Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

२७१ पदांची नव्याने निर्मिती, खेळाडूंची आता क्रीडा विभागात थेट नियुक्ती! – Sports Mans Job Vacancies

Sports Mans Job Vacancies, Sports Field Jobs and Vacancies in Maharashtra

Sports Mans Job Vacancies, Sports Field Jobs and Vacancies in Maharashtra- जागतिक स्तरावर पदक मिळविलेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीच्या नियमावलीत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नव्या निर्णयामुळे महसूल व अन्य खात्याऐवजी खेळाडूंची क्रीडा विभागात प्राधान्याने नियुक्ती होणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा अधिकारी, क्रीडा विकास अधिकारी, सहायक क्रीडा अधिकारी या पदावर काम करता येईल. त्यासाठी एकूण ५५१ पैकी नव्याने २७१ पदांची निमिर्ती करण्यात आली आहे. यामध्ये ऑलिंपिक स्पर्धा, पॅरालिंपिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना याचा फायदा होणार आहे. खेळाडूंनी त्यांनी मिळविलेल्या कामगिरीनंतर क्रीडा विभागात नोकरीसाठी अर्ज करणे अपेक्षित असल्याचे शासनाने आज काढलेल्या आध्यादेशात नमूद केले आहे. राज्य शासनाने यापूर्वी खेळाडूंना दिलेल्या थेट नियुक्तीनंतर उ‌द्भवलेल्या विविध समस्यांचे अवलोकन केले. राज्यातील खेळाडूंसह नागरिकांची मत जाणून घेतली, हरकतींसह सूचना मागविल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ सोमवारी बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब करीत आज अध्यादेश काढला. या पदांवर होणार नियुक्ती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Sports Field Jobs and Vacancies in Maharashtra

 

१) मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी (प्रशिक्षण) (गट-अ) पदासाठी ऑलिंपिक, पॅराऑलिंपिक क्रीडा स्पर्धा सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक प्राप्त खेळाडू. आशियाई क्रीडा स्पर्धा, पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक क्रीडा स्पर्धा (वरिष्ठ गट), वल्र्ड पॅरालिंपिक गेम्स स्पर्धा (वरिष्ठ गट), कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा (खुला गट), कॉमनवेल्थ पॅरा गेम्स (खुला गट) सुवर्णपदक प्राप्त खेळाडू. 

२) क्रीडा कार्यकारी अधिकारी (प्रशिक्षण) (गट-व, राजपत्रित) – मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी (प्रशिक्षण) पदासाठीच्या क्रीडा अर्हतेनुसार पात्र खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धा, पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक क्रीडा स्पर्धा (वरिष्ठ गट), वल्र्ड पॅरालिंपिक गेम्स स्पर्धा (वरिष्ठ गट), कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा (खुला गट), कॉमनवेल्थ पॅरा गेम्स (खुला गट), अर्जुन पुरस्कार्थी खेळाडू सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक प्राप्त खेळाडू. 

३) क्रीडा विकास अधिकारी प्रशिक्षण) (गट-ब, अराजपत्रित) – मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी (प्रशिक्षण) पदासाठीच्या क्रीडा अर्हतेनुसार पात्र खेळाडू. आशियाई अजिंक्यपद स्पर्धा (वरिष्ठ गट)  आशियाई पैरा अजिंक्यपद स्पर्धा (वरिष्ठ गट), ज्युनिअर वर्ल्ड अजिंक्यपद स्पर्धा, ज्युनिअर वर्ल्ड अजिंक्यपद स्पर्धा, कॉमनवेल्थ अजिंक्यपद स्पर्धा (वरिष्ठ गट), पॅरा कॉमनवेल्थ अजिंक्यपद स्पर्धा (वरिष्ठ गट) सुवर्णपदक प्राप्त केलेले खेळाडू.

४) सहायक क्रीडा विकास अधिकारी (प्रशिक्षण) गट क क्रीडा कार्यकारी अधिकारी (प्रशिक्षण) पदासाठीच्या क्रीडा अत्तिनुसार पात्र खेळाडू. – आशियाई अजिंक्यपद स्पर्धा (वरिष्ठ गट), आशियाई पॅरा अजिंक्यपद स्पर्धा (वरिष्ठ गट), ज्युनिअर वर्ल्ड अजिंक्यपद स्पर्धा, ज्युनिअर वर्ल्ड अजिंक्यपद स्पर्धा, कॉमनवेल्थ अजिंक्यपद स्पर्धा (वरिष्ठ गट), पॅरा कॉमनवेल्थ अजिंक्यपद स्पर्धा (वरिष्ठ गट) रौप्य किंवा कास्य पदक प्राप्त केलेले खेळाडू.  गुणवत्ताधारक खेळाडूंना प्रामुख्याने क्रीडा विभागात थेट नियुक्ती दिल्यास क्रीडा विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर उदयोन्मुख खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या क्षमतांचा वापर करून सक्षम खेळाडू निर्माण करणे या दोन्ही गोष्टींसाठी खेळाडूंचा राज्याला फायदा होणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड