Shikshan Sevak Bharti 2026
शिक्षण सेवकांनसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी. राज्य सरकारने शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षणसेवक म्हणून रूजू झालेल्या पूर्वीच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने १८ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी स्पष्ट करण्यासाठी आता पुन्हा एकदा अध्यादेश जाहीर करून उमेदवारांना वेतन संरक्षण, सेवाजोडी आणि पेन्शन लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शिक्षणसेवकांना मोठा लाभ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘शिक्षणसेवकपद मानधनावर आहे’, ‘परिविक्षाधीन कालावधी संपल्याशिवाय नियमित वेतनश्रेणी देता येणार नाही’ असे दावे करून पात्र उमेदवारांना लाभापासून वंचित ठेवले जात होते. या तक्रारींची गंभीर दखल घेत शासनाने सर्व संभ्रम दूर करणारे स्पष्टीकरण दिले असून, नियम न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर वैयक्तिक जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नव्या स्पष्टीकरणानुसार, जर एखादी व्यक्ती पूर्वी नियमित शासकीय किंवा निमशासकीय सेवेत (ज्यांचे वेतन सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत दिले जाते) कार्यरत असेल आणि संबंधित व्यक्त्तीची पवित्र पोर्टलद्वारे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा सैनिकी शाळांमध्ये शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती झाली असेल, तर त्या व्यक्तीला जुन्या नोकरीतील वेतन संरक्षण आणि सेवाजोडीचा पूर्ण लाभ मिळेल. यासाठी वर्ग-४ (शिपाई, परिचर) की वर्ग-३ (लिपिक, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस) असा भेदभाव केला जाणार नाही.
पूर्वी S-7 श्रेणीत २५, २०० रुपये वेतन घेत असल्यास नवीन S-10 श्रेणीत किमान २९,२०० रुपये किंवा S-14 मध्ये ३८,६०० रुपये मिळतील. जर पूर्वीच जास्त वेतन असेल तर पुढील टप्प्यात संरक्षण दिले जाईल. हा लाभ नियुक्त्तीच्या पहिल्या दिवसापासूनच देणे बंधनकारक आहे; तीन वर्षांच्या परिविक्षाधीन कालावधीची अट लागू राहणार नाही. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीअंतर्गत सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटीसाठी जोडली जाईल. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्यांचा शिक्षणसेवक कालावधी सुरू होता त्यांना त्या तारखेपासून, तर नंतर नियुक्त झालेल्यांना नियुक्ती दिनांकापासून हा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याच असणार प्रमुख तीन अटी
शिक्षणसेवकांसाठी प्रमुख तीन अटी आहेत. यामध्ये कर्मचारी नियमित असावा, पूर्वपरवानगीने अर्ज केलेला असावा आणि नोकरीत बदली नियमांपेक्षा जास्त खंड नसावा. या अटींचे पालन करणाऱ्या या व्यक्तींना संबंधित लाभापासून कोणीही वंचित ठेवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Shikshan Sevak Bharti 2026
शिक्षण सेवकांनसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी. शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नंतर शिक्षण सेवक म्हणून रुजू झाल्यास त्यांचे वेतन कमी होणार नाही, तसेच पूर्वीची सेवा निवृत्तिवेतनासह इतर लाभांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने स्पष्ट आदेश जारी केले आहेत. शासन निर्णय असूनही अनेक ठिकाणी वेतन संरक्षणाचा लाभ दिला जात नसल्याच्या तक्रारी शालेय शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. त्यामुळे विभागाने नव्या परिपत्रकाद्वारे नियम पुन्हा स्पष्ट केले आहेत. पात्र कर्मचाऱ्यांना वेतन संरक्षणाचा लाभ देणे बंधनकारक असून, तो नाकारल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. या बद्दल अन्य महत्वाची माहिती खाली दिली आहे.
नेमका या मुळे लाभ कोणाला मिळणार?
तीन वर्षांचा शिक्षण सेवक किंवा परीविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतरच वेतन संरक्षण मिळेल, हा समज चुकीचा असून शिक्षण सेवक म्हणून कार्यरत असतानाच वेतन संरक्षण आणि वेतन निश्चितीचा लाभ द्यावा
१८ फेब्रुवारी २०२६ रोजी शिक्षण सेवक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्या दिवसापासून हा लाभ लागू होईल.
पगारासह सेवाकाळ कायम
- हा लाभ शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित सेवेत असलेल्या शिक्षकांसह शिपाई, परिचर, पहारेकरी, कक्षसेवक, लिपिक, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस आदींनामिळणार आहे. मात्र,
- संबंधित कर्मचारी नियमित सेवेत असणे, नवीन पदासाठी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊन अर्ज केलेला असणे आणि जुन्या व नव्या नोकरीदरम्यान नियमबाह्य खंड नसणे आवश्यक आहे.
