Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांची विविध पदे रिक्त!

Shikshak Bharti Details

Shikshak Bharti Details : There are vacancies for principals in 07 colleges in Jalgaon, 12 in Dhule and 7 in Nandurbar district. Further details are as follows:-

महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांची विविध पदे रिक्त! खान्देशातील ८३ पैकी २६ अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांची पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. आधीचं शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या पदांवर प्रभारी राज सुरू आहे. त्यात महाविद्यालयांमध्ये सुध्दा प्रभारी कारभार सुरू असल्यामुळे ही रिक्त पद कधी भरली जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Shikshak Bharti Details

खान्देशातील जळगावातील ०७, धुळ्यातील १२ तर नंदुरबार जिल्ह्यातील ७ महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांची पदे रिक्त आहेत. गेल्या वर्षी देखील विद्यापीठाने रिक्त जागा भरण्याच्या सूचना करण्‍यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे काही ठिकाणी या आदेशाची देखील अंमलबजावणी झाली नाही.


ITI व तांत्रिक महाविद्यालयांत प्राचार्य सह प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदे सुद्धा रिक्त

Shikshak Bharti Details : ITI व तांत्रिक महाविद्यालयांत प्राचार्य सह प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदे सुधा रिक्त. कौशाक्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत येणाऱ्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीत जळगाव जिल्ह्यात 21 शासकीय महाविद्यालय कार्य्र्य आहेत. त्यामध्ये 16 शाशकीय ITI व 5 तांत्रिक महाविद्यालयांचा समावेश आहे. मात्र, या 21 महाविद्यालयांमध्ये तब्बल 18 वरिष्ठ व कनिष्ठ प्राचार्याची पदे रिक्त आहेत.

रिक्त पदांचा तपशील

  • वर्ग – 1: वरिष्ठ प्राचार्य – 02 पदे
  • वर्ग – 1: कनिष्ठ प्राचार्य – 08 पदे
  • वर्ग – 2: प्राचार्य – 08 पदे
  • प्रशासकीय अधिकारी – 02 पदे

Shikshak Bharti Details


Shikshak Bharti – जिल्ह्यात प्रा‌थमिक शिक्षकांची चारशे पदे रिक्त

Shikshak Bharti Details : Four hundred posts of primary teachers are vacant in the district – नाशिक जिल्ह्यात पूर्व प्रा‌‌थमिक व प्राथमिक शाळांची संख्या जवळपास ३२६६ इतक्या असून, त्यासाठी ११६५५ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यात जवळपास सहाशेहून अधिक पदे रिक्त होती. मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी शासनाने सुमारे २४२ शिक्षकांची पदे शासनाने पवित्र पोर्टलद्वारे भरून नाशिक जिल्ह्यासाठी दिले होते. परंतु सुमारे चारशे पदे अद्याप अजून रिक्तच आहेत. कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून केली जाणारी शाळांची पट पडताळणीही होऊ शकलेली नाही. शाळांची पट संख्या निश्चित केल्यानंतर त्याच्या आधारे शिक्षकांची पदे शाळानिहाय निश्चित केली जातात. साधारणत: ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक देण्यात येतो. त्यानंतर मात्र विद्यार्थी संख्येचा आधार घेऊन कमीत कमी एका शाळेला दोन शिक्षक दिले जावेत असा शिक्षण विभागाचा दंडक आहे. गेल्या दोन वर्षांपासून शाळांची पटसंख्या ऑनलाईन भरून त्या आधारे शिक्षकांची पदे मान्यता देण्यात येत असले तरी, यंदा शैक्षणिक सत्रात शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे संचमान्यता न झाल्याने शिक्षकांची संख्या निश्चित होऊ शकली नाही. परिणामी शिक्षकांचे समायोजनही रखडले आहे.




जिल्ह्यात शिक्षकांची चारशे पदे रिक्त असली तरी, अलीकडेच शिक्षण विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यांकडून मंजूर पदे व रिक्त पदांची माहिती मागविली आहे. राज्यातील बीड, परभणी आदी जिल्ह्यात शिक्षकांची अतिरिक्त पदे असल्याने त्यातून शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत.

सोर्स : लोकमत


Shikshak Bharti 2021

Shikshak Bharti Details: Shikshak Bharti 2021 – Teacher recruitment postponed again due to change in reservation! Fear of delaying the recruitment process as it will take a long time – अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक- माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी राज्यभरातील शिक्षक भरती पुन्हा आरक्षण बदल झाल्याने लांबली आहे

Teacher Bharti 2021 – १४ ऐवजी २६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; आणखी मुदतवाढीची शक्यता

