SRPF भर्ती परीक्षा रद्द, नवीन परीक्षेची तारीख जाहीर! – SRPF Admit Card Download

SRPF Admit Card Download 2026

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट ५, दौंड यांच्या वतीने घेण्यात आलेली सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा अखेर अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे.

नक्की काय घडलं होतं?
२ मे रोजी ही १०० गुणांची लेखी परीक्षा पार पडली होती. परीक्षा झाली खरी, पण त्यानंतर एक अजब प्रकार समोर आला. ‘महाराष्ट्र पब्लिकेशन’ या एका खासगी प्रकाशनाच्या ‘प्रॅक्टिस सेट १०’ मधील तब्बल ८५ प्रश्न या मुख्य परीक्षेत जसेच्या तसे विचारण्यात आले होते. फक्त प्रश्नच नाही, तर त्यांचा क्रम (सीक्वन्स) आणि दिलेले पर्यायसुद्धा अगदी हुबेहूब तेच होते. प्रश्नपत्रिका काढणाऱ्या परीक्षकांनी बहुदा जास्त कष्ट न घेता, सराव संचातील प्रश्न जशाच्या तसे कॉपी-पेस्ट केले होते.

चौकशी आणि निर्णय
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आणि परीक्षा वर्तुळात एकच खळबळबळ उडाली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पुणे SRPF च्या पोलीस उपमहानिरीक्षकांनी ४ मे रोजीच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. प्राथमिक तपास अहवाल समोर आल्यानंतर, अप्पर पोलीस महासंचालकांनी ही वादग्रस्त परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याचा धाडसी आणि योग्य निर्णय घेतला. दोषींवर होणार कारवाई: या संपूर्ण घोळासाठी जे कोणी जबाबदार असतील, त्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अधिकृत निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

आता पुनरपरीक्षा कधी?
ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी मेहनत घेतली होती, त्यांना आता पुन्हा एकदा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • नवी तारीख: २४ मे
  • परीक्षा केंद्र: दत्तकला शिक्षण संस्था, स्वामी चिंचोली, दौंड केंद्र.

परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असले, तरी पारदर्शकता राखण्यासाठी हा निर्णय गरजेचा होता. आता २४ मे रोजी होणाऱ्या पुनरपरीक्षेकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.


 

SRPF Admit Card Download 2025 – While appearing for this written test, candidates are required to download the physical test and written test ID card provided by MahaIT through e-mail and bring its color print and two color passport size photographs of the application form along with the ID card provided by this office for field test. Candidates should not bring mobile phones, digital watches, electronic items or other similar items and preferably any kind of bags to the examination center. If candidates bring bags they should be kept outside the examination center at their own risk. Candidates should note that this office will not be responsible if these bags and their valuables and other items are lost or stolen.

सशस्त्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षेचे Admit Card प्रकाशित झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा विविध ठिकाणी महाराष्ट्रात घेण्यात येणार आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. .

 

Table of Contents

1 thought on “SRPF भर्ती परीक्षा रद्द, नवीन परीक्षेची तारीख जाहीर! – SRPF Admit Card Download”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड