Seed Multiplication Centre Recruitment – आताच प्राप्त नवीन अपडेट नुसार, महाराष्ट्र राज्य शासनाने कृषी आयुक्तालयांतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात २४८ अस्थायी पदांना मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता दूर होण्यास मदत होणार आहे, असा दावा कृषी विभागाने केला आहे. यासंबंधित शासन निर्णय बुधवारी (ता. २५) प्रसिद्ध करण्यात आला आहे. कृषी क्षेत्रातील सध्याच्या वाढत्या गरजांनुसार कृषी विभागातील अस्थायी पदांची नियुक्ती कायम ठेवण्याची मान्यता राज्य सरकारने दिली आहे. या शासन निर्णयानुसार ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ रिक्त असलेली पदे भरण्यात येणार नाही.

परंतू या निर्णयाद्वारे विभागात सध्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या अस्थायी पदांनाच याचा लाभ मिळणार आहे. कृषी आयुक्तालयांतर्गत असलेल्या तालुका बीज गुणन केंद्रामार्फत शेतकऱ्यांना उच्च प्रतीची बियाणे आणि कृषी सेवा उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. या अनुषंगाने येथे कार्यरत असलेल्यांसाठी या शासन निर्णयाद्वारे या तालुका बीज गुणन केंद्रातील २४८ पदे १ सप्टेंबर २०२४ पासून २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
या विभागातील कृषी अधिकारी वर्ग-२, कृषी पर्यवेक्षक वर्ग-३, कृषी सहाय्यक वर्ग-३, शिपाई, प्रशिक्षित मजूर वर्ग-४ आणि टिलर ऑपरेटर कर्मचाऱ्यांची नियुक्ती कायम राहणार आहे. तसेच शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ अधिक वेगाने पोहोचवण्यास ही भरती मदत करेल. ही पदे तात्पुरती असली तरी त्यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे, असा दावा कृषी विभागाने केला आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