- शिक्षणसेवक म्हणूनसरकारने स्पष्ट केले आहे की, नियुक्तीनंतर वेतन ठरवताना कर्मचाऱ्याच्या आधीच्या वेतनाचा विचार केला जाईल. पूर्वीची सेवा निवृत्तिवेतन आणि इतर सेवानिवृत्ती लाभांसाठी जोडली जाणार आहे. नोकरी बदलामुळे सेवाकाळाचे नुकसान होणार नाही.
‘टीएआयटी’ परीक्षेत उत्तीर्ण होऊनही केवळ शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच खडे बोल सुनावले. गुणवत्ता यादीत स्पष्ट वेतनश्रेणी नमूद असतानाही नियुक्ती आदेशात बदल करणे हे तर्कहीन व कायद्याच्या विरोधात असल्याचे फटकारत न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने याप्रकरणी पालिकेला फैलावर घेतले. इतकेच नव्हे तर, शिक्षण सेवकऐवजी पूर्णवेळ सहायक शिक्षक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश पालिकेला दिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ५१ शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ‘पवित्र’ पोर्टलद्वारे ‘टेट’ परीक्षा उत्तीर्णांना माध्यमिक शाळांसाठी शिक्षक भरती केली होती. संबंधित ५१ उमेदवारांची निवड अनुदानित नसलेल्या शाळांमध्ये सहायक शिक्षक म्हणून झाली होती. गुणवत्ता यादीत त्यांची नियुक्ती सातव्या वेतन आयोगानुसार एस-१४ वेतनश्रेणीत नमूद होती.
मात्र, २० जून २०२४ रोजी देण्यात आलेल्या नियुक्ती आदेशात त्यांना ‘शिक्षण सेवक’ म्हणून दरमहा १८ हजार मानधनावर तीन वर्षांसाठी नेमण्यात आले. याला आक्षेप घेत शिक्षकांनी उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील उदय वारुंजीकर व अॅड. सुमित काटे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी खंडपीठाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या ५१ शिक्षकांना ‘शिक्षण सेवक’ म्हणून मानधनावर नेमणे चुकीचे ठरवत पालिकेला फटकारले. न्यायालयाने संबंधित सर्व शिक्षकांना मूळ जाहिरात आणि गुणवत्ता यादीप्रमाणे पूर्णवेळ सहायक शिक्षक म्हणून वेतनश्रेणीसह नियुक्त करण्याचे आदेश दिले.
डिप्लोमा इन एज्युकेशन (डी.एड्), बॅचलर ऑफ एज्युकेशन (बीएड्), टीईटी, सीटीईटी व टेट यासारख्या कठीण परीक्षा उत्तीर्ण करून पात्रता सिद्ध केलेल्या उमेदवारांना अन्यायकारक प्रोबेशन कालावधी पार करावा लागत आहे. आजही अनेक शिक्षक शाळेत काम करून उदरनिर्वाहासाठी शाळेनंतर मिळेल ते काम करीत आहेत. काहीजण रात्री किंवा सुट्टीच्या दिवशी रंगकाम, गवंडी काम करत आहेत. काहीजण केटरिंग, डिलिव्हरी बॉय, दुकानदार अशी कामे करत आहेत. हिवाळी अधिवेशनात आ. जगन्नाथ अभ्यंकर यांनी शिक्षणसेवक पद रद्द करावे, अशी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. मात्र, सत्ताधारी, विरोधकांनी या प्रश्नाकडे अजूनही गांभीर्याने पाहिलेले नाही. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शासनाने शिक्षणसेवकांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन, तत्काळ हा कालावधी रद्द करावा. सर्व शिक्षकांना थेट नियमित सेवा व संपूर्ण वेतन द्यावे, अशी मागणी शिक्षक सेवकांकडून होत आहे.
Shikshan Sevak Bharti 2024: Shikshan Sevak is going to recruit for the post of “Shikshan Sevak”. There is a 01 vacant post available. Interested and eligible candidates may attend the walk-in interview scheduled on 10th of August 2024. For more details about Shikshan Sevak Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
शिक्षण सेवक अंतर्गत “शिक्षण सेवक” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 ऑगस्ट 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शिक्षण सेवक
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – श्री गुरु पंचाक्षरी बृहन्मठ, माळकवठे, ता. द. सोलापूर, जिल्हा सोलापूर
- मुलाखतीची तारीख – 10 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट – https://schools.org.in
Shri Panchakshari Prashala Kannad Madhyam Vacancy
| पदाचे नाव | पद संख्या |
| शिक्षण सेवक | 01 |
Educational Qualification For Shikshan Sevak Notification
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| शिक्षण सेवक | B.Sc., B.Ed. (Maths) |
Selection Process For Shikshan Sevak Recruitment
- वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखत 10 ऑगस्ट 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For school.org.in Job 2025 | |
| ???? PDF जाहिरात | https://shorturl.at/VHebI |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://schools.org.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















