गेल्या महिनाभरापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या एकत्रित हप्त्याची (₹३०००) प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना सरकारकडून धक्का बसला आहे. अनेकांना अपेक्षित रकमेसाठी वाट पाहावी लागत असताना, काही महिलांच्या बँक खात्यात केवळ ₹५०० जमा करून राज्य सरकारने जागतिक महिला दिनी महिलांची थट्टा केल्याची भावना व्यक्त होत आहे.

जुलै २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ लागू केली. योजनेनुसार, आधार लिंक बँक खात्यात दरमहा ₹१५०० जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रारंभी ही रक्कम नियमितपणे जमा होत होती.
निवडणुकीपूर्वी विरोधकांनी या योजनेवर टीका करत सरकारने महिलांना फसवले असल्याचा आरोप केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्तेवर आल्यास ही रक्कम ₹२१०० करण्यात येईल, असे आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आले होते. सत्ता स्थापन होऊन चार महिने उलटूनही वाढीव हप्ता मिळालेला नाही. त्यातच फेब्रुवारीचा हप्ता विलंबाने येणार असल्याची चर्चा सुरू होती.
महिला दिनी फसवणूक?
सोशल मीडियावर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे एकत्र ₹३००० जमा होतील, अशी माहिती महिलांमध्ये चर्चेत होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या योजनेवर चर्चा झाली होती. मात्र, महिला दिनाच्या निमित्ताने मोठी रक्कम जमा होईल, या अपेक्षेने असलेल्या महिलांच्या खात्यात केवळ ₹५०० जमा झाल्याने सरकारने थट्टा केल्याचा आरोप महिलांकडून केला जात आहे. मंगळवेढा तालुक्यातील एका महिलेच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या निंबोणी शाखेतील खात्यावर फक्त ₹५०० जमा झाल्याचे उघड झाल्याने महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
महिलांचा रोष: “आजच्या दिवशी तरी सरकारने शब्द पाळायला हवा होता!”
महिला दिनानिमित्त महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला जात असताना, त्याच दिवशी सरकारने दिलेल्या आश्वासनाचा भंग केल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. काही महिलांनी “किमान आजच्या दिवशी तरी सरकारने दिलेला शब्द पाळायला हवा होता,” अशी प्रतिक्रिया दिली.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि जनतेच्या कल्याणासाठी मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या सरकारने महिला दिनाच्या दिवशी तरी महिलांची थट्टा करायला नको होती, असे महिलांचे मत आहे. सत्ताधारी पक्षातील काही नेते महिला विषयक बेताल वक्तव्ये करत असल्याने, सरकार महिलांविषयी किती गंभीर आहे, हे यातून स्पष्ट होते, अशी टीका होत आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















