राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांची ६१ पदे रिक्त
Shikshan Adhikari Vacant Posts in Maharashtra – सध्या महाराष्ट्र राज्यासह विविध जिल्ह्यातील शिक्षणाचा संपूर्ण डोलारा हा शिक्षणाधिकारी पदावर अवलंबून असतो. अत्यंत महत्त्वाचे पद असताना शिक्षणाधिकाऱ्यांची तब्बल अर्ध्यापेक्षा अधिक पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे निरंतर शिक्षणाधिकारी हे पद या विभागासाठी पांढरा हत्ती ठरत असल्याचे बोलले जात आहे. राज्यात ३३ जिल्हा परिषदा व चार महापालिकांमध्ये शिक्षणाधिकारी हे पद वर्ग एक दर्जाचे आहे. महाराष्ट्रात अशी एकूण १४४ पदे आहेत. त्यापैकी ८३ पदे भरली असून, ६१ पदे रिक्त आहेत .
तसेच विशेष म्हणजे या ८३ पदांपैकी २० पदे ही साईड पोस्टिंगची आहेत. ज्यात सहाय्यक संचालक, शिक्षण मंडळातील सहसचिव, परीक्षा परिषद, प्राथमिक, माध्यमिक संचालनालय व शिक्षण आयुक्त कार्यालयातील पदांचा समावेश आहे.
शालेय शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी हे पद सर्वांत महत्त्वाचे आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, निरंतर व जिल्हा प्रशिक्षण संस्थाअंतर्गत सर्व कामे या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली पूर्णत्त्वास येत असतात. राज्यात वर्ग २ दर्जाची ६०८ पदे असून, यामध्ये गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी तत्सम पदांचा समावेश होतो. यामधील सुमारे ७७ टक्के पदे रिक्त आहेत. ज्यांना शिक्षण विभागाची पुरेशी माहिती नाही, अशांनासुद्धा या पदाचा प्रभार दिलेला आहे. केंद्रशाळेचा प्रमुख शिक्षक असलेल्या व्यक्तींकडेही एक सोडून दोन – दोन तालुक्यांचा प्रभार दिला जात आहे. विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदेही ५० टक्के रिक्त असल्याने शिक्षकच हे पदे प्रभारी स्वरूपात सांभाळत आहेत. शाळा स्तरावर शिक्षकांची संख्या कमी होत असताना कोरोनोत्तर काळात विद्यार्थ्यांचे भवितव्य सद्यस्थितीत अधांतरी दिसत आहे.
किती वया पर्यंत शिक्षण अधिकारी पदाची परीक्षा देता येते… शिक्षक पदावर कार्यरत असलेली व्यक्ती ही परीक्षा देण्यास पात्र आहे का.. महिला साठी वयोमर्यादा काय आहे…
शैक्षणिक पात्रता काय लागते व कसे apply करायचे…
शिक्षण विभागाला पुर्णपणे दुर्लक्षीत करण्याचेच धोरण अलीकडच्या सरकारने स्विकारले आहे, अधिकारी तर दुर, साधी शिक्षक भरती सुध्दा 2017 पासुन चालु असुन कोणतेही सरकार गांभीर्याने घेत नसल्याने अजुनही प्रलंबितच आहे.
त्यामुळे पाञता असुनही बेरोजगारांची एक पिढी बरबाद आहे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचे नुकसान.
अजून अर्ज सुरु व्हायचे आहे, आल्यावर आम्ही महाभरती वर लिंक प्रकाशित करू.. धन्यवाद
किती वया पर्यंत शिक्षण अधिकारी पदाची परीक्षा देता येते… शिक्षक पदावर कार्यरत असलेली व्यक्ती ही परीक्षा देण्यास पात्र आहे का.. महिला साठी वयोमर्यादा काय आहे…
शैक्षणिक पात्रता काय लागते व कसे apply करायचे…
Shikshan adhikari form kuthe website var bharaycha