शैक्षणिक संस्थांतील शिक्षक भरती पारदर्शी व्हावी, या हेतूने राज्य शासनाने पवित्र पोर्टलची निर्मिती केली होती. या पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीला सुरवातीपासूनच घरघर लागली. मध्यंतरीच्या काळात शासकीय कोट्यातील पाच हजार ८०० जागा भरल्या असल्या, तरी उर्वरित सहा हजार जागा अजून भरणे बाकी आहे. यामध्ये खासगी शैक्षणिक संस्थांचा मोठा वाटा आहे. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या आरक्षणामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने याचिकांच्या आधारे शासनाने २३ डिसेंबर २०२० मधील तरतुदीनुसार लॉगिन करून १४ जानेवारीपर्यंत प्रवर्ग बदल करून घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा रखडली आहे. दरम्यान, २५ जानेवारीला मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे. त्यात पुन्हा बदल झाला, तर आरक्षणाचा बदल पुन्हा उमेदवारांना करावा लागणार आहे. याला मोठा कालावधी लागणार असल्याने भरती प्रक्रिया पुन्हा रखडण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही

राज्यात सात लाख उमेदवारांचा प्रश्न कायम

राज्यात २०१० नंतर शिक्षक भरती प्रक्रियेस प्रतिबंध करण्यात आला होता. माध्यमिक स्तरावरही इंग्रजी- विज्ञान विषय वगळता नियुक्ती न देण्याचे आदेश शासनाने यापूर्वी दिले होते. त्यामुळे २०१० नंतर राज्यात सुमारे सात लाखांहून अधिक उमेदवार डी.एड. बी.एड. पात्रताधारक ठरले आहेत. या उमेदवारांनी पात्रता धारण केली असली तरी त्यांना नियुक्ती मात्र मिळू शकलेली नाही. त्यामुळे अनेकांनी या कालावधीत स्पर्धा परीक्षेचे माध्यम निवडून विविध विभागांत सेवा करणे पसंत केले.

सोर्स : सकाळ


Maharashtra Shikshak Bharti 2021 – प्राचार्याची २६० पदे भरण्यास मंजुरी

Shikshak Bharti Details : Maharashtra Shikshak Bharti 2021 – राज्यातील २६० महाविद्यालयांना अखेर पूर्णवेळ प्राचार्य मिळणार असून शासनाने प्राचार्याची भरती करण्यास मंजुरी दिली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्यातील प्राध्यापक आणि प्रचार्याची पदे रिक्त आहेत. प्राचार्याची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यापैकी काही पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी दिली होती. मात्र करोना संसर्गानंतर वित्त विभागाने ४ मे रोजी राज्यातील पद भरतीवर निर्बंध आणले. मात्र, प्राचार्य नसल्यामुळे महाविद्यालयांच्या रोजच्या कामकाजावर परिणाम होत होता. अनेक महाविद्यालयांचे नॅकचे मूल्यांकनही रखडले होते.

विविध संघटनांनी प्राचार्याची पदे भरण्याची मागणी केली होती. अखेर शासनाने प्राचार्याची २६० पदे भरण्यास वित्त विभागाने ४ मेच्या निर्बंधातून सूट दिली आहे. त्यामुळे या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सोर्स : लोकसत्ता


Shikshak Bharti 2021 – राज्यात सहा हजार शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे पदभरती

Shikshak Bharti Details : Recruitment Of Six Thousand Teachers In The State Through The Sacred Portal – तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गातील शिक्षकांची 12 हजार 400 पदे भरण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यापैकी सहा हजार पदांची भरती पूर्ण झाली. उर्वरित पदभरतीवर वित्त विभागाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक परिस्थितीचे कारण देत बंदी घातली. आता 3 डिसेंबरला झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार या पदभरतीवरील बंदी उठविली. त्यानुसार पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरु असलेली शिक्षणसेवक पदभरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

राज्यातील शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्‍त आहेत. तरीही दहा ते 20 पटसंख्या असलेल्या सुमारे साडेसतरा हजार शाळांचे अन्य ठिकाणच्या शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे. आता या शाळांवरील सुमारे दहा हजारांहून अधिक शिक्षक अतिरिक्‍त होतील, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यातच कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थितीही अडचणीतच आहे. त्यामुळे वित्त विभागाने वैद्यकीय वगळता अन्य कोणत्याही विभागातील नवी पदभरती करु नये, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांची पदे रिक्‍त असतानाही नव्या शिक्षक भरतीचा निर्णय तुर्तास होणार नाही, असेही सांगण्यात येत आहे.

शिक्षणसेवकांच्या मानधन वाढीचा निर्णय नाहीच – Shikshak Bharti Details

पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गावर शिकविणाऱ्या शिक्षकांना दरमहा सहा हजार रुपयांवर सलग तीन वर्षे काम करावे लागत आहे. तर नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांना नऊ हजारांचे मानधन दिले जाते. वाढत्या महागाईच्या काळात तेवढ्या रकमेवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहही भागू शकत नाही. या पार्श्‍वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही शिक्षणसेवक पद रद्द करा अथवा मानधनवाढीची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. मात्र, त्यावर अद्याप काहीच निर्णय झालेला नसून शिक्षण आयुक्‍तांचा प्रस्तव वित्त विभागाकडे तसाच पडून आहे.

सोर्स : सकाळ


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Artika Khadse says

    Education-qualification kai lagte sir

  2. Shilpa bhurke says

    Shikshan kay lagte sir

  3. उदयभान घुले says

    शिक्षण पात्रता काय आहे

  4. Bhushan Wagh says

    मला कोणत्याही कारणास्तव कोणतेही काम करेन पण लगेच सांगा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड