प्राथमिक शिक्षकांची ५०० पदे रिक्त! नवीन पदभरती कधी सुरु होणार! – Bhandara Shikshak Bharti Updates News

Zilla Parishad (ZP Shikshak Bharti 2026 Updates) schools – considered the backbone of rural education in Maharashtra, are currently grappling with a severe shortage of teachers. But, the reality on the ground is grim, with 500 primary teacher positions currently lying vacant in the district as ZP Shikshak Bharti 2026 under Bhandara District. The situation is particularly dire in many schools where, instead of maintaining the student-teacher ratio mandated by the Right to Education (RTE) Act, only a single teacher is left to manage all students from 1st to 4th grade.

महाराष्ट्रातील ग्रामीण शिक्षणाचा कणा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद शाळा सध्या भीषण शिक्षक टंचाईच्या गर्तेत सापडल्या आहेत. नवीन शैक्षणिक सत्र (२०२६-२७) उंबरठ्यावर असताना, अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने चिमुकल्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार आहे. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची तब्बल ५०० पदे रिक्त आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे, आरटीई (RTE) नियमानुसार विद्यार्थी-शिक्षक प्रमाण राखणे दूरच, अनेक शाळांमध्ये १ ली ते ४ थीच्या वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक उरला आहे. गेल्या शैक्षणिक सत्रात रिक्त पदांमुळे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कंत्राटी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ३१ मार्च रोजी या स्वयंसेवकांचा कार्यकाळ संपल्याने शाळा पुन्हा ‘रामभरोसे’ झाल्या आहेत. यामुळे एकाच शिक्षकाला एकाच वेळी चार वर्गांतील विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे, ज्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावण्याची भीती व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाने ‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली असली, तरी ती संथ गतीने सुरू असल्याचा आरोप उमेदवारांकडून होत आहे.

Bhandara Shikshak Bharti Updates News

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

पवित्र पोर्टलकडून वाढल्या अपेक्षा – मे महिन्यात ‘पवित्र पोर्टल’ अंतर्गत शिक्षक भरती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात ५०० शिक्षकांची गरज असल्याने ही भरती प्रक्रिया पार पडल्यास ग्रामीण भागातील शाळांना संजीवनी मिळू शकते.मात्र, जर ही भरती लांबणीवर पडली, तर जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचे हे षड्यंत्र असल्याची भावना सामान्य जनतेमध्ये निर्माण होत आहे. शाळेत एकच शिक्षक असताना त्यांना बीएलओसारखी अशैक्षणिक कामे देणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्यासारखे आहे, असे मत सुजाण पालकांनी व्यक्त केले आहे. अध्यापनाचे काम सोडून शिक्षक इतर कामांत व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांच्या पाया कच्चा राहत असून, या शैक्षणिक नुकसानीला नेमके जबाबदार कोण? असा जळजळीत प्रश्न आता पालकांनी उपस्थित केला आहे. शाळेव्यतिरिक्त इतर कामे शिक्षकांवर लादण्यापेक्षा शिक्षणाच्या दर्जाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

केवळ लाखनी तालुक्यातच ६० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या संदर्भात लोकप्रतिनिधी आणि पालकांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार दाद मागितली. मात्र, ‘शिक्षक उपलब्ध नाहीत’ असे सांगून बोळवण केली जात आहे, लाखनीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे यांनी वरिष्ठ स्तरावर किमान २ शिक्षकांची मागणी केल्याचे स्पष्ट केले असले, तरी प्रत्यक्ष नियुक्ती कधी होणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. जिल्हा परिषद शिक्षकांना केवळ अध्यापनच नाही, तर शासनाच्या आदेशानुसार बीएलओ (मतदार नोंदणी अधिकारी) आणि इतर अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. शाळेत एकच शिक्षक असताना त्यांना अशा कामात विद्यार्थ्यांच्या जुंपल्यामुळे अध्यापनाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शाळांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पालकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड