Security Guard: चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि आरोग्य चाचणी प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ

Security Guard Bharti 2022

Security Guard Recruitment 2022

Security Guard Bharti 2022 : The deadline for online submission of the Character Verification Certificate and Health Test Certificate has been extended till 31st May, 2022 for the construction of Pune District Security Board’s Aggregate Bridge-2019. It should be noted that the certificate submitted thereafter will not be considered and no excuse will be considered after the expiry of the period. Further details are as follows:-

पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांना कळवण्यात येत आहे कि, आपले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि आरोग्य चाचणी प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करण्याची मुदत दिनांक ३१ मे २०२२ पर्यन्त वाढविण्यात आली आहे. त्यानंतर सादर केलेली प्रमाणपत्र ग्राह्य धरली जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी तसेच मुदत संपल्यावर कोणत्याही सबबीचा विचार केला जाणार नाही.


Security Guard Board Results (Cut Off Marks) Declared

Security Guard Bharti 2022: Following the advertisement of Pune District Security Guard Board for preparation of Aggregate Bridge-2019, reservation wise details (cut off) of the marks of eligible / eligible candidates have been published. Further details are as follows:-

पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांच्या गुणांचा आरक्षणनिहाय तपशील (कट ऑफ) प्रसिद्ध केला आहे. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

मंडळाच्या समुच्चय पुलावर घेण्यासाठी पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांच्या गुणांचा आरक्षणनिहाय तपशील (कट ऑफ) पुढीलप्रमाणे.

Security Guard Bharti 2022

उमेदवारांना सूचना : 

१. उपरोक्त प्रमाणे समुच्चय पुलावर घेण्यासाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांनी त्यांचा अर्जात केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने त्यांची पात्रता तपासण्याच्या आधीन राहून सुरक्षा रक्षक म्हणून मंडळात नोंदीत करून समुच्यय पुलावर घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

२. शारिरीक/ मैदानी परीक्षा प्राप्त गुण व शैक्षणिक गुण यांची बेरीज करून आलेल्या एकूण गुणांच्या आधारे, वरील प्रमाणे आरक्षण प्रवर्गानुसार कट ऑफ गुण जाहीर करण्यात आले आहेत. उमेदवाराना सूचना करण्यात येते की ज्या उमेदवारांना त्यांच्या आरक्षण प्रवर्गा नुसार कट ऑफ गुणा एवढे वा जास्त गुण असतील त्यांना पुढील प्रक्रियेकरिता त्यांच्या नोंदीत भ्रमणध्वनी (Mobile) वर SMS पाठविण्यात येतील.

३. पात्र उमेदवारांना वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्राचे नमूने यांच्या वैयक्तिक login नुसार https://sgbregistration.in या पोर्टलवर १ एप्रिल २०२२ रोजी उपलब्ध करून दिले जातील.

४. पात्र उमेदवारांनी स्वत:चे वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्र दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यन्त https://sgbregistration.in या पोर्टल वर जमा (upload) करावीत.

५. वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्राच्या प्रत्यक्ष पडताळणीनंतर पात्र उमेदवारांनी B-Form साठी ऑनलाइन रु. १०० व इतर कर भरल्यानंतर मंडळाच्या प्रतीक्षा यादी वर सामील करून घेतले जाईल.

६. सदरचा निकाल म्हणजे कामाची हमी नसून विविध अस्थापना / फँक्टरी यांच्याकडून प्राप्त मागणीनुसार समुच्चय पूलातील नोंदीत सुरक्षा रक्षकांना काम उपलब्ध करून देण्यात येईल.

७. पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, पुणे. सूमुच्चय पुल निकाल २०१९ हा मंडळाने शासनास दिंनाक १२-०२-२०२१ रोजीच्या पत्राद्वारे प्रवर्ग निहाय आरक्षणाबाबत मागितलेल्या मार्गदर्शनाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.


Mumbai Mahanagarpalika Security Guard Vacancy 2022

Security Guard Bharti 2022 : A decision will be taken soon to fill 1800 vacancies of security guards in Mumbai Municipal Corporation. These vacancies put a strain on the existing security guards. Sometimes they have to do double duty. Further details are as follows:-

मुंबई महापालिकेतील सुरक्षारक्षकांची 1800 रिक्त पदे (Security Guard Bharti 2022) भरण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रिक्त पदांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डांमध्ये जलाशये, रुग्णालय, उद्यान, स्मशानभूमी अशा ठिकाणी सुरक्षारक्षकांची 1800 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे सध्या कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांवर कामाचा ताण असतो. काही वेळा त्यांना डबल डय़ुटी करावी लागते. सुरक्षारक्षकांची संख्या अपुरी असल्यामुळे पालिकेच्या उद्यान, मैदानात चोऱ्या आणि गर्दुल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षारक्षकांची ही पदे भरावीत यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार वरळी युवासेनेचे उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे मागणी केली होती.

या मागणीची दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी रिक्त पदांचा आढावा घेऊन लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली. बैठकीला उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, उपआयुक्त प्रभात रहांगदळे, प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे आदी उपस्थित होते.


सध्या कोरोना मुले मुंबई महापालिकेत अत्यावश्यक सेवेच्या विविध विभागांत भरती केली जात आहे. मात्र १४०० पदे रिक्त असलेल्या सुरक्षा विभागात भरती का केली जात नाही, असा सवाल कामगार संघटनांनी केला आहे.

सध्या सुरु असलेल्या करोनाच्या साथीत अधिक मनुष्यबळाची गरज असल्याने प्रशासनाने अग्निशमन दल जवान व सुरक्षा रक्षकांना तीन पाळ्यांमध्ये ड्युटी लावली आहे. त्यामुळे असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कामाचा ताण येत आहे. नेमणुकीच्या जागा अनेक आणि रक्षकांची संख्या कमी असल्याने असंख्य महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाविनाच गाडा हाकला जात आहे.

सध्या पालिकेत सुरक्षा रक्षकांची ३८०० मंजूर पदे असून त्यातील १४०० म्हणजे ३७ टक्के पदे रिक्त आहेत. मध्यंतरी सुरक्षा रक्षकांची काही पदे भरण्यात आली. त्या भरतीच्या प्रतीक्षा यादीवरील जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी दी म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पालिकेकडे केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर रूग्णालये व इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची आवश्यकता असून त्यासाठी तातडीने या विभागात भरती करावी, असे बने यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मिलिन सावंत यांना पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे. हि बातमी सविस्तर महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशित झालेली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
 1. Rajesh jagdish shende says

  Maze vay sadhy 35 ahe tar mala sarkari job milel ka

 2. Sagar tambde says

  Bharty kadi hoil

 3. Sachin prem chavhan says

  Bharti kadhi honar

 4. तारीख किती आहे सर फार्म भरण्याची

 5. Vishvas says

  72000 hajar padanchi bharti kevha hoil
  Ky patrata lagel

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड