जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय, तांत्रिक, आणि इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरा!

South Goa District Hospital Bharti 2024

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय, तांत्रिक, आणि इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांची भरतीची मागणी

दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी सोमवारी फातोर्डा येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी राज्य सरकारकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सावियो डिसिल्वा आणि दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे प्रमुख सावियो कुतिन्हो उपस्थित होते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Goa Hospital Jobs

 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अलीकडेच दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असल्याचे वृत्त समोर आले होते. याची दखल घेत खासदार फर्नांडिस यांनी रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांच्यासोबत रुग्णालयाच्या समस्यांवर चर्चा केली. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना, फर्नांडिस यांनी स्पष्ट केले की, काही दिवसांपूर्वी काही नागरिकांनी हॉस्पिसिओ रुग्णालयातील आपत्कालीन सेवा आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबाबत तक्रारी केल्या होत्या. या कारणास्तव त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला.

खासदार फर्नांडिस यांनी राज्य सरकारला विनंती केली आहे की, रुग्णालयातील वैद्यकीय, तांत्रिक, आणि इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांची भरती त्वरीत करण्यात यावी, ज्यामुळे नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होऊ शकेल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड