‘आरटीजीएस’द्वारे एकाच वेळी पावणेआठ हजार मुलांना शिष्यवृत्ती

Scholarship through 'RTGS'

पुणे – इयत्ता 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पालिकेकडून भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावे शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते. यंदा 7 हजार 879 जणांच्या खात्यावर तब्बल 14 कोटी 8 लाख 5 हजार रूपयांची शिष्यवृत्ती एकाचवेळी महापालिकेकडून आरटीजीएसद्वारे जमा करण्यात आली.

महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक सुशील मेंगडे, नगरसेवक अजय खेडेकर, समाज विकास विभागाचे उपायुक्त सुनील इंदलकर, माधव जगताप यावेळी उपस्थित होते.

या वेळी दहावीच्या सुमारे 5 हजार 617, तर बारावीच्या 2 हजार 262 मुलांच्या खात्यात ही शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली. यावेळी महापौरांनी शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलांचे अभिनंदन केले. पुढील वर्षी शिष्यवृती वेळेत द्यावी तसेच त्याचा विनियोग कशासाठी केला जातो, याची माहिती घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

सौर्स: प्रभात

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Vikas rathod says

    Police bharti chi pudchi proses kadhi aahe

    1. MahaBharti says

      Lavkach Jahirat apekshit aahe…

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप