उद्या होणार सशस्त्र पोलीस शिपाई भरती परीक्षा; डाउनलोड करा प्रवेशपत्र व देऊन बघा मॉक टेस्ट – SRPF Admit Card Download @ policerecruitment2022.mahait.org
SRPF Police Bharti Admit Card Download
SRPF Admit Card Download @ policerecruitment2022.mahait.org
SRPF Admit Card Download 2023 – While appearing for this written test, candidates are required to download the physical test and written test ID card provided by MahaIT through e-mail and bring its color print and two color passport size photographs of the application form along with the ID card provided by this office for field test. Candidates should not bring mobile phones, digital watches, electronic items or other similar items and preferably any kind of bags to the examination centre. If candidates bring bags they should be kept outside the examination center at their own risk. Candidates should note that this office will not be responsible if these bags and their valuables and other items are lost or stolen.
सशस्त्र पोलीस शिपाई भरती शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई या ठिकाणी घेण्यात येणार आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. .
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सशस्त्र पोलीस शिपाई भरती – २०२१ शारीरिक चाचणीमधील २५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक २३/०७/२०२३ रोजी सकाळी ११.०० वा. छाती क्रमांक ८७ ते छाती क्रमांक १२३२८ पर्यंत १५३६ उमेदवार यांची बैठक व्यवस्था रॉयल गोल्ड स्टुडियो, रॉयल पाम, गोरेगाव (पुर्व) मुंबई 400065 (Royal Gold Studio, Royal Palm, Goregaon (East) Mumbai 400065 ) या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परिक्षा केंद्रावर येण्याकरीता गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून बस क्र. ४५२ स्टॉपचे नाव मयुर नगर बस स्टॉप आहे.
तसेच छाती क्रमांक १२३२९ ते छाती क्रमांक १८१३७ पर्यंत १०२६ उमेदवार यांची बैठक व्यवस्था MUMBAI EXHIBITION CENTER, NESCO, HALL NO. 04 GOREGAON EAST MUMBAI. परिक्षा केंद्रावर येण्याकरीता जवळील रेल्वे स्टेशन राम मंदीर पुर्व.
सदर लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांनी दिनांक २३/०७/२०२३ रोजी सकाळी ०८.०० वाजेपर्यंत उपरोक्त नमुद ०२ परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा सकाळी ११.०० वा. सुरू होईल. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.
परीक्षा केंद्रावर येण्याकरीता गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून बस क्रमांक ४५२ असून स्टॉपचे नाव मयूर नगर बस स्टॉप आहे. या लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांनी २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत या परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होईल. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.
या लेखी परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी महाआयटीने ई-मेलद्वारे पुरविलेले शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेचे ओळखपत्र डाऊनलोड करुन त्याची कलर प्रिंट आणि आवेदन अर्जावरील दोन कलर पासपोर्ट साईज छायाचित्र, तसेच या कार्यालयाकडून मैदानी चाचणी करीता पुरविण्यात आलेले ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी मोबाईल फोन, डिजीटल घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर तत्सम वस्तू तसेच शक्यतो कोणत्याही प्रकारच्या बॅगा आणू नयेत. जर उमेदवारांनी बॅगा आणल्यास त्या परीक्षा केंद्राच्या बाहेर स्वत:च्या जबाबदारीवर ठेवण्यात याव्यात. या बॅगा व त्यातील मौल्यवान व इतर वस्तू गहाळ किंवा चोरीस गेल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, काळा पेन तसेच पॅड बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. ही लेखी परीक्षा नि:पक्षपातीपणे व पारदर्शकपणे घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये. तसेच ही बाब निदर्शनास आल्यास तत्काळ भरती प्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 चे समादेशक प्रणय अशोक यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
Download SRPF written examination Hallticket from your profile.