दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीला गती मिळणारं, १० हजार उमेदवाराने मिळणार संधी!! – Second Phase of Teacher Recruitment Needs Acceleration!!

Second Phase of Teacher Recruitment Needs Acceleration!!

राज्यातील शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यानंतरही हजारो उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील भरतीची वाट पाहत आहेत. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असून, या टप्प्यात विविध व्यवस्थापनांमधून जवळपास १० हजार उमेदवारांना संधी मिळण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या निमित्ताने शिक्षक भरतीबाबत अधिक स्पष्टता मिळावी, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.

Second Phase of Teacher Recruitment Needs Acceleration!!

राज्यात तब्बल वीस वर्षांनंतर गेल्या वर्षी शिक्षक भरतीचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला. शालेय शिक्षण विभागाने तब्बल ११,०८५ नवीन शिक्षकांची भरती जाहीर केली होती. त्यामुळे अनेक उमेदवारांची दीर्घ प्रतीक्षा संपली. ही भरती ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’च्या आधारावर पवित्र पोर्टलमार्फत पार पडली. पहिल्या टप्प्यात २१,६७८ जागांपैकी १६,७९९ पदे मुलाखतीशिवाय भरली जाणार होती, त्यापैकी ११,०८५ उमेदवारांची निवड करण्यात आली.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मात्र, शाळांची बिंदूनामावली अद्ययावत नसल्याने आणि अनेक शाळांकडून पवित्र पोर्टलवर भरतीसंबंधी माहिती अद्याप अपलोड न झाल्याने दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे.

दुसऱ्या टप्प्यात मुख्यतः खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील रिक्त पदे भरली जातील, अशी अपेक्षा आहे. तसेच, ‘पेसा’ क्षेत्रातील ८,००० हून अधिक जागा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे अधिवेशनात मंजूर करून भरतीसाठी पवित्र पोर्टलवर सूचना द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे. सर्व व्यवस्थापनांमधील १००% रिक्त पदे भरती प्रक्रियेत समाविष्ट करावीत, यासाठी अधिवेशनात ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी युवा शैक्षणिक व सामाजिक न्यास संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळे यांनी केली आहे.

भरती प्रक्रियेचे महत्त्वाचे आकडे:
पहिला टप्पा: ११,०८५ शिक्षकांची भरती पूर्ण
दुसरा टप्पा: १०,००० जागांवर भरती होण्याची शक्यता


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड