Solapur ITI MIDC Jobs – सोलापूर शहरातील विजयपूर रोडवरील शासकीय आयटीआयसह जिल्ह्यातील सांगोला, बार्शी व पंढरपूर येथील आयटीआयमध्ये आता नवीन कोर्सच्या तुकड्या सुरू होणार आहेत. त्यातून १४० विद्यार्थ्यांना त्या नवीन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून रोजगार व नेाकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सोलापूर शहरातील विजयपूर रोडवरील शासकीय आयटीआयसह जिल्ह्यातील सांगोला, बार्शी व पंढरपूर येथील आयटीआयमध्ये आता नवीन कोर्सच्या तुकड्या सुरू होणार आहेत. त्यातून १४० विद्यार्थ्यांना त्या नवीन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून रोजगार व नेाकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

इयत्ता आठवी, दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आयटीआयमध्ये स्वयंरोजगारासह नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध व्हावेत म्हणून नवनवीन कोर्स शिकविले जातात. पण, काळाच्या ओघात लोहारकाम, न्हावीकाम असे कोर्स बंद पडले. त्यामुळे अनेक आयटीआयला कुलूप लावावे लागले तर एमसीव्हीसी कनिष्ठ महाविद्यालये देखील बंद करावी लागली आहेत. सलग तीन वर्षे त्या कोर्सचे प्रवेश ५० टक्क्यांपेक्षा कमी राहिल्यावर ती तुकडी बंद केली जाते. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण आवश्यक असून त्यातून बेरोजगारी कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता सोलापूरच्या शासकीय आयटीआयमध्ये दोन नवीन कोर्सच्या तुकड्या सुरू केल्या जाणार आहेत. तर बार्शीच्या आयटीआयमध्ये एक आणि पंढरपूरच्या आयटीआयमध्ये दोन नवीन कोर्सच्या तुकड्या सुरू होणार आहेत.
तसेच सांगोल्यातील आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन व फिटर या कोर्सची प्रत्येकी एक तुकडी सुरू केली जाणार आहे. दहावी-बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचा कल आयटीआयकडे वाढला आहे, पण ‘एमसीव्हीसी’साठी प्रवेश पुरेशा प्रमाणात होत नसल्याची स्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यात १२ शासकीय तर २४ खासगी आयटीआय आहेत. सहा ठिकाणी ‘एमसीव्हीसी’चा अभ्यासक्रम शिकवला जात असून त्याच्या ११ तुकड्या आहेत.
लवकरच नवे कोर्स सुरू होतील
सोलापुरातील शासकीय आयटीआय आणि बार्शी, पंढरपूर, सांगोला येथील आयटीआयमध्ये काही नवीन कोर्सच्या तुकड्या सुरू केल्या जाणार आहेत. काळाच्या ओघात विद्यार्थ्यांच्या आवडी व रोजगाराच्या संधी पाहून हा बदल करण्यात येत आहे. आगामी काळात या तुकड्या त्या आयटीआयमध्ये सुरू होतील अशी माहिती मिळाली आहे.
चार आयटीआयमधील नवीन कोर्स
१) सोलापूर (विजयपूर रोड आयटीआय) : इंटरनेट ऑफ हाय् थिंग्ज् (स्मार्ट सिटी) व सोलार टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)
२) बार्शी : मॅकेनिकल ड्राप्ट्समन
३) पंढरपूर : ड्राप्ट्समन सिव्हिल आणि मशिनिस्ट
४) सांगोला : इलेक्ट्रिशियन व फिटर
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















