शाळांची गुणवत्ता वाढावी, शाळांमधील अध्यापन, माध्यान्ह भोजन अशा विविध बाबींवर लक्ष राहण्यासाठी शालेय शिक्षण विभागाची त्रिस्तरीय यंत्रणा आहे. त्याची जबाबदारी केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांवर आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागासाठी या अधिकाऱ्यांची २७४ पदे मंजूर आहेत, पण सध्या १०४ अधिकारीच आहेत (Solapur School Vacancies 2025) . त्यामुळे अनेक शाळांना भेटीच दिल्या जात नसल्याची वस्तुस्थिती आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाकडील केंद्रप्रमुखाकडे १० ते १२ शाळा, दोन ते पाच केंद्राची जबाबदारी विस्ताराधिकाऱ्यांकडे तर गटशिक्षणाधिकाऱ्याकडे प्रत्येक तालुक्यातील शाळांची जबाबदारी दिलेली असते. मात्र, सध्या या अधिकाऱ्यांची ६५ टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत जाऊन तेथील गुणवत्तेसह अन्य बाबींचा आढावा घेण्यास अडचणी येत आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल वाढलेला असतानाच जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करीत अनेक शाळांची पटसंख्या कमी होत असल्याची वस्तुस्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर सद्य:स्थितीत ५३ शाळांची पटसंख्या १० पेक्षा आहे. याशिवाय १०० पेक्षा अधिक शाळांचा पट १० ते २० पर्यंतच खाली आला आहे. गुणवत्ता वाढली तर पटसंख्या वाढणार आहे आणि त्यासाठी अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी महत्त्वाच्या मानल्या जातात. मात्र, सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे अधिकाऱ्यांची पदे ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत रिक्त असल्याने शेकडो शाळांना भेटीच दिल्या जात नसल्याचे चित्र आहे. अरबळी जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रकार त्यातूनच घडल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने महिन्यातून किमान २० शाळांना भेटी देऊन तेथील गुणवत्ता व दैनंदिन कामकाज पाहणे अपेक्षित आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७७ शाळा आहेत. सध्या आपल्याकडे ६१ केंद्रप्रमुख, ४१ विस्ताराधिकारी व एक गटशिक्षणाधिकारी आहेत. उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना भेटी सुरू आहेत. अधिकाऱ्यांच्या शाळा भेटीचा अहवाल दरमहा घेतला जाणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















