JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महत्वाचे! आपल्या जिल्ह्यात कर्जमुक्ती याद्या चेक करा, नाव नसल्यास काय कराल? – Shetkari KarjMukti Yadi 2026

Shetkari KarjMukti Yadi 2026 – कर्जमुक्तीसाठी पात्र ठरूनही जिल्ह्यातील हजारो  शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप रखडले आहे. त्यामुळे त्यांना कर्जमुक्तीच्या लाभाची प्रतीक्षा करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या चौथ्या यादीत जिल्ह्यातील १९ हजार १४० शेतकऱ्यांची नावे सोमवारी (दि. १२) जाहीर झाली. त्यामुळे आतापर्यंत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ४६ हजार ३७१ झाली आहे. त्यापैकी १ लाख ५ हजार २०१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांत शासनस्तरावरून ऑनलाइन अनुदान जमा केले जाते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी सोमवारी सहकार विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आज अखेर २४ लाख ६७ हजार लाभार्थी शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या यादीत समावेश झाला आहे.

Shetkari KarjMukti Yadi 2026

१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीककर्जे यात समाविष्ट आहेत. २ लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीककर्जांसह पुनर्गठित कर्जांचा यामध्ये समावेश आहे. तिसऱ्या यादीमध्ये अमरावती विभागात ८५ हजार ७६ शेतकरी पात्र ठरले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये २ लाख ६४५०, कोकण विभागात २ हजार ७५६, नागपूर विभागात ३० हजार ७३८, नाशिक विभागात १४ हजार २४४ आणि पुणे विभागात ११ हजार ९२८ शेतकरी पात्र ठरले आहेत. कर्जमाफी योजनेसाठी महाआयटीने तयार केलेल्या पोर्टलवर बँकांनी ३१ लाख १७ हजार थकीत कर्ज खात्यांची माहिती सादर केली होती. पहिल्या यादीमध्ये १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांचा समावेश होता. ४ लाख २० हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली. आज ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी आज प्रसिद्ध झाली. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेतील कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

यादी तपासा; नाव नसेल तर सेवा केंद्रातून प्रमाणीकरण करा

पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या गावपातळीवरील संबंधित बँक शाखा, विकास संस्था, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयांत उपलब्ध आहेत. पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रातून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. त्यासाठी अॅग्रीस्टॅक क्रमांक, मूळ आधार कार्ड आणि बचत खात्याचे पासबुक सोबत ठेवावे, असे स्पष्ट केले.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

1.तिसऱ्या यादीमधील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची जिल्हा निहाय यादी बँक शाखा, विकास संस्था व ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

2. कर्ज थकबाकीची खातरजमा करून आधार प्रमाणीकरण करावेया यादीतील शेतकऱ्यांच्या कर्ज थकबाकीची रक्कम ३१ मार्च २०२६ रोजीच्या स्थितीनुसार नमूद करण्यात आली आहे.

3. १ एप्रिल २०२६ पासूनचे पुढील व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करून जवळच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.

4. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांच्या यादीतील काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्जे पूर्णपणे निरंक करण्यात येणार आहेत.

5. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतक-यांमध्ये मयत झालेल्या तसेच वयस्कर व बोटांच्या ठशाची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचे अनुषंगाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमीत करण्यात आलेली आहे. 6. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड