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या लिंकवर निकाल पाहता येईल. तसेच निकालाची प्रतही घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

How to check Maharashtra SSC results via SMS: इंटरनेट शिवाय SMS द्वारे निकाल कसा चेक करायचा ?

If mahahscsscboard.in website is Not opening for various users. Then Following is the alternate way to check your online result of Maharashtra board SSC Examinations.

Step 1: Go to your message window on the phone

Step 2: Type MH (exam name) (Seat No)

Step 3: Send the message to 57766

Step 4: Result will display on screen

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) is expected to announce the Maharashtra SSC Board Result 2022 this week.  The result will be published on the official website of the board. After the declaration of the result, it will be available on the official websites mahresult.nic.in and mahahsscboard.in.

आणि हो मित्रांनो, निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.

 

 

 

 

 

 

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Mallamma says
Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड