सेटची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जानेवारीत : पुढील वर्षी शेवटची ऑफलाइन परीक्षा होणार – MHSET 2024 Admission Process
MHSET 2024 Admission Process
Maha SET exam 2024 Registration Link
MHSET 2024 Admission Process: State Level Eligibility Test (SET) for the post of Assistant Professor will be held on 7th April 2024. For this, the online application process will start in the second week of January, information was given by the SET Department of Savitribai Phule Pune University. This will be the last offline set exam.
राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा (सेट) ७ एप्रिल २०२४ रोजी होईल. यासाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून देण्यात आली. ही अखेरची ऑफलाइन सेट परिक्षा असेल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
याबाबतची घोषणा २९ नोव्हेंबर रोजी झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसंबंधी घोषणा अपेक्षित होती. अखेरीस सेट विभागाकडून तारखेची माहिती देण्यात आली. उमेदवारांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी सुमारे एका महिन्याचा कालावधी दिला जातो. त्यानंतर परीक्षा अर्जाची छाननी, प्रवेशपत्र तयार करणे, आदी गोष्टींसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो.
शेवटची ऑफलाइन ‘सेट’
मागील काही वर्षांपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे नेट परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे. पुणे विद्यापीठ सेट परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार की ऑफलाइन याबाबत शंका होती. विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत समितीची ऑक्टोबर महिन्यात एक बैठक झाली. त्यात एप्रिल २०२४ मधील होणारी सेट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी, मात्र, त्यानंतर पुढील सर्व परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात, असे निश्चित करण्यात आले. त्यानुसार ७ एप्रिल रोजी मध्ये शेवटची ऑफलाइन (पेन आणि पेपर) परीक्षा होईल. त्यानंतर ४० वी सेट परीक्षा ऑनलाइन (संगणकावर) होईल.
आकडे बोलतात ■
एकूण विषय : ३२
■ सहभागी शहरे : १७
■ परीक्षा केंद्रे : २६२
■ सहभागी विद्यार्थी (अंदाजे)
: १,२५,०००
सेटच्या ३९ व्या परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. ७ एप्रिल २०२४ रोजी पार पडणाऱ्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका संच तयार करण्याला वेग आला आहे. ही प्रक्रिया जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपेल, त्यानंतर लगेचच उमेदवारांना ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ खुले करण्यात येईल.
डॉ. बी. पी. कापडणीस,
समन्वयक, सेट विभाग
Maha SET exam 2024 Big Update
MHSET 2024 Admission Process: Similar to the national level ‘NET’ exam, the state ‘SET’ is planned to be conducted twice a year for eligibility for the post of Assistant Professor. This new change is expected based on the decisions of the committee constituted by the University Grants Commission sponsored steering committee. Although this year’s set exam conducted by Savitribai Phule Pune University is offline, the subsequent exam is planned to be conducted online.
सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘नेट’ परीक्षे प्रमाणेच राज्याची ‘सेट’ ही वर्षातून दोनदा घेण्याचा विचार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत सुकाणू समितीने गठित केलेल्या समितीच्या निर्णयांचा आधारे हे नवे बदल अपेक्षीत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतली जाणारी यंदाची सेट परीक्षा जरी ऑफलाइन असली तरी त्यानंतरची परीक्षा मात्र ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा विचार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
विद्यापीठाकडून शेवटच्या ऑफलाइन सेटचे आयोजन करण्यात येणार असून, त्याचे वेळापत्रक पुढील आठवड्यात घोषित केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी सुमारे एक महिन्यांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर परीक्षा अर्जांची छाननी, प्रवेशपत्र तयार करणे, आदी गोष्टींसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
परिणामी सेट परीक्षा येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात आयोजित केली जाणार असल्याची शक्यता आहे. सोमवारपासून (ता.२०) सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे संच तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ऑनलाइन पद्धतीने सेट परीक्षा सुरू झाल्यानंतर वर्षातून दोनदा सेटच्या आयोजनाचा विचार आहे.
शेवटची ऑफलाईन ‘सेट’ –
महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षेचे आयोजन केले जाते. काही वर्षांपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार की ऑफलाईन याबाबत शंका होती.
मात्र, विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत समितीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीत सर्वसाधारणपणे मार्च-एप्रिल २०२४ मध्ये होणारी सेट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी. मात्र, त्यानंतरच्या पुढील सर्व परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात, असे निश्चित करण्यात आले.
पडताळणी नंतरच ऑनलाईन सेट –
विविध ऑनलाईन भरती परीक्षांमधील गोंधळ पाहता विद्यापीठाने सेट परीक्षेसाठी सावध पाऊले उचलली आहे. परीक्षा केंद्राची प्रत्यक्ष पाहणी, इंटरनेटची बॅंड विड्थ आणि सुविधांच्या आधारेच ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामिण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कोणती अडचण येऊ नये, तसेच परीक्षेवेळी गोंधळ होऊ नये म्हणून आधी प्रत्यक्ष चाचणी करूनच ऑनलाईन सेट परीक्षेचा विचार केला जाईल.
ऑनलाईन सेट परीक्षेसाठी प्रत्यक्ष चाचणीनंतरच विचार केला जाणार आहे. जलद निकाल लागावेत आणि विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा आमचा विचार आहे.
– डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Maha SET Exam Registration 2023
MHSET 2024 Admission Process – Savitribai Phule Pune University (SPPU) is currently conducting the Maharashtra State Eligibility Test under the faculties of Arts, Science, Social Sciences, Commerce, Law, Management, Education and Physical Education etc. as per the guidelines of the University Grants Commission to determine the eligibility of candidates for the post of Assistant Professor in colleges and universities of Maharashtra and Goa. Maharashtra State Eligibility Test 2024 Application Process has not started. The advertisement will be published on the official web site of Savitribai Phule Pune University. Candidates have to fill the application form online on the official website.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्र आणि गोव्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये साहाय्यक प्राध्यापकांच्या पदासाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कला, विज्ञान, सामाजिक विज्ञान, वाणिज्य, कायदा, व्यवस्थापन, शिक्षण आणि शारीरिक शिक्षण इ. या विद्याशाखांतर्गत सध्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा ही परीक्षा घेतली जात आहे. महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा २०२४ अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत वेब साइटवर जाहिरात प्रसिद्ध होईल. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.
पात्रता निकष
अ) उमेदवारांकडे SET च्या विषयात विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.
ब) पदव्युत्तर किंवा समकक्ष परीक्षेत किमान ५५ टक्के गुण (ग्रेसिंग किंवा राउंडिंग ऑफ न करता) मिळवले आहेत, ते पात्र आहेत.
क) ओबीसी/एसबीसी/डीटी(व्हिजे)/एनटी(नॉन-क्रिमी लेयर आणि एससी/एसटी/तृतीयपंथी/पीडब्लूडी/अनाथ ज्यांनी मास्टर्स किंवा समतुल्यमध्ये किमान ५० टक्के गुण (ग्रेसिंग किंवा राउंडिंग ऑफ न करता) असणे आवश्यक आहे.
ड) दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात किंवा पदव्युत्तर पदवीच्या चार सत्राच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या दोन सत्रात शिकत असलेले उमेदवार किंवा पाच वर्षांच्या एकात्मिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षात शिकत आहेत, ते या परीक्षेला बसण्यास पात्र नाहीत.
इ) SET साठी अर्ज करण्यासाठी, कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही.
परीक्षेचे ठळक मुद्दे
परीक्षा पातळी ः राज्य
परीक्षेची वारंवारता ः वर्षातून एकदा
परीक्षा पद्धत ः ऑफलाइन
परीक्षेचा कालावधी ः १२० मिनिटे
विषय पेपर १ ः अध्यापन आणि संशोधन योग्यता
पेपर २ ः ३२ विषय
परीक्षा शुल्क ः सर्वसाधारणसाठी ८५० रुपये
आरक्षितसाठी ः INR ६५०
गुणदान योजना
परीक्षेत दोन पेपर असतील. दोन्ही पेपरमध्ये केवळ वस्तुनिष्ठ प्रश्न असतील आणि परीक्षेच्या दिवशी दोन स्वतंत्र सत्रांमध्ये खालीलप्रमाणे ब्रेक न घेता घेतले जातील. पेपर १ आणि पेपर २ मध्ये, उमेदवारांना प्रत्येक बरोबर उत्तरासाठी २ गुण दिले जातील. परीक्षेत चुकीची उत्तरे किंवा प्रयत्न न केलेल्या प्रश्नांसाठी नकारात्मक मार्किंग नसते.
सत्र पेपर एकाधिक-निवडक प्रश्नांची संख्या गुण कालावधी
प्रथम १ ५० प्रश्न हे सर्व अनिवार्य आहेत ५० x २ = १०० १ तास (स. १० ते ११)
द्वितीय २ १०० प्रश्न हे सर्व अनिवार्य आहेत १०० x २ = २०० २ तास (स. ११.३० ते दु. ०१.३० पर्यंत)
विषयांचा अद्ययावत अभ्यासक्रम
महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा UGC.NET आणि UGC-CSIR-NETच्या अभ्यासक्रमावर आधारित घेतली जाईल, जी खालील अधिकृत वेबसाइटवर अपडेट आणि अपलोड केला गेला आहे.
महत्त्वाच्या लिंक
Table of Contents