सोलापुरमध्ये 1519 जागांसाठी 6 जुलैपासून ऑनलाइन रोजगार मेळावा

Solapur Job Fair 2020


Solapur Job Fair 2020 :

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन, संचारबंदी/जमावबंदी असे प्रतिबंधात्मक उपाय केले. या उपाययोजनांमुळे कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात रोखता आला परंतु अर्थकारणाला मोठी खीळ बसल्याने अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा बिकट स्थितीत सोलापूरच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने बेरोजगारांसाठी गुड न्यूज आणली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील दहा औद्योगिक कंपन्यांतील 1 हजार 519 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्याकरिता 6, 7 आणि 8 जुलै रोजी ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित केल्याची माहिती सोलापूरच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक सचिन जाधव यांनी दिली. लॉकडाऊनमुळे बंद झालेले उद्योग अटी व शर्तीवर सुरू झाले आहेत. अशा उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे. उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सोलापूर येथे सुतार, हाऊसमन, एएनएम स्टाफ नर्स, जीएनएम स्टाफ नर्स, सफाई कर्मचारी, रेफ्रिन. एसी, विक्री कार्यकारी, तेली कॉलर, विमा सल्लागार वेल्डर, फिटर, इलेक्ट्रीशियन, मॉल अटेंडर, शाफ्ट सहाय्यक, फिजिशियन, ड्युटी मेडिकल ऑफिसर, नर्सिंग, फार्मासिस्ट, वॉर्ड मुलगा, ड्राफ्ट्समन सुरक्षा रक्षक, संगणक ऑपरेटर, कडुलिब प्रशिक्षणार्थी, ऑपरेटर करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा १ चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख ६ ते ८ जुलै २०२० आहे.

  • पदाचे नावसुतार, हाऊसमन, एएनएम स्टाफ नर्स, जीएनएम स्टाफ नर्स, सफाई कर्मचारी, रेफ्रिन. एसी, विक्री कार्यकारी, तेली कॉलर, विमा सल्लागार वेल्डर, फिटर, इलेक्ट्रीशियन, मॉल अटेंडर, शाफ्ट सहाय्यक, फिजिशियन, ड्युटी मेडिकल ऑफिसर, नर्सिंग, फार्मासिस्ट, वॉर्ड मुलगा, ड्राफ्ट्समन सुरक्षा रक्षक, संगणक ऑपरेटर, कडुलिब प्रशिक्षणार्थी, ऑपरेटर
  • पद संख्या – १५००+ जागा
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन रोजगार मेळावा
  • राज्य – महाराष्ट्
  • विभाग – पुणे
  • जिल्हा – सोलापूर
  • नोकरी ठिकाण – पुणे, सोलापूर
  • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – ६ ते ८ जुलै २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. या रोजगार मेळाव्यात जास्त जास्त पात्र व इच्छुक व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 0217-2622113 या दूरध्वनीवर किंवा solapurrojgar1@gmail.com या मेलवर संपर्क साधावा लागणार आहे. 

Important Links For Solapur Job Fair 2020
जाहिरात : https://rojgar.mahaswayam.in/
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2ZeWxlK


Leave A Reply

Your email address will not be published.