शिक्षण सेवकांना मोठा धक्का, द्यावी लागणार अजून एक परीक्षा! | Shikshak Sevak Bharti 2024

Shikshak Sevak Offline Application 2024

 Shikshak Sevak Bharti 2024

शिक्षक भरती बद्दल एक महत्वाचा नवीन अपडेट समोर आला आहे. राज्यात राबविल्या जात असलेल्या शिक्षकभरतीतून नियुक्त झालेल्या शिक्षणसेवकांना आता आणखी एक परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास तीन वर्षे शिक्षणसेवक म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना शिक्षक भारती ने निवेदन देऊन हे परिपत्रक रद्द करा, अशी मागणी केली असल्याची माहिती ‘शिक्षक भारती’चे नेते तथा राज्य सुनील गाडगे यांनी दिली. तीन वर्षांनी आपसूकच कायमस्वरूपी होणारी नोकरी टिकविणे आता कठीण जाणार असून, शिक्षणसेवकांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. हि शिक्षकसेवकांसाठी एक त्रासाची गोष्ट झाली आहे.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Shikshak Sevak Bharti 2024

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात नुकतीच जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, शिक्षकभरती पार पडली. यात १४ हजार उमेदवारांना शिक्षणसेवक वर्षांची नेमणूक देण्यात पाच हजार म्हणून तीन आली आहे, तर उमेदवार आजही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या आधी तीन वर्षे शिक्षणसेवक म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना शिक्षक म्हणून कायम केले जायचे. परंतु आता मात्र तीन वर्षांनंतर त्यांना नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती दिली आणार नाही. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे त्यांची परीक्षा घेतली उत्तीर्ण झाले तरच जाईल. परीक्षेत त्यांना नोकरीत कायम केले जाणार आहे; अन्यथा या उमेदवारांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. त्यामुळे हे परिपत्रक रद्द करा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा गाडगे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सोमनाथ बोतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हा सचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे, जॉन सोनवणे, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, रुपाली बोरुडे, सोनाली अकोलकर, रुपाली कुरूमकर, आदींनी दिला.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड