टीईटीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
Schedule of TET Exam Announced
टीईटीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
नगर – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 19 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. टीईटी परीक्षेसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. टीईटीच्या संकेतस्थळावर या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या परीक्षेचे नियम निश्चित केले आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी उच्च प्राथमिक शिक्षक पदाच्या उमेदवारांना आता पदवीचा विषय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळांमध्ये शिक्षकांची नोकरी करण्यासाठी 2013 पासून टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षेला परवानगी मिळावी, यासाठी परीक्षा परिषदेकडून शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला ऑक्टोबर महिन्यात मान्यता देण्यात आली. शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला होता. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकविण्यासाठी पहिला व दुसरा असे दोन्ही पेपर उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. इयत्ता सहावी ते आठवीच्या गटातील उच्च प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी परीक्षेतील दुसरा पेपर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. टीईटी परीक्षा 150 गुणांची असून, यात 150 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला एक गुण दिला जाणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
टीईटी परीक्षेत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मराठी, इंग्रजी व्याकरण, गणित परिसर अभ्यास आदी विषयांवरील प्रश्नांचा समावेश राहणार आहे. या परीक्षेची संपूर्ण माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. विर्द्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.परीक्षेचे वेळापत्रक या प्रमाणेऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 8 ते 28 नोव्हेंबर, प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे 4 ते 19 जानेवारी, टीईटी परीक्षा पेपर 1 ची वेळ सकाळी 10.30 वाजता, सीईटी पेपर 2 दुपारी 2 वाजता राहणार आहे. काही बदल झाल्यास शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर तपासून घ्यावे.